STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Romance Tragedy Inspirational

3  

शब्दसखी सुनिता

Romance Tragedy Inspirational

प्रेम असाव तर अस.

प्रेम असाव तर अस.

16 mins
290

    त्याला अचानक दहा वर्षांनी मनिषा तिच्यासमोर तो हाॅस्पिटलमध्ये निपचित पडलेलात्याचा चेहरा पाहीला, तिला कसतरीच झाल.त्याला काय झाल असेल ? ती खुप घाबरलीतिच्या डोळ्यांतुन अश्रू वाहत होते. ती केबीनमध्ये येउन तिच काम करत होती. अश्रु काहीकेल्या थांबेना... तेवढ्यात पाठीमागुन तिलाकुणीतरी हात लावला. " काय झाल मनु "विवेक तिचे मिस्टर तिला विचारत होते.तिने अश्रु पुसले. स्वतःला सावरल. त्यानेतिला पाणी दिल, आणि विचारल. " मनु, आर यु ओके. " " हो मी ओके आहे " तो तिला समजावतो." अश्या केसेस रोजच येतात मनु तुलामाहीती आहे ना " पण आज काय झाल तुला ?तिच्या चेहर्‍यावरून त्याला समजत की हीखुप घाबरली आहे. तोच तिला जवळ घेतो.ती सावरते स्वतःला. शांत बसते. विवेक त्याच्याकामाला निघून जातो. ती भुतकाळात हरवूनजाते.     


काॅलेजचा पहिला दिवस मनिषाला अजूनहीआठवतो. पल्लवी आणि ती एका छोट्याशा गावातुन तालुक्याला काॅलेज शिकायला रोजजात होत्या. मनिषा गावातील श्रीमंत कुटुंबातीलएकुलती एक कन्या. दोन भावांमध्ये सर्वातलहान त्यामुळे तिचे वडील आबासाहेब तिचाखुप लाड करायचे. आबासाहेब गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. पंचक्रोशित त्यांची चांगलीच ओळख होती. राजकरणात नावाजलेल नाव.गावचा कारभार ही तेच बघायचे. त्यांचा मोठावाडा होता. रोज कितीतरी लोक कामासाठीत्यांच्या वाड्यावर यायचे. त्या काळातही मनिषाने खुप शिकाव आणि मोठ व्हाव तिच्याआबासाहेबांना वाटायच. घरी सगळी नोकरमाणस ठेवली होती. काॅलेजचा पहिला दिवसमनिषा आणि पल्लवी सोबत निघाल्या. तिलाबसमध्ये एक मुलगा चढला आणि त्यांच्या समोरच्या सिटवर बसला. तिची आणि त्याची मध्येचनजरानजर होत होती. काॅलेजमध्ये गेल्यावर तो तिला तिच्याच वर्गात बसलेला दिसला.तिला तो खुप आवडला होता. मनिषाला समजतनव्हत की आपल्याला अस का होतय. रोजच बसने तिला तो भेटायचा. रोजच त्यांचीनजरानजर व्हायची. आता दोही मनिषाला बघायला लागला होता. पण त्याचा मित्र भुषणगावातीलच मुलगा. त्याला मनिषा चांगल ओळखत होती. त्याने त्याला सदानंद नावानेहाक मारली तेव्हा तिला त्याच नाव समजल.रोजच दोघांची भेट व्हायची. पण अजुन बोलणझालेल नव्हत. त्या काळात तर मोबाईलहीनव्हता. मुल जास्त मुलींशी बोलत नव्हते.दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पणत्यांना समजत नव्हत. दिवसामागुन दिवस जातहोते. काॅलेजमध्येही ते दोघे समोरासमोर भेटायचेपण बोलायला दोघेही घाबरायचे. सहा महीनेनिघून गेले.


दिवसामागुन दिवस जात होते.एक दिवस सदानंद आजारी असल्यामुळे आलाचनाही तेव्हा मनिषाला काॅलेजला जायलाच नकोवाटत होत. तेव्हा पल्लवीच्या हे नजरेतुन सुटलनाही तिने विचारल... " मनु , तु त्या सदानंदच्याप्रेमात तर नाहीस ना पडली..."मनिषा - " नाही ग, काहीतरीच काय बोलते... "पल्लवी - " नाहि मनु, तुला सहज विचारल ग,तो खुप चांगला मुलगा आहे. पण तुला तुझेआबासाहेब कसे आहेत माहीती आहे ना."मनिषा - " हो ग, मला माहीती आहे. मी नाही अस काही वागणार आणि तु जरा हळू बोल ना,कुणी ऐकल तर आपल्या दोघींची काही खैर नाही,"पल्लवी - " ये आपल्याला कुणाची टाप आहेबोलायची ग, "  मनिषा - " तेही खरय म्हणा, आबासाहेंबांना लोकखुप घाबरतात... तर आपल्याला नाही कुणीबोलायची हिम्मत करणार..."     मनिषा काॅलेजमध्ये पोहचली पण तिच मनलागतच नव्हत. तिला पहिल्यांदा सदानंदचीखुप काळजी वाटत होती. तो का आला नसेल ?ठीक तर असेल ना ? बसमध्येही तिला चुकल्यासारखहोत होत पण विचारायच कुणाला त्याच्याविषयी.तेव्हा ती हिंमत करून सदानंदचा मित्र भुषणलाविचारते... " सदानंद का नाही आला आजकाॅलेजला " त्याने सांगीतल की अग तो आजारीआहे. तिला आता अजुन काळजी वाटत होती.तो आणि ती एकाच गावात राहत होते. पणइच्छा असूनही ति त्याला भेटु शकत नव्हती.दोन - तीन दिवसांनी तिला काॅलेजमध्ये सदानंददिसला. तो खुपच हँडसम दिसत होता. आजत्याने फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्यारंगाची पँट घातली होती. दिसायला तो भारीचहोता. मनिषाला तो खुप आवडत होता. पणतिने कधी कुणाला सांगीतल नाही. पण काहीम्हणा... तो आज तिच्या नजरेसमोर होता.तिला मनाला बर वाटल. त्याने आज पहिल्यांदातिच्याकडे बघुन स्मितहास्य केल. तिला खुपछान वाटल.     


  त्या दिवशी त्यांच काॅलेज सुटल. पहिल्यांदातिला सदानंदने आवाज दिला. त्याचा आवाजऐकून ती थांबली. ती आज एकटीच होती. पल्लवीआलेली नव्हती आज. तिला मनातुन थोडी भीतीवाटली. सदानंदने मनिषाकडून नोट्स घेतले." उद्या परत देतो " अस सांगितल. तेव्हा प्रथमते दोघे बोलले. मनिषा त्याला त्याच्याविषयीविचारत होती. त्याने तिला सगळ सांगितल.ते दोघे बसस्टाॅप पर्यंत सोबत चालत होते.ती ही तिच्याविषयी सांगु लागली. तेव्हा तोतिला म्हणाला... तुम्हांला कोण ओळखत नाहीगावात मला तुमच्याबद्दल माहीती आहे.तेव्हा मनिषाने त्याला मला तु मनिषा म्हटल तरी चालेल म्हटल. इतक्या दिवसांपासुनसदानंद मनिषाला बोलायला घाबरत होता.ती त्याला आवडती होती पण त्याने कधीहीव्यक्त केल नव्हत. दोघांची हळूहळू मैत्रीबहरत होती. दोघेही बोलल्यामुळे त्यांना खुपछान वाटत होत. सदानंद मनिषाशी जपुन बोलायचा. कारण त्यावेळी अस प्रेमाच वगैरेकुणी ऐकल तरी मुलींना घरचे काॅलेजलापाठवत नव्हते. त्याच मनिषावर प्रेम करत होता.त्यांची मैत्री आहे ना तेच त्याच्यासाठी खुप होत.सदानंद आपल्या आईसोबत गावातच राहायचा.त्याची आई शेतातील काम करायची आणितोही आईला काॅलेज सुटल्यावर काम करूनमदत करायचा. सदानंद खुप हुशार होता.त्याचे वडील तो लहान असताना गेले होते.तो इतर मूलांपेक्षा खुप वेगळा होता.


चांगलं शिकुन नोकरीला लागायच, आणि आईलासांभाळायच... अस त्याच स्वप्न होत. तो खुपमन लावून अभ्यास करायचा. परिस्थितीने गरिब असला तरी मनाने खुप श्रीमंत, कुठल्याहीमुलींकडे न बघणारा, मुलींचा आदर करणारा होता. नाटकात भाग घ्यायचा आणि खेळातही तो पुढे होता म्हणूनच मनीषाला तो खुप आवडायचा.सदानंद होताच असा कुणीही मुलगी त्याच्याप्रेमात पडेल. मनिषा त्याचा स्वभाव, मनआणि विचार तिला खुप आवडायचे. तिनेत्याला पहिल्यांदा पाहील्यावरच त्याच्या प्रेमातपडली होती. मैत्रीतुन ते दोघे कधी एकमेकांच्याप्रेमात पडले त्यांना कळल देखील नाही.मनिषा खुप घाबरत होती की आबासाहेबांनाजर काही कळल की मी त्या मुलाच्या प्रेमातआहे वगैरै, त्याच्याशी बोलते, भेटते तर ते सदानंदला काही करतील एकतर ते दोघेहीमायलेकर कष्ट करून खातात आणि माझ्यामुळेसदानंदच स्वप्न अपूर्ण नको राहायला. असेएक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते.मनिषा सदानंदशी फार कमी बोलायची. ती त्याला टाळू लागली होती. बसमध्ये किंवाकाॅलेजमध्येही तो समोर असला की ती दुसरीडेपाहायची. सदानंदला हे समजल होत. तो हीयावरून काही बोलला नाही. त्याच प्रेम होतपण जर व्यक्त केल आणि हिच्या घरी समजलतर काय अवस्था होईल याची त्याला कल्पनाहोती. तो काही बोलत नाही. असेच दिवसामागुनदिवस जातात. काॅलेजमध्ये कार्यक्रम होता.तेव्हा पहिल्यांदा मनिषाने साडी नेसली होती.साडीमध्ये ती खुप सुंदर दिसत होती. केसमोकळे सोडले होते.


