Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win
Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Horror

4.2  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Horror

पाठिंबा महिला भुतांचा

पाठिंबा महिला भुतांचा

1 min
4.3K


एखादा जुना सिनेमा बघताना, भितीदायक काही दाखवायचे म्हणजे...एखाद्याचे 'भुत', 'पडका वाडा' हमखास दाखवले जाते...सिनेमा हॉलिवुड-बॉलिवुड-कोलिवुड...कुठलेल्याही भाषेतला असो..


तशी भुतांची ओळख आपल्याला खुप लहानपणीच झाली असते आई गोष्टी सांगते तेव्हा 'बागुलबुवा' वैगरे... अनेक नावे, अनेक रूपे!

आपणही न कळत हे खरे आहे हे समजुन घाबरत राहतो...

कधी कधी ही भुते चांगली पण असतात... 

त्या पडक्या वाड्यात चांगले वागण्यासाठी मदत करतात...

राजेरजवाडे, पडके किल्ले, हे होऊन गेलेल्या श्रिमंतांचे वाडे,किल्ले आणि आता भंगलेले...


बलात्कारांच्या बातम्यांमधे बर्याच वेळा आपण छान सुटाबुटातले लोक, पडक्या जुन्या वास्तुंचा परीसर याचा वापर करता असे पाहतो, कारण सर्वसाधारण लोक तिथे जात नाही, वापर कमी असतो जागेचा.


अश्या ठिकाणी बलात्कार झालेल्या किती मुली बायंकांचा बळी गेला असेल कोण जाणे, काहींनी बलात्कार होण्या आधीच स्वःताला संपवले असेल...


माझ्या मनात न आता सारख येत, ज्या मुली-बायंकाचा छळ झाला व बळी गेला त्यांनी एक संघटना करावी व आम्हा जिवंत महिल्यांच्या संघटनेला भुतरूपी पाठींबा द्यावा, आजच्या नराधमांशी दोन हात करण्यास!

स्त्रिभ्रुण हत्या,छळ, बलात्कार होत असेल तर त्यांनी आम्हाला पाठिंबा देत आमचे मनोबल वाढवावे...


अरे हो काही बायकापण खोट्या वागतात, आजच्या बायंकासाठी असलेल्या कायद्याचे खोटेवागुन पुरूषांना, कुटुंबाना त्रास देतात... त्यांना ही वठणीवर आणावे लागेलच...


ह्या सदाचारी भुतांनी, मृत आत्म्यांनी सहकार्य करावे भुतलावरच्या अनिष्ट गोष्टी न होण्यासाठी...


देव-दानव एकत्र येवुन कलियुगातल्या ह्या माणुस प्राण्याला वठणीवर आणण्यासाठी आता प्रयत्न केलेच पाहिजे!!!



Rate this content
Log in

More marathi story from अंजली (Anjali) बुटले (Butley)

Similar marathi story from Horror