"पाऊस "
"पाऊस "
उन्हाळा संपत आला तरी पावसाची चिन्हे काही दिसत नव्हती पाऊस पडल्याशिवाय आम्हाला लोकांचे कामकाही मिळत नाही व रोजीरोटी सुरू होत नाही आमच्या पंचाळाचा व्यवसाय कसा सुरु होणार? रोज आभाळ भरून येत होतं मात्र पाऊस काही पडत नव्हता पडल्याशिवाय शेतकऱ्यांची कामाची लगबग सुरू होत नाही व आमचा धंदा पण सुरू होत नाही चार-आठ दिवसांनी पावसाला सुरुवात झाली . शेतकरी खुरपी ,विळी. कुऱ्हाडी सार काही पंचाळान कडे आणायला सुरुवात केली तेव्हा कुठे काही आमच्या जीवात जीव आला रोज दोन चार आण्याचे काम मिळू लागल , घरात दळण दाण्याचे काम भागलं त्यामुळे पोर खुष झाली. सकाळी गावभर हिंडून गडी माणस काम जमा करू लागले विळा . खूरपे पाजून घ्या ! कुऱ्हाडी पाजून घ्या असं म्हणत दोन-चार काम जमा करून कष्टाच कामाच आनंद मिळू लागला आम्ही आमची आढि पेटवली ही पंचाळा ची भट्टी सुरू व्हायची त्याच भट्टीवर चहा करायचा , भाजी भाकरी व भाजी ला आंधन ठेवायचं आणि कामाबरोबरच स्वयंपाक पण करायचा भट्टीच काम संपलं की त्याच निखाऱ्यावर पोरांना भाकऱ्या करून खाऊ घालायचं परत सकाळी घेतलेलं काम दुपारी ज्याच्या त्याच्या घरी पोहोचवायचं आणि दळण दाणा आणायचं त्याची काळजी हे रोजच पोटाची खळगी भरण्याचं काम चालू होतं यंदा भरपूर पावसाळा सांगितला होता त्यामुळे खुश होतो रोज कामाचा पसारा वाढत होता . पोर काम जमा करायला मदत करीत. पत्राच झोपडआमचं बाजूला बारदान लावून भिंती अशी आमची वस्ती बसली होती . रस्त्याच्या कडेचा लाईट चा उपयोग करून आम्ही आमच्या घरात ना दिवा ना लाईट कारण आतिक्रमण जागेत आतिक्रमाने केलेला संसार ? कामभरपूर भेटत होत . पदरी चार पोर ! पोटाला त्यामुळे घरात खायला जास्त आणि कमवायला कमी होती त्यामुळे पैका कमी पडत होता .पंचाळ च काम नसल तेव्हां शेतकऱ्याच्या शेतात जाऊन मिळेल ते काम करत होतो . आणि आमचा रोजगार चालू होता पावसाळा चे दिवस सुरू असल्यामुळे घर गळण्याची आणि छप्पर उडण्याची भीती होती त्यामुळे घरात किंवा बाहेर काही आवाज झाला ती दचकून उठायचे . पोरेबाळे बघायचे सारे काही ठीक ठाक आहे बघून पून्हा झोपायचं असाच एक दिवस आभाळ खूप भरलेल होत. कपडे पसारा भिजू नये म्हणून कपडे मध्ये जमा केल आणि जमिनीवर बारदान टाकून आमचा बिछाना टाकला सगळी झोपली तर जायला जागा राहायची नाही घरातील अडगळीचे सामान हे सगळे बाहेर टाकायचं .त्या रात्री सगळ्यांना गाढ झोप लागली होती रात्रीची वेळ होती लाईट पण गेली होती सोसाट्याचा वारा सुटला पाऊस खूप जोराने सुरुवात झाली जोराचा पाऊस असल्यामुळे झोपडीतून बाहेर निघायला जागा नव्हती दिवस उजाडायची वाट पाहात मनात देवाचा धावा करत खोपडी उडू नको. दिवसभर बैलाप्रमाणे राबल्यामुळे रात्री झोप लागायची ती जणू नाव मुडदा पडल्याप्रमाणे कोणी हलवलं तरी जाग येणार नाही आज रात्री गावात पाणी शिरलं नदीला महापूर आला आणि वरून सारे झोपडं. शेतकऱ्यांची गुरंढोरं वाहू लागले पाणी आमच्या झोपडयांत शीरलं मध्ये पाणी आल्यामुळे सामान तरंगू लागलं आम्ही अंगावरची कपडे घेऊन झोपडीच्या बाहेर पळालो कारण झोपडी नदीच्या काठाला होती आमच्या सार्या वस्तीतील लोक अंधारात चाचपडत चाचपडत पोरांना घेऊन जीव वाचवण्यासाठी गल्ली उंच जाग्यावर पळत होती पाहता-पाहता डोळ्यासमोर साऱ्यांची झोपड वाहून गेली होत नव्हता तेवढा संसार डोळ्यादेखत वाहून गेला पावसाचे उभयंता व रुद्र स्वरूप रात्री अंधारामुळे दिसत नव्हतं पहाटे दिवस उजाडला तेव्हा मात्र सारं संपलं होतं अंगावरच्या कपड्यानिशी ओल्या कपड्यांनी पोरांना घेऊन आम्ही सारे गल्लीत होतो .