Arun V Deshpande

Inspirational

2.5  

Arun V Deshpande

Inspirational

कथा बस झाले यापुढे काही सहन

कथा बस झाले यापुढे काही सहन

8 mins
15.7K


सकाळ झाली, पहिल्या चहासाठी अप्पांचा जीव कासावीस झाला असणार ,चहाचा कप हातात देई पर्यंत अप्पा एकच आवाज देत रहाणार ..अरे..किती वेळ.? 

..अजून झाला नाही का चहा ?,  

आणून ओता एकदा आमच्या नरड्यात ,आणि व्हा मोकळे !

आप्पांचा हा कर्कश्य आवाज ऐकून चीड येई ,वैतागून उपयोगही नसायचा त्यापेक्षा, आप्पांचे चहासाठीचे रडगाणे थांबवण्यसाठी तरी उठणे भाग होते. आणि मग रोजच्या प्रमाणे मेधाताई मोठ्या नाराजीने उठल्या , ..हातातल्या चादरीच्या घडी सोबत मनातल्या उबदार झोपेच्या कल्पनेची उबदार रजई घडी करून ठेवीत त्या बाहेर आल्या ..बाहेरच्या हॉल मध्ये खुर्चीत आप्पा दिसले नाहीत आणि मग त्यांच्या लक्षात आले....

आग बाई , आप्पा तर काल पासून शेजारच्या हॉस्पिटल मध्ये आहेत .. ही गोष्ट अशी कशी विसरून गेलोत आपण ? याबद्दल मेधाताईना स्वताचा रागही आला .

आप्पा घरात नसून हॉस्पिटल मध्ये आहेत, याचा असा कसा विसर पडला आपल्याला ?

असे तर नाही ना ? सकाळपासून आप्पांचे त्रासिक आवाज देत ओरडणे  कानावर पडलेच नाही म्हणून..आज आपल्याला शांत झोप लागली आणि त्यामुळे अजिबातच जाग आली नाही .

आप्पांना काल दुपार पासून बीपी वाढल्यासारखे वाटत होते , त्यात बॉर्डर वर असणारी शुगर. त्यांच्या सोबतीला काही महिन्यापासून आली होती, असे झाले म्हणून, काळजी वाढवणे नकोच ..म्हणून मंगेशने - त्यांच्या मुलाने निर्णय घेत सांगितले ..आई , तू आणि आप्पा दोघेच असता नेहमी ..त्यात असा त्रास होणे बरे नाहीये. 

त्यापेक्षा आप्पांना माझ्या डॉक्टर मित्रांच्या हॉस्पिटल मध्ये ठेवू या , म्हणजे आपल्या पैकी कुणाला तिथे आप्प्जवळ रात्रभर थांबण्याची गरज नाही ...

मुख्य म्हणजे आप्पांचा माझ्या मित्रावर -डॉक्टरवर विश्वास पण आहे " म्हणून म्हणतो. तू यात काही वावगे वाटून घेऊ नको ..आप्पांना तिथे उपचार मिळेल आणि आराम मिळेल, महत्वाचे म्हणजे तुला थोडी शांतता आणि आरामाची गरज आहे ", हे मला कळत नाहीये असे वाटते का तुला ?

मंगेशच्या -मुलाच्या मनातील काळजी आणि भावना ऐकुन मेधाताई नाही म्हटले तरी सुखावल्या होत्या.

मेधा ताईंना आठवले -

आप्पांच्या विक्षिप्त आणि तर्हेवाईक वागण्याला कंटाळून , होणारे वितंडवाद तरी थांबतील अशा विचाराने मंगेशने विचारपूर्वक निर्णय घेत आईला -मेधाताईंना सांगितले ..

मोठ्या नाखुशीने ..आम्ही वेगळे राहणार आहोत ..याच सोसायटीतील समोरच्या विंग मध्ये , तुमच्या सोबत नसलो तरी पण, तुमच्या समोर असुत . या दूर राहण्याची कारणे उगाळण्यात काही अर्थ नाहीये..हे तुला माहिती आहे.

त्या दिवशी मेधाताईंना मंगेशचा निर्णय ऐकून थोडे वाईट वाटले ..पण, मंगेशने केले ते योग्यच केले " हे मान्य केले त्यांनी.

आप्पांची बायको म्हणून ..आपली सुटका नाहीये.. पण, मंगेश, त्याची बायको , मोठी होत जाणारी नातवंडे " यांनी रोज आप्पांचे वागणे, बोलणे का सहन करायचे ? त्यांनी मंगेशच्या निर्णयास शांतपणे स्वीकारले , पण, आप्पांनी घर डोक्यावर घेत मुलाच्या नावाने गोंधळ घालयचा तो घातलाच.