अजूनच तिच सौंदर्य खुलुनदिसत होत. आज सगळ्यांची दृष्टी तिच्यावर होती. पण मनिषा कुणाला भाव देत नव्हती.ती मुलांशी बोलत नसे. सदानंद आज तिच्यातचहरवून गेला होता. हे त्याचा मित्र भुषणनेपाहील. तेव्हा त्याने त्याला विचारल..." तुला मनिषा आवडते का सदा ? "तेव्हा सदानंदने सांगितल की,भुषण - " हो मला मनिषा आवडते, माझ प्रेमआहे तिच्यावर... " " अरे यार मग सांग ना तिला जाऊन रोजचबघत असतोस, ती दिसली नाही की कासावीसहोतोस. किती प्रेम करतो रे तिच्यावर ,अरे मगएकदा तुझ्या मनातील भावना तिला सांग ना..."सदानंद - " भुषण, तुला सोप वाटत का रे ,मला नाही जमायच हे प्रेमाच वगैरे तिला सांगण."आणि तशीही ती कुठे आणि मी कुठे ? आमच्या दोघांत जमिन आसमानचा फरक आहेवेड्या... मग तुच सांग कस मी तिला सांगणार."भुषण - " सदा, अरे वेड्या प्रेम हे प्रेम असत.प्रेम ही खुप सुंदर भावना आहे. आणि प्रेमहे ठरवून होत नाही रे "सदानंद - " तुझ बरोबर आहे पण नको आहेयार माझ्याकडून तिला सांगण जमायच नाही "भुषण - " आरे वेड्या, प्रेम करतोस ना... मगएकदा सांगुन बघ ना... तुला बोलायला जमतनाही ना. मग एखाद प्रेमपत्र लिही ना. ही माझीआयडीया तुझ्या कामी नक्की येईल बघ.कार्यक्रम संपला. त्या दिवशी पल्लवी आणिमनिषा दोघीही सोबत बसमध्ये होत्या. आज सगळी मुले त्यांच्याकडे बघत होती.परश्याही आज मनिषाकडे बघत होता. हे भुषणने सदानंदला दाखवल आणि सांगीतलकी तु आजच ते पत्र लिही आणि तुझ्या मनातलं मनिषाला सांग.


मी आहे तुझ्यासोबत.सदानंदलाही हेच योग्य वाटत होत. मनिषामात्र आज खुप आनंदात होती. पल्लवीलातिने तिच्या मनातल सांगितल पहल्यांदा आणितिलाही ते पटल. तिला माहीती होत की मनिषाचखरच खुप प्रेम होत सदानंदवर जे तिच्यावागण्यातुन आणि बोलण्यातुन तिला दिसत होत. तिनेही तिला सांगितल की हे सगळ तुएक दिवस सदानंदला भेटुन सांग. आपलीमैत्रिण सोबत आहे म्हटल्यावर मनिषालाथोडी हिंमत आली.    एक दिवस सदानंदने आपल्या मनातल त्याच्या सुंदर हस्ताक्षरात एका चिठ्ठीवर लिहल.दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे काॅलेज भरल.ती एकटीच काहितरी लिहत होती. तेव्हा भुषणनेत्याला आताच देऊन टाक सांगीतल मग सदानंद मनिषाजवळ गेला आणि म्हणाला." मनिषा, मला तुला काही बोलायच आहे "मनिषाला समजेना की सदानंदला अचानककाय बोलायच आहे. तिनेही म्हटल बोल नासदानंद तुला काय बोलायच आहे. तर याचीतिच्यासमोर बोलायची हिंमत्तच नाही झाली.पहिल्यांदा एका मुलीसमोर अस तो उभाराहून बोलत होता. त्याला समोर बोलायलाजमलच नाही. त्याचे हात कापु लागले. मनामध्ये थोडीसी भिती वाटली. एवढा वेळहीनव्हता. कुणीही येऊ शकत होत, तर शेवटीसदानंदने सांगीतल की मनिषा मला जे तुलाबोलायच आहे, ते मी या चिठ्ठीत लिहलय.ती ति चिठ्ठी त्याने तिच्या हातात देऊन तोआणि भुषण बाहेर निघून गेले. भुषणला वाटलकी आपला मित्र बोलला असेल तिला समोरपण याने जमल नाही म्हटला तर भुषण खुपबोलला सदानंदला की तुला बोलायलाही जमत नाही. तेव्हा दोघेही खुप हसले. दोघेहीखुप चांगले मित्र होते. एकमेकांसाठी काहीहीकरायची तयारी होती. पण भुषणला हे माहितीहोत की सदानंदच मनिषावर खुप प्रेम आहे.आणि मनिषाही आता कधी सदानंद नाहीआला तर भुषणलाच विचारायची. तो हितिला सांगायचा.      


