#पहिलं प्रेम....
#पहिलं प्रेम....
आज सुमित भलताच खुश होता. कारण आज त्याच्या बालपनापासूनची मैत्रीण त्याला खास भेटायला येणार होती. सुमित आरशात पाहून गाणं गुणगुणत होता. चेहऱ्यावर तिच्या येण्याने वेगळीच झळक दिसत होती. जरा त्याला भीतीही वाटत होती. काय बोलावे तिच्याशी...?कोठून सुरुवात करावी....? लग्नानंतर कशी दिसत असेल. अशा वेगवेगळ्या प्रश्नानी त्याच्या मनात गोंधळ घातला होता.कोणत्या हॉटेलमध्ये भेटायचं होतं ते ठरलं होतं. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण घरातील लोकांची समंती मिळाली नाही, आणि त्यांच्या परवानगीशिवाय त्यांना संसार थाटायचा नव्हता. त्यामुळे दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
सुमित हॉटेलमध्ये पोहचला, तिच्या आवडीच्या निळ्या रंगाचा शर्ट त्याने चढवला होता. तिची आवड अजून त्याच्या लक्षात होती.नेहमीसारखी ती उशिरा आली. सुमितने वेटरला पाणी मागितले आणि तिची वाट पाहत बसला. पाणी पिताना त्याला ती आत येताना दिसली. तशीच होती ती अगदी.प्रिया तिचं नाव. तिनेही त्याच्या आवडीच्या निळ्या रंगाची साडी नेसली होती. हलका मेकअप, मोकळे सोडलेले केस, मॅचिंग इअररिंग तिच्या गोऱ्या वर्णावर खूप शोभून दिसत होतें. तिला पाहताच त्याला काय बोलावे सुचत नव्हते. ती अजूनही तशीच सुंदर दिसत होती.
ती आली तशी त्याच्या समोर येऊन बसली. तिच्या अत्तराच्या वासाने तो घायाळ झाला.दोघांची नजरानजर झाली. तिला पाहताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढले.दोघांनाही कोठून सुरुवात करावी कळत नव्हते.
"मला माहितेय तू काही बोलणार नाहीस..! मलाच सुरुवात करावी लागणार,"प्रिया म्हणाली.
कशी दिसतेय मी तिने नेहमीचा तिचा प्रश्न विचारला.
खूप छान दिसतेस, पहिल्यासारखीच, सुमितने उत्तर दिले.
ती लाजून हसली.
कसा आहेस तू ...?,"प्रियाने विचारले
छान आहे मी....?मोजक्याच शब्दात त्याने उत्तर दिले.
कुठे असतोस सध्या...? ती म्हणाली
इथेच याच शहरात आहे.जॉबमुळे कदाचित नागपूरला जावे लागेल.
भेटला कसा नाहीस मला तू इतके वर्ष झाली तरी ....?मी आतुरतेने वाट पाहत होतें तुझ्या फोनची.
तुझ्याशी खूप काही बोलायचं होतं,"प्रिया म्हणाली.
तू लग्नानंतर कोठे आहेस याबद्दल मला काहीच माहित नव्हतं...? तुला बघण्याचीही माझी मनस्थिती नव्हती.
लग्न का केलं नाहीस अजून ....?,"प्रियाने शांतपणे त्याला प्रश्न केला.
तिच्या प्रश्नाने तो अनुतरित झाला.
"तूला आता पुढे जायला हवं सुमित . मला माहितेय...!मला अजून विसरता आलं नाही ना तुला, पण मी पुढे गेले आहे, माझा संसार सुरु झाला आहे सुमित. मला नवरा आणि मूलं आहेत . तू माझं पहिलं प्रेम आहेस आणि मीही तुला हृदयाच्या कप्यात अजून जपून ठेवलं आहे. वेळ निघून जायच्या आधी तू भविष्याचा विचार करायला हवास. अजून किती दिवस माझी वाट पाहणार...?
तिच्या बोलण्याने त्याचे डोळे पाणवले होतें. त्याच्याकडे पाहून तिचेही डोळे नकळत पाण्याने डबडबले.
मला रडवणार आहेस का आता ...?
तो हळुवारपने म्हणाला, नाही ग असं काही...
चल निघू का मी उशीर होतोय खूप....??
वाट पाहत असतील माझी घरी, प्रिया म्हणाली.
पुन्हा कधी भेटणार. त्याने निरागसपणे तिला विचारले.
हो भेटू असच एकदा कधीतरी, पण तेव्हा तरी तुझा जोडीदार असावा अशी अपेक्षा करते.
तिचे हृदय भरून आले होतें, जीवापाड प्रेम करणारे दोघे कुटुंबाच्या निर्णयामुळे भिन्न झाले होतें.
जाता जाता त्याने खिशात हात घातला आणि एक रुमाल तिच्या हातात ठेवला. त्यात काहीतरी होतें.
प्रियाने ते उघडले त्यात तिच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा होता. जो तिला तो आधी रोज न विसरता देत असे.
माझी आवड किती लक्षात आहे अजून तुझ्या ....? प्रिया म्हणाली.
किती छान होतें ते दिवस सुमित. लग्नानंतर माझ्या नवऱ्याला साधं माझ्याकडे बघायलाही वेळ नसतो,बोलणं तर लांबच. चार भिंतीत जीव मेटकुटीला येतो रे.प्रेम करून उपयोग नसतो, नात्याला वेळ ही द्यायला हवा ना..?नात्यात संवाद नसेल तर ते प्रेम कसले.मी पण काहीही सांगत बसले तुला....! तीच बोलणं भरकटत चालेले तिने आवरते घेतले.
तिने त्या रुमालातील गजऱ्याला ओंजळीत घेऊन वास घेतला,आणि आधीच्या सोनेरी दिवसाची तिला पुन्हा आठवण झाली. तो तिच्याकडेच एकटक पाहत होता. अजूनही तिचा मोगऱ्याचा वासाचा मोह कमी झाला नव्हता. तिने जाता जाता पर्स मधून काहीतरी काढून त्याच्या हातात दिले.
चल मी निघते असं म्हणून ती तिथून निघाली.
त्याने हातातील लिफाफा उघडला, त्यात तिने काहीतरी लिहिलं होत.
" सुमित मला माहित होतं तू न चुकता माझ्यासाठी गजरा घेऊन येणार....! ही आवड जपणारा फक्त तूच आहेस माझ्या आयुष्यात . तू नेहमीच मनाच्या कोपऱ्यात राहशील. तुझ्यावरील प्रेम माझं कधीच कमी होणार नाही. तू माझं पहिलं प्रेम आहेस सुमित. कधीही न विसरता येणारे....!
त्या लिफाफ्यामध्ये अजून काहीतरी होतं. त्याने ते उघडून पाहिले, तर त्यात दोघांच्या आवडीचे मेलोडीची चॉकलेट होती.सुमितला ते चॉकलेट खूप आवडत असे. तो दोघांना न चुकता ते चॉकलेट आणत असे. आज तिनेही त्याची ती आवड इतक्या वर्षांनीही जपली होती.
त्याचेही डोळे भरून आले,तिनेही त्याच्यावरील प्रेम मनाच्या कोपऱ्यात जपलं होतं.त्याने समोर पाहिले तर ती वळूणच त्याच्याकडे पाहत होती, त्याला बाय करण्यासाठी हात हलवत होती. त्याचेही डोळे नकळत भरून आले भरल्या डोळ्यांनी तो तिला निरोप देत होता. दोन प्रेमीयुगल पुन्हा एकदा वेगळे होत होतें.

