STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

फुलवा (अलक)

फुलवा (अलक)

1 min
210

बागेतली फुलं म्हणजे फुलवाचे जीव की प्राणच... अहो, एखाद्या बागेत जेवढी फुलं नसतील, तितकी फुलं फुलवाच्या अंगणात होती. जाई-जुई तर अगदी खेळत होत्या तिच्या अंगणात, गुलाबाने तर संपूर्ण घराभोवती फेर धरला होता. सोबत चाफा होताच, तर अशा अनेक फुलांनी तिचं घर नटलेलं होतं... आई आपल्या बाळाची जशी काळजी घेत असते, अगदी त्याच पद्धतीने फुलवा तिच्या झाडांची काळजी घ्यायची. त्यांच्याशी गप्पा मारायची...


घरात सगळ्यांची लाडकी आणि शाळेतीलसुद्धा सगळ्यांची लाडकी मुलगी म्हणजे फुलवा. मनं आणि फुलं तिला कधीच वेगळी वाटली नाहीत, फुलांसारखंच ती माणसांची मनंही जपायची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract