प्रत्येक सदस्य योग्य आहे
प्रत्येक सदस्य योग्य आहे


तसेतर ऑफिसमध्ये कित्येक अधिकारी येतात आणि जातात पण नोकरीच्या सतराव्या वर्षी नवीन उपायुक्त आले. अगदी मृदूभाषी असून परिस्थितीच्या हिशोबाने खराखुरा निर्णय घेणारे.
ऑफिसमध्ये 30 लोकांचाच स्टाफ असल्यामुळे कामे वाटलेली होती. एकेदिवशी अनपेक्षित निरीक्षण आणि काही माहिती देण्यासाठी मुख्यालयतून हिंदी अधिकारी आलेले होते.
आम्ही सर्व कामात व्यस्त, उपायुक्त स्वतः सीटवर आले आणि सर्वांसमोर ह्या मीटिंगमध्ये ऑफिसच्या प्रगतीबाबत माहिती द्यायला मला सांगितले.
मी विचार करतच होते, सर्व ख्यातिप्राप्त माणसांसमोर कशी भाषण देऊ, तेवढ़्यात ते म्हणाले पदावरून कोणीच लहान-मोठं होत नसतं बरं का, माझ्यासाठी ह्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य योग्य आहे. तसे बाबा नेहमी म्हणायचे, पण प्रत्यक्षरूपाने त्या दिवसापासून माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.