त्याला आता काही महिनेच झाले होते .. मंगेश विषयी आप्पांच्या मनात राग होता ..त्याच्या बद्दल काहीही बोलायचे नाही असे त्यांनी मेधाताईना बजावून सांगितले होते .

भल्या पहाटे उठून अप्पा बाहेरच्या हॉल मध्ये येऊन बसत ..टीव्ही पहात बसायचे , पेपर आला की पेपर वाचन करतांना त्यातील बातम्या. मोठ्याने वाचीत . त्यात स्वतःच्या कमेंट ची एक्स्ट्रा भर घालीत , बेडरूम मध्ये असलेल्या मेधाताईंच्या कानावर या बातम्या आदळत असायच्या ...

एक दोन वेळा त्यांनी बाहेर येऊन सांगितले - असा पेपर वाचू नका , आवाजाचा त्रास होतोय असे सांगून पाहिले आप्पाच ते..त्यांना " गोड बोलण्याची अलर्जी फार पूर्वीपासूनची ." , त्यांचा हा जुना आणि .मुरलेला रोग..आता या पुढे बरा होणारा नाही " याची मेधाताई सकट सर्वांची खात्री पटली होती ..तरी पण. मेधाताई म्हणाल्या ..अहो ..तुमची झालीय झोप ..आमची होऊ द्यांना थोडी तरी झोप ..!

मेधाताई असे काही बोलतील ? आप्पांना हे कधीच अपेक्षित नव्हते ..त्यांनी रागाने पाहिले ,आणि पेपर वाचू लागले.

त्या अप्पांना म्हणाल्या..

तुम्ही असे मोठ्याने ओरडत जाऊ नका , आजूबाजूचे काय म्हणत असतील ,? दोघेच रहातात ,कधी शांत बसत नाहीत "

त्यावर आप्पा म्हणायचे .. हे बघा ..तुम्हाला तर आम्ही कसे आहोत चांगलेच माहिती आहे ,नव्याने काय सांगायचे ?

आता लोकांना त्रास होतो असे म्हणून स्वतःच्या त्रासाबद्दल सांगताय , आम्हाला खुळा समजतंय कि काय तुम्ही ?

आवाज सहन नसेल होत तर - 

" कानात कापसाचे बोळे घालून झोपत जा , थंड वाऱ्याचा त्रास होणार नाही आणि आमच्या आवाजाचा बंदोबस्त .पण केल्याचे समाधान होईल तुम्हाला ..."'

अप्पांकडे दुर्लक्ष करून काही न बोलता मेधाताई आत येऊन पुन्हा काही वेळ आरामशीर पडून राहण्याचे शिकल्या , धीर एकवटून केलेला हा थोडा धाडसीपणा त्यांना सुखद आराम देणारा ठरला.

काल गहरी जातांना मंगेश म्हणाला - आता आराम पडेपर्यंत आप्पांना घरी आणायचे नाहीये. मेधा ताईंच्या सोबतीला सुनबाई येईल असे मंगेशने सांगितले 

हे आठवून मेधाताईंना मनातल्या मनात खुदकन हसू आले.

तसे पाहिले तर अप्पा आणि मेधा ताई . आता सत्तरीच्या घरातील जेष्ठ नागरिक , दोघांनीही लहानपणी गेल्या पिढीतील जीवनमान अनुभवलेले , मोठी भावंडे- पाठची भावंडे , घरात असलेली इतर माणसे , अशा मोठ्या परिवारात राहिलेली ही पिढी ..त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीमुळे ..मना प्रमाणे , मनातल्या स्वप्ना प्रमाणे पुढे जगलीच नाहीत मन मारून जगणे , इच्छापूर्ती न झाल्याचे दुख , कुवत आणि क्षमता दोन्ही बद्दल वाट्याला आलेली अवहेलना यामुळे आपल्यावर अन्याय झाला या भावनेतून सगळ्यांशी जणू वैर असल्यासारखे वागणारे एकच नाही तर अनेकजण पाहण्यास मिळत होते ,आप्पा अशा लोकांचे प्रतिनिधी आहेत असे वाटावे .

मिळालेली नोकरी - संसारासाठी , पोटा पाण्यासाठी करणे भागच होते , शैक्षणिक पात्रता बेताचीच आहे " , बौद्धिक क्षमता , कुवत मर्यादित आहे " हे सत्य आप्पांनी कधीच स्वीकारले नाही याउलट स्वभावाच्या मेधाताई आप्पांच्या आयुष्यात आल्या , पण आप्पांनी आपल्या बायकोला कधीच सन्मानाने वागवले नाही , पाणउतारा करणे, कुजके बोलून टोचणे " ही त्यांची बोलण्याची पद्धतच होती.

सुरुवातीच्या दिवसात आप्पांचे असे बोलणे ऐकून मेधाताईंच्या डोळ्यात खळकन पाणी येई. ,ते पाहून आप्पांची आई समजूत घालायची ..मेधा ,त्याचा स्वभावच असा आहे ग, किती सांगून पाहिलं शेवटी आम्हीच सांगायचं सोडल.आम्ही आई-बाप म्हणून पोराचं वागनं ,बोलन सहन केलाय, आता ..यापुढे तुला सहन करायचं आहे ग बाई , तू तर बायको आहेस." सुटका नाही. बाईच्या नशिबी एकच गोस्त.. मान सांगावा - अपमान गिळावा".

ऑफिसच्या निमित्ताने आप्पा बाहेर , पुढे नोकरीत ऑफिसने त्यांच्यवर कधी नव्हे ते जबाबदारी टाकत .दौरे करण्याचे काम दिले . या नव्या जबाबदारीने आप्पा खुश झाले . आठवड्यातले ४ दिवस बाहेरगावी राहावे लागू लागले ..

हे असे दोन तीन वर्ष खूप छान गेले .मुळात आप्पा नाराज नव्हते , मोठ्या आनंदाने त्यांनी ही जबाबदारी अंगावर घेतली होती.पण हे सुखाचे दिवस फार काळ राहिले नाहीत , एके दिवशी ऑफिस मध्यला एका काडी-मास्टरने ", घरी येऊन अप्पांना सांगितले ..

काय आप्पा , तुम्ही इतके खुळे असाल याची कल्पना नव्हती बा , अहो तुमच्या ओफिसातील वागण्याला ,बोलण्याला कंटाळून मोठ्या साहेबांनी मोठ्या हुशारीने ही नवी पोस्ट निर्माण केली , तुमची बला बाहेरच बरी .

आणि तुम्हाला वाटले ..साहेब किती छान . बढती मिळाली , टुरिंगमुळे आता जास्त भत्ते पण मिळतील , अप्पा , यात मोठी मेख मारलीय ऑफिसने -आणि साहेबाने..

टुरिंग जॉबचे टीए बील , भत्ते हे मिळाले तुम्हाला बरोबर , पण बढती कागदावर राहिली , पगार कुठे वाढवलाय तुमचा ?

पाहिलंय का तुम्ही कधी तरी हे ऑफिसमध्ये येऊन..?,मला आपलेपणा वाटतो आप्पा तुमच्याबद्दल , म्हणून सांगितले ,नाही तर मुझे क्या पडी ?

दुसरे दिवशी आप्पांनी ऑफिस गाठले , दिवसभर एकच गोंधळ ,साहेबांच्या नावाने आणि ज्यांचे जमत नसायचे अशा सगळ्यांशी आप्पा भांडत राहिले, भीडभाड न ठेवता आपांच्या तोंडाचा पट्टा सुरु होता . आप्पांची बाजू चूक नव्हती , खोटी नव्हती ...

असे असले तरी ..बहुमत त्यांच्या बाजूने नव्हते "ही दुर्दैवाची गोष्ट होती .संतापलेल्या साहेबांनी आप्पंना "वरिष्ठांशी गैरवर्तणूक ,आणि कार्यात अडथळा " आणल्याबद्दल दोषी ठरवीत तत्काळ सस्पेंड करीत घरी बसवले .

 युनियनने हस्तक्षेप करीत ..अर्धा पगार तरी द्यावा .घरच्या माणसांची उपासमारी करू नये " अशी विनंती केली . 

मेधाताईंच्या आयुष्यातील हाल-अपेष्टा सत्र वाढतच गेले . झाल्या प्रकाराने आप्पा "वेडे " झाले नाही " यातच समाधान मानण्याची वेळ मेधाताईंवर आली , मोठ्या हिम्मतीने आहे त्या पगाराच्या पैश्यात त्यांनी पुढचे दिवस सर्वांना जागवले असेच म्हवे लागत होते.

ऑफिसातले प्रकरण मिटवले गेले .. या पुढे पद-उन्नती नाही, सध्या आहे त्याच पदावर शेवट पर्यंत नोकरीवर राहावे लागेल .कबूल असेल तर रुजू व्हावा ,नसता घरी ..! काही न बोलता .आप्पा रुजू झाली , उपासमार टाळली "

आप्पा वरून शांत होते आत मात्र मनोभंग झाल्याचा जावालामुखी होताच. ज्यांनी ज्यांनी त्यांना त्रास दिला त्या सर्वांना आप्पांनी या न त्या प्रकरणात अडकवून टाकले .आणि शांतपणे बघत राहिले.

