The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Arun V Deshpande

Inspirational

3  

Arun V Deshpande

Inspirational

लेख- उमज पडेल तर ...!

लेख- उमज पडेल तर ...!

2 mins
16K


एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून आपला प्रत्येकाचा परिचयाचा परिसर वेगवेगळ्या भावनिक स्तरावरचा असतो.

यालाच आपण 'व्यावहारिक पातळीवरचे वागणे " आणि भावनिक पातळीवरचे वागणे " असे म्हणत असतो.

याचे कारण बहुधा आपल्याला आलेले आणि येणारे अनुभव असतात.

ऐकीव माहितीवरून एखाद्या बद्दलचे आपले मत पूर्वग्रहदुषित' असू शकते प्रत्यक्ष्य सहवासात आल्यावरती जो अनुभव येतो

,तो सर्वस्वी भिन्न असू शकतो.परिणामी एखाद्या बद्दलचे आपले मत प्रतिकूल न राहता ,ते अनुकूल होऊ शकते .

असे म्हटले जाते की -"आपण मुखवट्यांच्या जगात वावरत असतो.",त्यामुळे पदोपदी आपल्यला मानसिक धक्के सहन करावे

लागतात."स्वार्थी माणसांच्या जगात फसवणूक होणे अटळ आहे.हे विधान लक्षात ठेवले तर अपेक्षाभंगाच्या दुख:ची तीव्रता बरीचशी कमी होइल.

'माणसे स्वार्थी का होतात ?,स्वार्थीपणाने का वागतात ?" याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर असे सापडते की

"मोह,माया ,मत्सर ,हेवे-दावे,' अशा भावना ज्या वेळी प्रबळ असतात ,त्यावेळी व्यक्तीचे मन स्वार्थीपणाच्या आहारी गेलेले असते.",

अशा माणसांना गोष्टी सहजासहजी नाही मिळाल्या तर त्या ओरबाडून मिळवण्याची त्यांची जबरदस्त लालसा असते..या आणि

अशा व्यक्तींकडून 'स्व'बद्दलच अधिक विचार केला जातो हे उघड आहे.त्यमुळे इतरांचा विचार तो करूच शकत नाही.

स्वार्थीपणाने वागणाऱ्या माणसांकडून सहजपणाने फसवणूक केली जाते , ती अशा विपरीत भावनांच्या आहारी गेल्यामुळे.

"सामाजिक जाणिवा आणि त्यांची मुल्ये " या गोष्टी आपल्या आचरणात आणण्याची कल्पना हास्यास्पद " ठरवणाऱ्या मंडळींची

वर्दळ आपल्या भोवती कायम असते.

अशा प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता कार्य करणाऱ्या माणसांच्या वाट्याला 'कुचेष्टा,टिंगल -टवाळी' या गोष्टी नेहमी येतात .

ज्या गोष्टींना चांगले म्हटले जाते ", -नेमक्या त्याच गोष्टींना मोडीत काढणारी मंडळी" भेटतात .

त्यामुळे माणूस अधिक नाउमेद होऊन जातो. अशा वागण्याने या प्रकारच्या लोकांना कोणते समाधान मिळत असेल ?

आपले परस्पर -सम्बध" कोणत्याही नाते-स्वरूपाचे असोत .ते केवळ पैशांच्या अपेक्षेने जर ठेवलेले असतील तर या अशा

नात्यांचा पाया हा केवळ ठिसूळ असतो. कारण "जोवर पैसा गोड -तोवर सारे गोड " असे असते.

त्यानंतर हा पैसा संपल्या वरती "कुणीच आपुला नसे" हे कटू सत्य पचवावे लागते.

आपले मैत्रीचे नाते,पारिवारिक नाते " हे सारे "रेशीम धाग्यांचे नाजूक विणकाम असते.या नात्यांना देखील "मान-अपमान -,

अपेक्षा -उपेक्षा '.संशय -मत्सर ,यांचे "ग्रहण" लागू शकते .आणि यामुळे सर्वत्र दाट काळोख ,आणि गैरसमजाचे दाट धुके " पसरते आणि मग "सामन्जास्स्याचा लक्ख प्रकाश पडण्यास वेळ लागतो .परिणामी मने दुखावतात ,माणसे दुरावतात हे किती वाईट आहे.

" डोळ्यांने पाहण्यात आणि कानांनी ऐकण्यात चार बोटांचे अंतर असते "याचा विसर पडतो आणि मग

गैरसमजाचे पोळे फुटते ,आणि या माशा विनाकारण घोंगावत राहून आपल्या मनाला कलुषित करून टाकतात.

हे सारे आपण टाळू शकणार नाहीत का ?,

त्यासाठी स्वतःकडे कमीपणा घेऊन ,मनाचा मोठेपणा दाखवून ,मोकळेपणाने एखाद्या बद्दल

चार खरे आणि कौतुकभरे शब्द बोललो तर अनेक माणसे जोडता येतील .माणसे दुरावण्याच्या या काळात माणसे जोडण्याचे आपले प्रयत्न आणि कार्य देखील समाजकार्य ठरू शकेल.

या सर्वांचा सर्वांना उमज पडेल तर .............!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational