Arun V Deshpande

Inspirational

3  

Arun V Deshpande

Inspirational

लेख- जाणीव

लेख- जाणीव

2 mins
16.2K


ज्याच्या मनाला जाण आहे ,त्यालाच जाणीव होऊ शकते .जो दुसर्याची मने

आणि त्यांच्या मनातील ओळखू शकतो, त्यालाच मनातले सारे काही जाणून घेता येते.

पण हे सारे सोपे आहे ",असे मात्र मुळीच नाही. यासाठी आपले मन मोठे असायला हवे आहे.

स्वत: पेक्षा अगोदर इतरांच्या मनांचा विचार करण्याची सवय असायला हवी . तरच

आपण स्वतः पलीकडले असे काही पाहू शकतो, त्याबद्दल विचार करू शकतो. अशा

स्वभावाची व्यक्ती आपल्या सहवासात आल्यावर ,त्याच्या बद्दल आलेल्या अनुभवावरून

सहजतेने बोलून जातो."खरेच- जाणीव आहे बरे का याला ..!.

सुखाच्या वेळे पेक्षा "- संकट प्रसंगी , अडचणीच्या वेळी ,निराशेच्या चक्रात सापडल्यावरती

मानसला माणसाचे गरज असते. कुणी आपली अडचण समजून घ्यावी , दुक्ख समजून घ्यावे, संकट आले आहे-,त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा असते , आणि ती देखील समजून घेऊन, न- सांगता." सांगितल्यावर मग काय उपयोग.?

म्हणजे एक्नुच " जाणीवेचा हा खेळ".असा तसा सोपा नाही,

समज यायला लागते ,तसे आपल्या जाणीवानचा विस्तार होऊ लागतो.

आणि या उमजण्याची -समजण्याची पातळी वरवरची असेल तर आपण

काही उपयोगाचे ठरत नाही. आणि हे" पातळी जर वरची " असेल तर, आपल्याला

लोकांना समजून घेणे " हे जबाबदारीचे काम स्वीकारावे लागते..

वास्तविक ही जबाबदारी जोखमिचे काम असते,म्हणजे - एक तर लोकांना समजून घ्या,

त्यांच्या मनाप्रमाणे करून द्या," ते खुश होतीलच याचे खात्री मात्र नसते.

पण असे "जाणीव असलेले , जबाबदार - माणसे ", आपल्या भोवती असतात म्हणून तर

भांबावून गेलेल्या , गोंधळून गेलेल्या अनेकांना या जाणीवेच्या -जबाबदार माणसांची मदत होते.

जाणिवेचे प्रकार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे असतात , त्यामुळे अनेक

अवधाने ", पाळावे लागतात. तारतम्य असणे, गांभीर्य असणे ,प्रसंगावधान असणे,

विचारांची परिपक्वता असणे, निर्णय -क्षमता असणे", असे अनेक गुण- विशेष

असणारी व्यक्ती सहाजिकच एक जबाबदार माणूस म्हणून ओळखली जाते.

हे सगळे गुण काय आणि या पैकी काहे थोडे गुण -थोड्या प्रमाणात जरी आपलयात

असले तरी ,आपण खूप काही करू शकतो.

स्वतःचे जगणे जगतांना आपण इतरांसाठी जगायचे असते ", ही

जाणीव "आपल्या मनाला झाली तर, आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होईल.


Rate this content
Log in