आणि वयोमानाप्रमाणे आप्पा एक दिवस निवृत्त झाले .

आप्पा दिवसभर रिकामे बसून .मेधाताई आणि मुलांना कोणत्याही कारणावरून बोलू लागले . चूक असो,बरोबर असो ,आप्पा बोलले नाहीत असे व्हायचे नाही , सुनबाई आणि मुलाने आपल्या मुलांना समजवले , त्यांनी समजून घेत मेधाताईच्या मनावरचे ओझे कमी केले .

सुनबाई म्हणे - 

अहो आई, वडील माणसांचा आदर करावा हे मान्य आहे मला, पण, आप्पा तुमचा पदोपदी अपमान करतात, मनाला यातना व्हाव्या असे त्यांचे वागणे बोलणे असते, आम्ही काय तुमच्या पासून वेगळे राहून सुटका करून घेतली .तुमचे काय ? हे असेच चालू राहणार काय ?

बदला स्वतहाला, अप्पांचा अपमान करा असे म्हणणार नाही मी. पण, त्यंना तुम्ही तसेच उत्तर देऊ शकता, याची जाणीव होऊ द्या . आता सहन का करायचे तुम्ही ? अजिबात सहन करू नका.

अप्पांनी तुमचे आभार मानायला हवे की, त्यांच्या सारख्या विक्षिप्त माणसाला आयुष्यभर सांभाळून घेतलेत, ते तर दूरच ..उलट दिवसे दिवस. त्यांचे वागणे त्रासदायक होते आहे.

बदला स्वत:ला ..

मेधाताई विचारातून जाग्या झाल्या ..त्यांनी भिंतीवरच्या घड्याळात पाहिले .. सकाळचे अकरा वाजले होते ..अप्पा साठी खाण्याचे घेऊन जाण्याची वेळ झाली होती . डॉक्टर घरच्या सारखा .मंगेशचा मित्र त्याचा राउंड असतो या वेळी,

त्याची भेट होईल .

मेधाताई हॉस्पिटल मध्ये पोन्च्ल्या , अप्पांच्या रूम मध्ये गेल्या ..

आत आलेल्या मेधाताईना पाहून अप्पा हसले ..,म्हणाले -

"छान वाटत असेल ना तुम्हाला ,बरा अडकवून टाकलाय मला , तुम्ही मिळून हे केलाय ,मला कळत नाही ,असे वाटतय का ?

थांबा -घरी येऊ द्या मला , मग बघतो एकेका कडे.

 अप्पाकडे रागाने पहात मेधाताई बोलू लागल्या -

 तुम्हाला काय वाटले तसे आमच्या मनात ही नसते , तुम्हाला कधी काही चांगले दिसत नाही की मनात काही चांगले येत नाही.. नेहमी पाहावं तुमच रडगाणे चालू.

एक लक्षात ठेवा - मी म्हणून इतके दिवस गप्प बसून राहिले , तुमचा कधी अपमान केला नाही. वाटायचं या माणसान खूप भोगलय ,पण असे समजणे हीच माझी चूक होती.

तुम्ही स्वतःच्या पुढे इतर कुणाचा धड विचार केलाच नाही . तुमचा मुलगा , सून, नातवंडे तुमच्या वागण्याला -बोलण्याला कंटाळून तुमच्या पासून दुरावली " त्याचा तुम्हाला एकदाही पश्चाताप झाला नाही " किती वाईट आहे हो हे.

तुम्हाला आता घरी यायचे असेल तर ..यापुढे असे वागून चालायचे नाही. कुणी तुमचे वागणे का सहन करायचे ?

नीट ऐका ..बस झाले आता .. या पुढे मी सुद्धा तुमचे वागणे सहन करणार नाही. आणि का सहन करावा तुमच्या वागण्यामुळे होणारा त्रास.?

अजून पंधरा दिवास कमीत कमी ..तुम्हाला इथे पेशंट म्हणून राहायचे आहे..त्या नंतर आम्ही विचार करू ..तुम्हाला घरी केंव्हा घेऊन जायचे ? की नाही न्यायचे ?

.आपली बायको , मेधा इतके बोलू शकते आपल्याला ? 

समोर बसलेल्या मेधाताई कडे अप्पा बघतच राहिले ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational