Arun V Deshpande

Drama

1  

Arun V Deshpande

Drama

ओझे मनावरचे ..!

ओझे मनावरचे ..!

3 mins
3.2K


हे जगणे अतिशय सुंदर करणे ही गोष्ट आपल्याच हातात असते आणि मनात ही असते. कारण आपल्या मनाला आपण जसे वळण लावू, तसे ते कार्य करेल, नेमकी ही बाबच मोठी अवघड आहे. कारण आपल्या मनाचे चंचल असणे, या पाऱ्यासारख्या चंचल मनास काबूत ठेवणे किंवा तसे जमणे, हे भल्याभल्या माणसांना जमत नाही तिथे सामान्य मानसिकतेच्या

माणसाचे काय सांगावे.

त्यामुळे होत काय की, आपल्या जगण्याचेच एक ओझे होऊन जाते आणि मग हे असे बोजड आयुष्य मनावर एक ओझं म्हणून जगणे म्हणजे मनाचा कोंडमारा करून जगणे असते. त्यामुळे उभारी घेण्याचे सोडाच, मन हे दुबळे होऊनी जाते..

अश्या दुबळ्या मनाला धीर देणारे एक गाणे आहे पहा...

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

फुलला पहा सभोती आनंद या मनाचा ..||

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुखाची बाग फुलत असते, तसेच चोरपावलाने येणारे दुःख वेदना देऊन जाणारे असते, पण ते सुद्धा जीवनातला एक अनुभवच शिकवून देत असते.

म्हणून सुख असो वा दुःख त्याचे मनावर ओझे न बाळगता जो पुढे पुढे जात असतो तो खरा आयुष जगणारा समजावा.

शायर मजरूह सुलतानपुरीचे दोस्ती सिनेमातील हे गाणे हेच सांगणारे आहे..

राही मनवा दुख की चिंता क्यू सताती है

दुख तो अपना साथी है ..

सुख है एक छांव ढलती, आती है जाती है...

दुख तो अपना साथी है.. !

मनावर ओझी बाळगणे आणि तसे जगत रहाणे म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखे असते. हे ओझे कधी एखाद्या अपराधी भावनेचे असते, ही भावना मनमोकळे करून सांगता येते. पण त्यासाठी धीर आणि धैर्य असावे लागते. त्या अभावी सांगण्याचे राहून गेले तर ? मग मात्र आयुष्यभर हे ओझे मनावर तसेच घेऊन जगावे लागते.

कधी कधी कुणाच्या मदतीने आपले अवघड असे कार्य सफल होते, पण या उपकाराची परतफेड करू शकणार नाही ही जाणीव ओझे बनून आपल्या मनावरचा ताण वाढवत असते.

वास्तविक जो आपले काम करतो त्याने अपेक्षा केलेली ही नसते, बदल्यात काही मिळावे याची. पण आपले मन ते स्वतःलाच कुरतडत बसते, मी काही करू शकलो नाही या जाणीवेने.

खरं म्हणजे निर्मल मनाने आपण या सर्वांचा स्वीकार करू शकलो तर देणारा आनंदी आणि घेणाराही आनंदी होतो. पण, मनाचे व्यवहार इतके साधे आणि सरळ होऊ लागले तर, आपले जगणेच किती सोपे होऊन जाईल, असे होत नाही आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबून जाऊन, मिंधेपणाच्या भावना सोबत घेत आयुष्य जगणारे आपल्या भोवताली दिसून येतात. स्वतःच्या क्षमतेबद्दलचा न्यूनगंड बाळगणे, तो झुगारून देण्याची वृत्ती नसणे हा दोष आपल्या व्यक्तिमत्वातील एक दुर्दैवी दोष आहे असे म्हणावे लागेल.

झुगारून देत नव्या उमेदीने पुढे सरसावणे या कृतीतच मनावरचे ओझे फेकून देणे अभिप्रेत असते. पण अशी माणसे स्वतःच्या कोशातून बाहेर पडत नाहीत आणि मनावरचे ओझे अगदी असह्य होऊन जाते, पण म्हणून काही जगणे सोडायचे का ? नाही अशा वेळी मदतीसाठी हात पुढे करावा. कुणीतरी जिंदादिल माणूस नक्कीच धावून येईल.

तेव्हा कुठे म्हणता येईल-

एक अकेला थक जाये तो..

मिल कर बोझ उठाना ....!

आणि मनावरचे ओझे बाजूस सारून आयुष्याचा नया दौर सुरु करता येईल.

चला तर- मनावरचे ओझे देऊ फेकुनी

जगण्यास नव्याने सज्ज होऊ...... !


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama