Be a part of the contest Navratri Diaries, a contest to celebrate Navratri through stories and poems and win exciting prizes!
Be a part of the contest Navratri Diaries, a contest to celebrate Navratri through stories and poems and win exciting prizes!

शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others


4.0  

शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others


पाहीले न मी तुला

पाहीले न मी तुला

3 mins 204 3 mins 204

     रसिका सहजच कितीतरी दिवसांनी आज फेसबुक ओपन केलेल होत. तिला एक नवीन फ्रेंड रिक्वेस्ट दिसली. मिहिर नावाच्या मुलाची. तिने ती रिक्वेस्ट एक्स्पेक्ट केली. ती कुणाशीही ऑनलाईन वगैरे बोलत नव्हती. तिला या आभासी जगाबद्दल सगळ माहीती होत. ती तिच्या कामात बिझी असायची. पण सहजच लाॅकडिअन मुळे वेळ जात नव्हता म्हणून ती मोटीव्हेशनल पोस्ट टाकल्या तेव्हा मिहीरने त्याला छान लाईक आणि कमेंट केल्या. तो रोजच तिच्या पोस्ट वाचायचा. त्याच्या प्रतिक्रिया छान असायच्या. रसिकाला लिहायचीही आवड होती. ती फेसबुक पेजवर लिहायची. तिचे विचार, ती तिच्या कथांमधुन मांडायची. तिला कविताही छान करता यायच्या. तिला लेखनाची आवड होती. लाॅकडाऊन मध्ये आपल काम सांभाळून ति लेखन करायची. तिलाही वाचकांच्या छान प्रतिक्रिया लिहायला प्रोत्साहित करित. मिहीरला त्याची रिक्वेस्ट रसिकाने स्विकारल्यावर त्यालाही आनंद झाला. त्यानेच तिला मेसेज करून हाय, तिच्या लेखनाबद्दल तिच कौतुक केल. कुणाशी कधीही फेसबुक वर चॅटींग करणारी रसिका मिहीरशी बोलायला लागली. तिलाही त्याच बोलण, त्याच्या प्रतिक्रिया तिला मनाला छान वाटायच्या. मग रसिका आणि मिहिर यांची लाॅकडाऊन मध्ये मैत्री छान फुलु लागली. ते दोघे मेसेजवर एकमेकांना बोलायचे. दोघांनाही एकमेकांशी बोलायला आवडायच. त्यांना सवय झाली होती. पण ते दोघे इतके एकमेकांना बोलायचे पण त्यांनी कधीही फोटो मागितले नाही एकमेकांना. असाच रोजच त्यांच बोलण मैत्री सगळ सुरू असताना दोघांना एकमेकांची ऑनलाईन भेटण्याची खुप सवय झाली. पण आपल काम सांभाळून ते एकमेकांना वेळ द्यायचे. त्यांची रोजची वेळ ठरलेली असे. दोघेही एकमेकांची वाट बघायचे ऑनलाईन येण्याची. ते कधी एकमेकांच्या जवळ आले मनाने आणि प्रेमात पडले दोघांनाही समजल नाही.     


मिहिर आणि रसिका सगळ्याच गोष्टी एकमेकांना शेअर करायचे. लाॅकडाऊन मध्ये एकमेकांची काळजी घ्यायचे. खुप गप्पा मारायचे, इतक बोलूनही त्यांना कमीच वाटायच. रसिकाला ही मिहिर खुप आवडायचा. पण तिने त्याला पाहिल नव्हत तरी मनापासुन तो तिला आवडत होता. तिला वाटायच हा माझ्यापेक्षा दिसायला हँडसम वगैरे असेल त्यांची ओळख होऊन सहा महीने होतात. आता ते एकमेकांच्या मनाने खुप जवळ आले होते. मिहरला तर रसिका तिच्या विचार आणि तिचा स्वभाव आणि सुंदर मनामुळे तिने त्याच हृदय जिंकल होत. त्याला तिच्याशिवाय दुसर्‍या मुलीचा विचार करणही शक्य नव्हत. तो तिच्यात गुंतत चाललेला होता आणि तिला प्रेमाच विचारण्याच धाडस होत नव्हत कारण मिहिरला रसिकासारखी मैत्रीण गमवायची नव्हती. एक दिवस सहजच बोलता बोलता रसिका त्याला म्हणाली. " जर आता लाॅकडाऊन संपल्यावर आपण भेटणार आहोत पण आपण तर एकमेकांचे फोटोही पाहीले नाही जर मी तुझ्यासमोर आले आणि तुला मी आवडले नाही तर ? " मिहीर क्षणभर गोंधळला , तिच्या बोलण्याने तिला काय म्हणायच त्याला समजल. मग मिहीर रसिकाला समजावतो नि तिला सांगतो. " रसिका, मी तुझ्या प्रेमात आहे, मला तु खुप मनापासून आवडते. मी तुझा मन आणि स्वभाव पाहून तुझ्या प्रेमात पडलो मग फोटो बघितला काय कींवा समोरही त्याने काय होणार आहे. तु जशी आहेस तशिच असणार मला माहीती आहे माझ मन सांगतय... "   


त्याचं अस बोलण ऐकुन रसिकाच टेन्शन दूर झाल. तिला कळत नंव्हत की आपण मिहिरला पहिल्यांदा भेटतोय तो इतक्या दुरून भेटायला येणार. तिला मनातुन खूप आनंद होता. ती क्षणभर हरवून जाते. तेव्हा मिहीर तिला म्हणतो... " काय रसिका मॅडम, आता तरि भेटणार आहात की नाही ? "तिनेही मेसेजवर ' हो ' म्हटल तिला समजल होत मिहिरच्या बोलण्यातून प्रेमामध्ये दिसण महत्वाच नाही तर दोघेही एकमेकांना किती समजुन घेता ते महत्वाच आहे.  


Rate this content
Log in

More marathi story from शब्दसखी सुनिता

Similar marathi story from Romance