त्या दिवशी काॅलेजमध्ये मनिषाला कधीती चिठ्ठी वाचते अस झाल होत. ती आज खुपखुश होती. तर इकडे सदानंद घाबरला होता.आपण आपल्या प्रेमभावना तिच्यापर्यंतपोहचवल्या खर्‍या... पण ति काय म्हणेलतिच्या उत्तराची वाट बघत होता. त्याच कश्यातहीलक्ष लागत नव्हत. मनिषाने ते सदानंदने लिहलेलपत्र वाचल. खुप सुंदर भावना त्याने व्यक्त केल्याहोत्या. तिचही त्याच्यावर खुप प्रेम होत. नकळततिच्या डोळ्यांतुन आनंदाश्रु वाहू लागले. तिनेते पत्र तिच्या डायरीत लपून कपाटात ठेवल.खुप वेळा वाचल. तिला कळत नव्हत कीआपण त्याला आपला होकार कसा कळवावा.तिनेही त्याला चिठ्ठीच लिहली. दुसर्‍या दिवशीतिची वही त्याला दिली. सदानंदला जे समजायचते समजल. त्याने वही घेतली. काॅलेज सुटेपर्यंतत्याने ते वाचुनही घेतल होत. तिने होकारदिलाय म्हटल्यावर सदानंदला खुप आनंद झाला.त्याने भुषणला ही सांगितल. त्यालाही आपलामित्र एवढा खुश पहील्यांदा दिसला. दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. एकमेकांनालपून छपून भेटायचे कारण दोघांना कुणीएकत्र बघितल तर ती भिती होती. रोज तरसर्वांसमोर बोलता येत नसे मग ते बसमधुनउतरल्यानंतर एकमेकांना चिठ्ठि द्यायचे. आपल्यामनातल एकमेकांना पोहचवयाचे. त्यावेळेसभ्रमणध्वनी नव्हताच. त्यामुळे रोज अस बोलतायेत नसे. कधी कधी तर नुसत बघाल लागेकारण सर्वांसमोर बोलताही येत नसे. दोघेहीमनापासून एकमेकांवर प्रेम करायचे. त्यांचपहिल वर्ष संपुनही गेल. त्यांना कळलही नाही.रोज जाता येताना भेटायचे पण गावात गेल्यावरएकमेकांकडे बघतही नव्हते. कुणाला माहीतीनाही व्हाव म्हणून जपून वागायचे. सदानंद तरमनिषाला खुप जपायचा, कुणी तिला नावनाही ठेवल पाहीजे. म्हणुन तो भेटताना खुपकाळजी घ्यायचा. पण पुढे मंदीरात, यात्रेत तेभुषण आणि पल्लवीमुळे भेटायचे. दोघांचेहीप्रेमाचे दिवस खुपच छान चालले होते. ते मनानेखुप जवळ आले होते.     


दुसर्‍या वर्षाला असताना सदानंदने मनिषासाठी एक भेटवस्तु घेतली होती. ते होतघड्याळ. खुप महागड होत. तिला नक्की शोभेल.म्हणून त्याने तिच्या वाढदिवसाकरता घेतल. तीकाॅलजला नथुन थटुन आली. नेहमीसारखीचखुप सुंदर दिसत होती. त्याने बसमध्येच तिलाइशारा करून थांबायला सांगीतल तसा तिनेहीमानेने होकार दिला. काॅलेजजवळच्या स्टाॅपवरते दोघे भेटले होते. सकाळची वेळ होती. खुपप्रसन्न वाटत होत. मनिषा तिथे जाऊन थांबली.त्याची वाट बघत तिला समजत नव्हत कीसदानंद बसमधुन उतरला आणि मध्येच कुठेगायब झाला ? ती त्याला इकडे तिकडे शोधते.तो तिच्यासमोर हजर. मनिषा - " काय रे सदा, मला वाटल तु विसरूनगेला की काय काॅलेजला निघून ? "सदानंद - " मनु, असा कसा जाईल मी विसरूनआज एवढा खास दिवस आहे...हॅपी बर्थ डे मनु तुला वाढदिवसाच्या खुप खुपशुभेच्छा आणि तो तिला मोगर्‍याच्या फुलांचागजरा, ते घड्याळ पॅकींग केलेल सगळ आणितिला आवडणार गोड चाॅकलेट देतो... हे सगळपाहुन ति खुप खुश होते. मनिषा - " सदा, तु एवढ केलस माझ्यासाठीअरे कधी जमवलस " सदानंद - " मनु ये पण तुला खरच भेटवस्तु आवडली ना, नाहीतर तु चल माझ्यासोबतआपण घेऊया दुसर तुझ्या आवडीच..."" तुला आज काय गिफ्ट देऊ पाहीजे ते बोल  मनु मी देऊ शकतो "मनिषा त्याचा हात हातात घेऊन सांगते" सदा, मला फक्त तुझी साथ पाहीजे बस "दोघांच्याही डोळ्यांत नकळत पाणी येत.मग सदानंद तिला म्हणतो, " मनु , आज तुझास्पेशल दिवस आहे अस आज रडायच नाही.मी तुझ्या डोळ्यांत अश्रु नाही बघू शकत.बराच वेळ जातो. काॅलेजच पहिल लेक्चर संपून जात. दोघेही काॅलेजमध्ये पोहचतात. आजमनिषाला तिच्या मनासारख झाल्यासारखवाटत होत. तिचा वाढदिवस तर नेहमी यायचा.पण आज एक स्पेशल व्यक्ती तिच्या जीवनातआली होती. तो म्हणजे सदानंद. त्यामुळेतिला हा वाढदिवस खुप स्पेशल वाटत होता." स्पेशल प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरीव्यक्ती असते जी कोणतीही अपेक्षा न ठेवताजिवापाड प्रेम करत असते.      


सदानंद आणि मनिषा एकमेकांवर खुपप्रेम करत होते. दोघेही मनाने खुप जवळ आलेहोते. दोघांनाही एकमेकांची साथ हवी होती.त्यांना एकमेकांची सोबत हवीहवीशी वाटायची.खुप सवय झाली होती एकमेकांची... प्रेमाचाप्रवास चांगला सुरू होता. कुणालाही आताचकाही कळू द्यायच नाही अस दोघांनी ठरवलेलहोत. पहल्या भेटीपासुन दोघांच्या जीवनातप्रेमाचा बहर यायला लागला होता. दोघांचहीजीवनच बदलून गेल होत. दोघेही एकमेकांसाठीजगत होते. सदानंद तर मनिषाशिवाय राहू शकतनव्हता. त्याने मनिषाला आयुष्यभर साथ द्यायचवचन दिल होत. दोघांनाही पुढे काय होईलयाची कल्पना नव्हतीच. मनिषालाही सदानंदशिवाय करमत नसे. प्रेम म्हणजे नजरेतुन हृदयापर्यंतचा एकगोड प्रवास...प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हृदयपण एकच श्वास...    दोघांचही हे शिक्षणाच शेवटच वर्ष होत.हे वर्ष दोघांनी खुप आनंदाने मस्त एकमेकांच्यासोबत घालवल. त्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेउन जगत होते. दोघेही लपून छपून भेटत होते.पण काॅलेजच्या तिकडेच गावात कुणालाहीखबर नव्हती. काॅलेजच्या दिवसांत त्यांना एकमेकांची खुप सवय झाली. ते एकमेकांनासोडून राहुच शकत नव्हते. खुप मनापासुनप्रेम करत होते. खुप छान दिवस जात होते.सदानंद आणि मनिषा एक दिवस भेटले.तेव्हा मनिषाने त्याला सांगितल " सदा मीतुझ्याशिवाय राहूच शकत नाही. मला तुझीसाथ आयुष्यभर पाहीजे. " तेव्हा सदानंदनेतिला सांगितले की , " मनु , माझही तुझ्यावरखुप प्रेम आहे आणि मीही तुझ्याशिवाय राहूशकत नाही. पण त्याने तिला आपल्या मनातीलखंत बोलून दाखवली. तुमची परिस्थिती, कुटुंबआणि सगळ्या गोष्टींत खुप फरक आहे तरतेव्हा मनिषाने सांगितल की , प्रेम हे परिस्थिती,गरिब - श्रीमंत, रंग , रूप , जात, धर्म याचाविचार करून नाही होत ना... मला फक्त तुझीसाथ पाहीजे मग कशीही परिस्थिती असो मीतुझ्यासोबत ॲडजेस्ट करेल आणि मी तुझ्यासोबत जास्त आनंदी राहू शकते. मनिषाचबोलण आणि तिचे विचार ऐकून सदानंदच निम्मटेन्शन कमी झाल होत. तो म्हणतो की काॅलेजसंपल्यावर आपण लग्नाच विचार करू. मीतुझी साथ द्यायला तयार आहे. आधी मी नोकरीमिळवतो. तेव्हा मनिषा खूप खूश होते.


ते दोघे काॅलेजनंतर पुढिल सोबत आयुष्याची स्वप्नेरंगवत होते. शेवटी पेपर सूरू झाले. हे शेवटचवर्ष होत म्हणुन दोघेही खुप अभ्यास करत होते.म्हणून दोघांची भेटच झाली नव्हती. फक्त रोजनजरानजर व्हायची तेवढच बाकी रोज त्यांनाबोलता येत नसे. दोघांनाही भेटायच होत. तेव्हामनिषा सदानंदला खुप आठवण येते, तुलाशेवटच्या पेपर संपला की त्यादिवशी भेटायचआहे. नंतर ती मामाकडे गावी जाणार होती.सदानंदला तर तिच्यापासुन दुर जाण्याची कल्पनाहीकरू शकत नव्हता. आता काॅलेज संपणारती आपल्याला भेटु शकत नाही म्हणून तो मनिषाची चिठ्ठीला उत्तर म्हणून तोही चिठ्ठीलिहतो. त्यात शेवटच्या दिवशी पेपर संपल्यावरभेटुया... अस तो शेवटी लिहतो. मनिषाला तीचिठ्ठी देतो, ती पेपर सुटल्यावर घरी जाते.ती नेमकी ती चिठ्ठी वरती ठेवते आणि नेमकातिचा लहान भाऊ राजु ती चिठ्ठी उचलतो आणिबघतो. त्यात सदानंद मुलाच नाव असत.भेटुया वगैरे लिहलेल असत. त्याला मनिषाचाखुप राग येतो. तो त्याच्या मोठ्या भावालाआणि आबासाहेबांना सांगतो. मनिषा खुपलाडकी आणि एकुलती एक ते तिला दुखावूशकत नव्हते. तेव्हा त्या तो मुलगा कोण आहेयाची गावात चौकशी केल्यावर तो आपल्याआईसोबत राहतो त्यांना कळत. ते दोघे भाऊआणि दादासाहेब त्याच्या घरी रात्रीच काहीमाणसे पाठवतात. गाडित माणसे जातात.सदानंदच्या घरी जाउन त्याला धमकवतात.तो हूशार असतो. सर्वांना माहीती असतो म्हणूनआबासाहेब त्याला मनिषाचा नाद सोड नाहीतर तु उद्या तिला भेटला तर बघ तुला इथेचमारून फेकून देऊ. त्याला धमकी दिली.त्याची आईही खुप घाबरते. त्यांनी सांगीतलकी त्याच्या आईला तुम्ही आणि तुमचा मुलगाइथे ऊद्यापासुन थांबू नका. पेपर संपला कीमनिषाला न भेटता निघून जायच आणि जरतु भेटला तर परिणाम वाईट होतील. समजल.ते सगळे निघून गेले.     


त्या रात्री सदानंदची आई खुप रडत होती.तिने सदानंदला समजावल. हे लोक खुप मोठेआहेत. यांना प्रेम वगैरे असल काही समजत नाही. आपण त्यांच्यापुढे काहीही करू शकतनाही. त्यालासमजल की काहीतरी गडबड झालीअसेल. त्या रात्री तो भुषणकडेही जाऊ शकतनव्हता. आईचीही त्याला काळजी वाटत होती.तो मनिषापासुन उद्यापासुन दुरावणार होता.म्हणून खुप रडत होता. त्याला खुप त्रास होत होता.त्याला तिचीही काळजी वाटत होती आपणजर भेटलो तर ते घरचे मनिषाला त्रास देतील,मारतील आणि तिच पुढच शिक्षण थांबेलतिच स्वप्नही अपूर्ण राहील.तिच्या वडीलांना नाही प्रेम मान्य. पण मीमनिषाला खोटही नाही बोलू शकत. तिलाफक्त एकदा भेटुन सगळ सांगायच तो ठरवतो.त्या रात्री तो खुप रडतो. आईही ऊद्या गावसोडून मामाच्या इकडे मुंबईला जाणार होते.तो रात्री तिच्या इथे एकदा तिला भेटायला जातो,पण व्यर्थ तिच्या घराच्या इथे खुप लोक होती.त्याला तिला भेटता आलच नाही. सकाळ झाली.मनिषा आज खुप छान तयारी करून काॅलेजलाआलेली होती. ती खुप आनंदात होती. तिलाआज पल्लवी खुप चिडवत होती. ती तशीलाजत होती. तिला आज सदाला मनभरूनभेटायच होत. बोलायच होत. त्या दोघीही नेहमीपेक्षा लवकर आलेल्या होत्या. त्याची वाट बघतहोती. पण तो आलाच नाही लवकर. पेपरलाजाताना तो तिला दिसला. ती खुप आनंद झाला.तस त्यानेही तिला एकदा मनभरून बघितल.मनाने खूप रडत होता. तो आतुन पूर्ण तुटलाहोता. दोघेही त्यांच्या वर्गात पेपरसाठी निघूनगेले. भुषणही त्याची वाट बघून होता. पणभेट झालीच नाही. इकडे मनिषा पेपर सोडवत होती. तिला सदाला कधी भेटते अस झाल होत.हा वेळ लवकर संपण्याची ती वाट बघत होती.मध्येच घड्याळ बघत होती आणि हसत होती. सदानंदने लवकर कसाबसा पेपर पूर्ण केला.तो आजारी असल्याच कारण सांगुन बाहेर पडला. त्याने दुरून लपून फक्त एकदा तिलामनभरून बघितल आणि तो काॅलेजमधुनबाहेर पडला. त्याने बाहेर आल्यावर सगळमनभरून एकदा बघुन घेतल. आणि परतत्याने मागे वळून बघितल नाही. घरी आल्यावरदोघांनी मायलेकरांनी सामान घेतल नि ते रेल्वेस्टेशनकडे निघाले. जाताना एकदा गावाच्याबाहेर पडताना त्याने सगळीकडे बघितल.खुप आठवणी... आणि त्याच प्रेम सोडुनतो आज ते गाव सोडून कायमचा मुंबईला निघून गेला.   


 त्या दिवशी मनिषाने काॅलेज सुटल्यावरसदानंदची खुप वाट बघितली. तो काॅलेजमधुनलवकर निघून गेल्याच समजल. ती रडायला लागली. त्याच्या काळजीने की त्याला काय झाल ? तिचा त्याच्यावर खुप विश्वास होता.तेव्हा पल्लवीने तिला धीर दिला. सांभाळल.भुषणने त्याला सगळीकडे शोधल व इतरमित्रही शोधत होते. पण तो कुठेही नाही भेटला.शेवटी मनिषाची हालत बघुन भुषण त्यादोघींना त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे कुलुप होत.शेजारच्यांनी सांगितल की ते निघून कधीगेले... कुठे गेले ? कुणालाही माहीती नाही.तेव्हा मनिषाला धक्काच बसला. भुषणला विश्वास होता की त्याचा मित्र असा नव्हता.तो असा पळून जाऊशकत नाही. पण कुठेगेला काहि कळायला मार्ग नव्हता. त्यालाकाहितरी गडबड वाटत होती.


मनिषाला त्या दिवशी सदानंदचा थोडा रागच आला.हा असा अचानक न भेटता कुठे निघून गेला.ती घरी गेली. त्यादिवशी कुणाशीही काहीबोलली नाही. तिच्या घरच्यांना सगळ माहीतीहोत. त्यांनी तिला मामाच्या गावाला पाठवल.ती ही कोकणात मामाच्या गावी गेली. परंतुती सदानंदला विसरू शकत नव्हती, तिच खुपप्रेम होत. तिने बरेच दिवस अन्नपाणी सोडलहोत. तिला खुप त्रास झाला. तेव्हा घरच्यांनीकाॅलेज संपल्यावर एका महिन्यात तिच लग्नजमवल. त्यांच्याच नातेवाईकात एक डाॅक्टरशिकलेल्या मुलाशी विवेकशी मनिषाच लग्नजमल. ती अजुनही मनातुन सदानंदला विसरूशकत नव्हती. तिने त्याची खुप वाट बघितली.तिला त्याला एकदा भेटायच होत. फक्त एकदाअस काय झाल ? तु प्रेम केल तर असा नभेटताच न सांगताच का सोडून गेला हे तिलाजाणुन घ्यायय होत. तो भेटुन तिला अडचणसांगितली असती तर तिने मान्यही केलअसत. कारण तिच खर प्रेम होत. पण फक्त एकदा त्याने बोलायला पाहीजे होत. ती त्याचीतो येईल या आशेवर जगत होती. शेवटी रिझल्टहीलागला सदानंद काही आलाच नाही. इकडेमनिषाच आणि विवेकच लग्न घरच्यांनी मोठ्याथाटामाटात लावून दिल. तिला खुप दुःख झाल.त्याच्या येण्याची वाट बघितली. पण तो आलाचनाही. नशिबाने विवेक खुप समजदार नवराभेटला होता. ती फार कमी बोलायची आणिउदास राहायची. ती आपल्या संसारात रमली खरी पण सदानंद तिच पहिल प्रेम होत. तिनेसगळ विसरून आपल्या संसाराला सूरूवात केली.मनाच्या एका कोपर्‍यात त्याच्या आठवणींनाजपुन ठेवल होत. ती पुढे शिकली. संसारातरमली. जबाबदारी अंगावर पडली तशी तीसगळ निभवायला लागली.


विवेकच तिच्यावर खूप प्रेम होत. माझा नवरा हेच माझ प्रेम आहे.ति विवेकला विसरली होती. फक्त तिला एकमनाला लागल होत. त्याने अस शेवटच्या भेटीच्या वेळी का केल न भेटताच निघून गेला ? त्याने तिच मन खुपच दुखावल होत.विवेकच मोठ हाॅस्पिटल होत. तो आणि त्याचेबाबा दोघेही ते चालवत होते. विवेक डाॅक्टरहोता. मनिषाच हाॅस्पिटलच्या कामात त्यालामदत करायला जायची. तिला दोन मुलेहीहोती. त्यांचीही सगळ करून ती हे करायची.तर आज तिला हे सगळ आठवल. दहा वर्षांपूर्वीचेतिला काॅलेजच जीवन आठवल ते सदानंदलाबघितल्यामुळे. तिला आज त्याची काळजी वाटतहोती. तिला आत जाउन त्याला एकदा बघायलामन करत होत. पण विवेकने तिला घरी जाऊयाम्हटल. ते दोघेही घरी गेले पण मनिषा अजूनही हाॅस्पिटलमध्ये होती. कधी त्याला भेटते एकदातो ठिक आहे कि नाही अस तिला झाल होत.दुसर्‍या दिवशी तो बरा दिसत होता. तिने देवाचे आभार मानले. त्याला थोडस फ्रेशबघून तिला छान वाटल मनाला. सदानंद त्याला दोन मुले होती. त्याला छानआणि समजून घेणारी बायको मिळालेली होती.छान संसार चालू होता. तो त्या गावात कधीहीपरत गेला नव्हता. कुणालाही भेटला नव्हता. मनिषाविषयी त्याने आपल्या बायकोला सगळसांगितल होत. त्यांची शेवटची भेट झाली नाही.त्याला तिच्या घरच्यांमुळे पुढे जाता आल नाही. सगळच तिला सांगायच होत. ते त्याच्या मनातहोत. फक्त एकदा तिला भेटुन त्याला हे सगळसांगायच होत.


