प्लस पॉइंट
प्लस पॉइंट
पहाटेच माईशा उठली. सकाळचे तीन वाजले होते. रमजानचा महिना असल्यामुळे सेहरी च्या तयारीला लागली. साडेचार पर्यंत सर्वांनी सेरी करून झोपण्याच्या तयारीला लागले. हळूहळू सगळे झोपू लागले माईशा हॉलमध्येच पहुडली. लाईट बंद केली. छोट्या लाईट च्या मंद प्रकाशात तिचे लक्ष ट्रॉफीवर गेले. मंद प्रकाशात प्लस चमकत होता. ट्रॉफीवर असलेला प्लस म्हणजे तिच्या जीवनाचा प्लस पॉइंट होता. तिच्या जीवनात त्यामुळे अमुलाग्र बदल झाला होता. तिला जुन्या आठवणी आठवल्या. तिचा बालपणीचा काळ आठवला.
माईशा सर्वात मोठी होती तिच्या पाठी दोन बहिणी होत्या व एक भाऊ होता. भावंडात दीड-दोन वर्षांचा फरक होता. शाळेत जाताना आईला तिने मुलींचे रांगेने वेणी घालावी लागे. आई ओरडत असे आणि म्हणे "तू मोठी आहेस तुझी वेणी तुला घालता येत नाही. तू तुझ्या बहिणीची सुद्धा वेणी घातले पाहिजे. एक तर आलीस ती आलीस येताना दोघी बहिणी घेऊन आलीस," असे आई ओरडत. माईशाचा डोळ्यात पाणी येई .तिला फार वाईट वाटे. मोठी असल्याने तिला प्रत्येक वेळी टोमणे खावे लागे.
शाळेत खूप हुशार होती बाईंची लाडकी होती. बाई म्हणत "तू थोडा अभ्यास केलास तर खूप पुढे जाशील". माईशा चौथीला होती. तिचे इवलेसे हात स्वयंपाकाकडे वळले. भाऊ एक वर्षाचा असताना आईला अल्सरचा आजार झाला. त्यामुळे माईशावर स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी आली भावंडांचा सांभाळ करणे स्वयंपाक करणे व शाळेत जाणे तिची फार ओढाताण होई.
आई म्हणे "स्वयंपाक करायला शिक तुझं लग्न करायचे शिकून काय करणार आहेस?" त्यावेळी को
ळशाची खर मातीत मिसळून गोळे बनविले जात. ते शेगडीत वापरत. शेगडी पेटवली की स्वयंपाक सुरू व्हायचा. चिमुकल्या हाताने एका नंतर एक पदार्थ बनवत भाकरी करायची. भाकरी करताना आई डोळे वाटारायची. "भाकरी कडे नीट लक्ष दे पातळ झाली पाहिजे ." चिमुकले हात आणखीनच थरथरायचे. सकाळ झाले की शाळेत जायचं.
माईशा आज आपल्या शाळेत स्पर्धा आहे. तू भाग घेणार आहेस ना?" नाही मॅडम माझी आई बाहेर पाठवणार नाही. "मायशा म्हणाली. "अगं आज आपल्या शाळेत स्पर्धा आहेत दुसऱ्या शाळा आपल्या शाळेत येणार आहेत शाळेच्या वेळेत आहे मग तर झालं". मायशाला खूप आनंद झाला. बाईंनी शाळेत एका वर्गात तयारीसाठी बसवलं. स्पर्धा सूरू झाली. नाट्य वाचन स्पर्धा होती. प्रत्येक पात्राचे नाव लावले होते. चंदू या पात्राचे वाचन मायशा करत होती. तिच्या वाचण्यात गोडवा व कोमलता होती. वाचन प्रभावी झाले. परीक्षकांनी तिला उचलून घेतले. तिचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता. बक्षीस म्हणून ट्रॉफी दिली होती. त्यासोबत तीन पुस्तकेही दिली. पुस्तकाचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शास्त्रज्ञ रूडाल्फ, लाल बहादूर शास्त्री. तिन्ही पुस्तके तिने वाचून काढली. तिने ठरवले मी खूप शिकणार. कितीही संकट येऊ मी सामोरे जाईल. या तिन्ही व्यक्तीसारखे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करीन. ट्रॉफीवरचा प्लस जणू सांगत होता. प्लस हा तुझा प्लस पॉइंट आहे. तुझ्या जीवनात आत्मविश्वास प्रेरणा भरेल. तू उंच भरारी घेशील. खरंच तिने गरुड झेप घेतली होती. तितक्यात बेल वाजली दूधवाला आला होता. पुन्हा रोजच्या कामाला माईशा लागली.