पंचशील
पंचशील


जीवन जगण्याचा शीलवान मार्ग म्हणजे पंचशीलाचे आचरण भारत हा अलौकीक देश असून याच देशात ( तेंव्हाचे जंबुव्दीप ) इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३ हा काळ सुवर्ण काळ होय. सिद्धार्थ गौतम ते तथागत भगवान गौतम बुध्द यांचा हा झंजावाती कालखंड. आताच्या नेपाळ मधील लुंबिनी या ठिकाणी या महामानवाचा जन्म वैशाखी पौर्णिमेला इ.स.पू. ५६३ ला झाला. आधीचा सिद्धार्थ मावशीने सांभाळ केल्याने सिध्दार्थ गौतम झाला. वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत सुखवास्तू आयुष्य घालवून एका प्रसंगी पर्याय उपलब्ध नसल्याने गृहत्याग करून जीवनाचे अंतिम सत्य शोधण्यास निघाले. तब्बल ४९ दिवस खडतर अशी तपश्चर्या केल्यावर बिहार मधील गया येथील निरंजना नदी काठी पिंपळ वृक्षा खाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू.५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी सिध्दार्थ गौतम यांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती नंतर सिद्धार्थ गौतम हे बुध्द म्हणजेच ज्ञानी झाले.
सुरवातीला पाच व्यक्तींना आपले ज्ञान देवून अनुयायी बनवले. पुढे निरंतर ४५ वर्ष पर्यंत भटकंती करुन मानवजातीला धम्मदान देत गेले. अखेर इ.स.पू. ४८३ ला कुशीनगर मध्यप्रदेश येथे वैशाखी पौर्णिमेलाच महापरिनिर्वाण जाहले, अखेरच्या श्वासा पर्यंत प्रवचन देत होते.
चार आर्यसत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, दहा परमिता इ. जीवन समृध्द व ज्ञानी बावण्याचे मार्ग दाखवून गेले. त्यांच्या मार्गाने जो कोणी जाईल तो नक्कीच जीवनाचे अंतिम सत्य जाणील.
बुध्द वंदना मधील त्रिसरण नंतर येणारे पंचशील याचा जरी अवलंब प्रत्येकाने केला तर जीवन शीलवान नक्कीच होईल. कोणती आहेत ही पंचशीलं चला पाहुयात.
सामान्यतः पांच तत्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुध्दांनी सामान्य माणसाकरीता आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्यासाठी, बोलणे व जे हानिकारक आहे त्यापासून परावृत्त होण्या करीता हे पांच गुण सांगितले आहेत.
पंचशील
१ ) पाणातिपाता वेरमणि सिख्खापदं
समादियामी |
अर्थ - प्राणिमात्राची हत्या न करणे
किंवा त्यांना इजा न करणे
अलिप्त राहणे.
२ ) आदिन्नादाना वेरमणी सिख्खापदं
समादियामी |
अर्थ - चोरी करण्यापासून अलिप्त
राहणे.
३ ) कामेसुमिच्छाचारा वेरमणि
सिख्खा पदं समादियामी I
अर्थ - कामवासना मिथ्याचारा पासून
अलिप्त राहणे.
४ ) मुसावादा वेरमणी सिख्खापदं
समादियामी |
अर्थ - खोटे तथा मिथ्य
बोलण्यापासून अलिप्त राहणे.
५ ) सुरा - मेरय - मज्ज पमादठ्ठाणा
वेरमणि सिख्खापदं समादियामी |
अर्थ - मद्यपान करण्यापासून अलिप्त
राहणे.
वरील पाचही गुण पाहिले तर आदर्श जीवन आपण या मार्गे जगू शकतो. हे पाचही गुण महत्वाचे आहेत. आपण त्यांना नाकारू शकत नाही. जर नाकारले तर त्यापासून मानवाचे नुकसनाच आहे. आज समाज जो अस्थिर आहे त्याचे कारण वरील गुणांचा अभाव होय. व्यक्तीने मन व शरीर संयम ठेवून हे पाचही गुण आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान होय.
शील ग्रहण करण्याची सोपी पध्दत म्हणजे पाच शीलाचा उच्चार स्वतः व्यक्तीनेच करायचा आहे. शीलाचे आचरण व पालन जेवढे अधिक तेवढा अधिक अआनंद जीवनात मिळतो.
शीलग्रहण करणे चांगले का मानले जाते?
१ ) त्यामुळे व्यक्ती सुखी जीवनाकडे
वाटचाल करतो.
२ ) तो दुसऱ्याचा द्वेष करीत नाही.
३ ) शील ग्रहण करणारी व्यक्ती
पूर्णत्वप्राप्त केलेली असते.
४ ) ती व्यक्ती सर्वांचा चांगला मित्र
असतो.
शील ग्रहण न केल्यामुळे कोणते पारिणाम होतील?
१ ) व्यक्ती क्रूर बनतो.
२ ) व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा होऊ
शकतो.
३ ) कोणी अशा व्यक्तीवर प्रेम
करणार नाही, त्याच्याशी एकनिष्ठ
राहणार नाही.
४ ) ती व्यक्ती दुसऱ्यांना व स्वतःलाही
क्लेषदायी असेल.
५ ) चांगल्या सूज्ञ व्यक्ती अशा
व्यक्तीशी मैत्री करणार नाहीत.
शीलाची उपासना कशी करावी -
प्रारंभीक काही महत्वाच्या पायऱ्या शील ग्रहणासाठी उपयोगी आहेत.
१ ) एकावेळी सर्व शीलाची उपासना
जर शक्य नसेल तर क्रमाक्रमाने
पाच शीलाची उपासना वाढवावी.
२ ) जर दररोज पंचशील ग्रहण करणे
शक्य नसेल तर आठवडयातून
एक दिवस निवडावा व त्या
दिवशी नियमीत शील ग्रहण
करावे किंवा साधे सोपे म्हणजे आपला
जन्मदिवस निवडा.
सामान्यतः जगातील सर्व बौध्द पाचही शीलाचे पालन करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सुखी व समाधानी असतात. चीन, जपान, तिबेट इ. बौद्ध राष्ट्र त्यांची अलौकीक प्रगती मागे देखील हीच पाच शील आचरण आहे.
प्रत्येक कुटूंब जर सुखी व समाधानी असेल तर तो समाज सुखी व समाधानी होईल. समाज सुखी झाला तर सर्व जग सुखी होईल. चला तर मग सुखाचा शोध या पंचशीलात शोधुया आणि जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवूया. शीलवान घडू या.