आजूबाजूचे लोक धावून आलं आम्हाला कुणी पाणी खायला बिस्कीटचे पुडे आणि भाकरी आणू लागली . आजूबाजूच्या पुढाऱ्यांनी दिवसभर धावाधाव व बघणार्यांची गर्दी वाढली आमची काही म्हातारी कोतारी कोपरे मध्ये कुठेतरी तग धरून जगत होती शेवटी तिथल्या एका आमदाराने एका शाळा मध्ये आमची राहण्याची ' खाण्याची व्यवस्था केली पण कष्टाने गमावलेला सारा संसार एका रात्री पाहून गेला डोळ कोरडी पडली शाळा मध्ये मेंढरा वाणी सारी एका वाड्यात मेंढर भरल्याप्रमाणे शाळेत जमा झाली. सायंकाळी कोणी जेवणाची व्यवस्था केली.पण ती? पोरांची पोट भरली पोर आसरा घेऊन झोपली मात्र मोठ्या माणसाला गेलेला संसाराचे दुःख जात नव्हतं मोडके . तोडके मदत काही पैसे काही कपडे दिले. असे चार दिवस गेले पाणी व सारी दल दल कमी झाली नदीने वाहून आणलेला गाळ साऱ्या गावाचे मयला.घाण . त्यामुळे घाण वास येत होता . की आमची चाळ वस्ती त्या काळामध्ये कुठे होती याचा थांगपत्ता लागत नव्हता नगरपालिकेने चार आठ दिवसांनी गाळ काढायला सुरुवात केली कोरड्या जागी आम्ही परत आमच्या झोपड्या उभारायला सुरुवात केली चिमणी कशी गवताची एके एक काडी करून खोपा बनवते अशी आमची गरज झाली होती पत्र्याचा तुकड . दगडांची विटा कुठे सारी जमुन आम्ही झोपड्या उभारायला सुरुवात केली .पोटाला काम नव्हतं घरामध्ये दळण दाणा नव्हता गरिबांसाठी दिली मदत संपत आली होती आणि सहानुभूती? लोकांकडून मिळालेली हळूहळू कमी होते शेवटी आपलाच मड आपल्याच उचलाव लागेल . आपल्याला झोप लागणार नाही .त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली हळूहळू संसार वाटायला लागला पोरं काम धंदा करू लागली मात्र पावसाळा संपलेला नव्हता आणि परत जास्त पाउस येईल यात नदीला पूर येईल म्हणून त्याजागी नदीच्या कडेला आम्हाला झोपड्या बांधून देत नव्हते व दुसरीकडे जागा नाही धंदा नाही तेव्हा जगायचं कसं शेवटी आहे त्या जागेवर लोक जाता येता नाक दाबून जात .कारण त्या गाळामध्ये आलेलं सगळी घाण मलमूत्र गुरे ढोर त्यामुळे दुर्गंधी पसरली मात्र आम्हाला त्याच दुर्गंधीत कुत्र्यावाणी माणसाला जीवन जगावं लागतं निसर्गाने आमच्यावर काय अवकृपा केली आणि होता तेवढा सगळं काही त्या पावसानं ?त्यामुळे मुलांना पावसाळा म्हटला ती अंगावर कापरे भरायचं . पाऊस सुरु झाला लोक झोपडयामध्ये दबा धरून बसायचे बाहेर पडायला भ्याव वाटायचं कारण पाऊस कसा असतो कसा दिसतो आणि काय करतो हे आम्ही प्रत्यक्ष त्या भयाण रात्री रात्रभर त्या काळोखात जीव कसा जगवायचा हे शिकलो होतो . नशिबान आमचा जीव वाचला.कारण आम्ही झोपड्याच्या बाहेर पडलो . मात्र झोपड्यांमध्ये कित्येक म्हातारी लहान मुलं मेलेली जनावर कोणाच्या बकर्या' कोंबड्या खुराड्या मध्ये झाकलेल्या कोंबड्या दावणीला बांधलेली जनावरे सारं काही वाहून गेलं ज्या पावसाची आम्ही वाट पाहत होतो त्या पावसाची भीती वाटायला लागली कारण पावसाळा काय घेऊन येतो आणि काय देऊन जातो हे फक्त आमच्यासारख्या झोपडीवजा राहाणारे किडा-मुंगी वाणी जीवन जगणारे च अनुभव शकतो. पावसाळा म्हणजे धरणी मातेला जीवदान असत . मात्र आमच्या जीवनाला पावसाळा म्हणजे खेळखंडोबा वाटू लागला .आणि पाउस म्हणजे संसाराचा खेळ खंडोबा वाटू लागला पोरांना भीती वाटू लागली पोर शाळेमध्ये जात नव्हती त्यामुळे पावसाळा म्हणजे काय आणि पावसाळा कसा असतो हे जर विचारलं तर खरे स्वरूप आमच्यासारख्या पंचाळा कडून पाउस म्हणजे काय असतो पाऊस पाऊस म्हणजे पाऊस असतो . पाणी हे जीवन आहे .तेच पाणी जीवन जगू शकते तेच पाणी जीवणाचे पाणी करू शकते . धन्य तो पाऊस ! धन्य ते जीवन !