सदानंदची बायको सारिका त्याच्याजवळ थांबली होती. ती दुपारी तिथेनव्हती. तेव्हा मनिषाला राहवल नाही. ती तिथे गेली. तिला पाहुन सदानंदही आश्चर्यचकीत झाला. " मनु तु आणि इथेअग कशी आहेस ? किती वर्षांनी भेटलीस ?त्याचे डोळे भरून आले आणि मनिषाच्या डोळ्यांतून तर अश्रुच्या धारा वाहत होत्या.तो उठून बसला. ति शेजारच्या खुर्चीत बसली.दोघांनी एकमेकांनबद्दल खुशाली, आपल्याकुटुंबाविषयी आणि लग्नाविषयी सगळं

सांगितल. त्याला तिचा छान चालू असलेलासंसार, नवरा, मुले आणि त्यात रमलेलीत्याची मनु... विषयी ऐकून त्याला तिचा अभिमानवाटला. सगळ बोलून झाल्यावर ती म्हणालीमला काहीतरी विचारायच आहे आणि सदाम्हणाला... " मनु , मलाही गेल्या दहा वर्षांपासुनफक्त एकदा तुला भेटुन हे सगळ सांगायचहोत. " तुला आठवल तो दिवस आपणभेटणार होतो. त्यादिवशी मी तुला नाही भेटु शकलो. कारण तुझ्या घरच्यांना आपल्याप्रेमाबद्दल समजल होत. त्यांनी मला धमकीदिली होती. मी धमकीला नाही घाबरलो.मला तुझी काळजी होती. तुझी बदनामी होऊनये, तुला घरच्यानी त्रास देऊ नये म्हणुनमी नाही येऊ शकलो, तुझ्या घरी येण्याचाप्रयत्नही केला पण नाही पोहचु शकलो. तुझ्या आबासाहेबांनीच मला ते गाव सोडायला लावलपण माझ तुझ्यावर खर आणि मनापासुनप्रेम होत. मी तुला फसवल नाही मनु , पणआपल्या नशिबात नव्हत. हेच मला तुलासांगायच होत. ती ते ऐकुन खुप रडत होती.आज तिला समजल होत खर की सदा असाका गेला होता निघून. तिने सदाला म्हटल,अरे वेड्या सदा, " तुझ प्रेम खर होत. मी तुला चुकीचं नाही समजले कधीही. " 


मी तुझी खूप वाट बघितली पण मग घरच्यांनी विवेकसोबत माझ लग्न लावुन दिल. मी ही तुझीमाफी मागते. " माझही प्रेम खर होत पणहे अस झाल. " त्याला मनावरच ओझ उतरल्यासारख वाटत होत. मनातल मनिषाला सांगुनतो मोकळा झाला होता. त्याने तिला समजावल" आपण दोघांचही खुप प्रेम होत पण आपणएकत्र नाही आहोत म्हणून काय झाल ?आपल्या दोघांचा छान जोडीदार मिळाले. सुखातसंसार चालू आहे. आता भेटही झाली आपलीसगळे गैरसमजही दुर झाले. मला सांग मनु, "कोण म्हणत प्रेम यशस्वी होण्यासाठीलग्न कराव लागत. एकमेकांना सुखात पाहणेहे पण प्रेमच असतं."  प्रेम लग्न करणे कींवा एकमेकांसाठी जीव देणेनाही तर एकमेकांचे न होताही नेहमीएकमेकांनसोबत राहणे. एकमेकांना आयुष्यभरसाथ देणे. अस असत प्रेम... अग तुला माहीतीआहे ना... राधाकृष्ण किती प्रेम होत दोघांचएकमेकांवर जीवापाड... आजही प्रेम म्हटल कीत्यांच नाव लोक घेतात... ते तर देव असुन हीत्यांच इतक प्रेम असुन लग्न नाही होऊ शकलत्यांच मग मनु, आपण तर सामान्य माणस आहोत.आपल पण अस होऊ शकत ना... बघ..प्रेम असाव तर राधा कृष्णासारख लाग्नाच्याधाग्यात बांधल नसल तरी ते कायम हृदयातजपलेल... तुला माहीती आहे मनु," एकदा राधेने भगवान श्रीकृष्णाला विचारल कीतुम्ही प्रेम माझ्यावर केल आणि लग्न रूख्मिणीसोबत , असं का ? "तेव्हा भगवान " श्रीकृष्ण " हसले आणि म्हणाले" राधे " लग्नाला तर दोन लोक पाहीजे आपणतर एकच आहोत....! 


तो इतक छान बोलत होता मनिषा ऐकतच होती.सदा , आजही तसाच आहेस बिलकुल बदललानाही. मला पटलय किती छान सांगीतलस रे तु,खर प्रेम असाव राधाकृष्ण सारख... तब्येतीची काळजी घे... मी येते... खुप छान वाटल तुझ्याशीबोलून आणि भेटुन आज दहा वर्षांनी, तुझहीछान चाललय सगळ मला खुप आनंद वाटला.याच एका दिवसाची मी वाट बघत होते सदा.आज माझी इच्छा पूर्ण केली परमेश्वराने...सदा , " मनु मलाही तुला जे घडल ते एकदा भेटुनसांगायच होत." दोघेही एकमेकांना भरभरून बघूनघेतात आणि एकमेकांचा निरोप घेतात. सदानंद बरा होतो. त्याने तिच्यासाठी एक सुंदरभेटवस्तु घेतलेली असते. ते म्हणजे राधाकृष्ण यांची छोटीशी मूर्ती, खुप सुंदर आणि आकर्षकती तो मनिषाला देतो. ती त्यांची शेवटची भेट.त्यानंतर दोघेही आपापल्या संसारात रमले.त्यांच प्रेम त्यांनी हृदयात जपलेल होत...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance