Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

आपल्या आठवणी

आपल्या आठवणी

2 mins
9.2K


मित्र हो. नोकरीच्या निमित्ताने आपले परिचय झाले , प्रत्यक्ष सहवास घडलाय ..ते दिवस आणि त्यात अनुभवलेले खूप काही जसेच्या तसे आपल्या आठवणीत असते , आपल्या आठवणी आपल्याला कायम सोबत करीत असतात

मी केलेली ही एक छोटीशी कविता -

आठवणी

--------------------------

आवडत्या माणसांच्या आठवणी

ठेवाव्यात मनाच्या पुस्तकात

खुणा असतात त्यांच्याच

पानापानागणिक ....

केंव्हाही वाचावं मनातल्या मनात

आपलं आवडतं माणूस

त्याच्या आठवणींसकट

बिनबोभाट ....!

इतरांशी शेअरिंग करणे सोपे असते पण स्वतःशी संवाद साधता येतो ", हे बहुतेक जणांना माहिती नसते ,कारण आपण स्वतःला कधी वेळ देत नसतो , आता तर आपले निवृत्ती-पर्व " सुरु झाले आहे , दैनदिन कार्यक्रमात अनेक छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात ", असे जरी असले तरी ..थोडा वेळ नक्कीच उरतो , ज्याचा विनियोग आपण स्वतःसाठी करायचा असतो.

आपण सर्व ज्या संस्थेत नौकरी केली ..ती आता काळाच्या उदरात गडप झाली आहे , तरी आपण त्या आठवणी नव्या पिढीला सांगू शकतो ..कारण या आपल्या आठवणींना एक भावनिक किनार आहे, गेल्या पिढीतील जीवनमान ,कौटुंबिक आणि पारिवारिक नातेबंध , सामाजिक वातावरण .हे सांगत असतांना .नव्या पिढीला "उपदेश डोस " वाटणार नाहीत अशा पद्धतीने आपल्या आठवणी जरूर शेअर केल्या पाहिजेत .

आपल्या आठवणी .सुखाच्या , दु:खाच्या , भल्या -बुऱ्या अनुभवाच्या असतात , अनेक प्रसंगांनी , अनेक घटनांनी आपल्या खूप शिकवलेले असते ,जीवन-अनुभव ..आपल्या मनावर आठवणींच्या रुपात पक्के कोरलेले असतात ,

आठवणीचा खजिना नव्या पिढीसाठी मुक्त मनाने खुला ठेवला तर . मौल्यवान आठवणी पाहून आपले मन पुन्हा या आठवणीत हरवून जाईल हे नक्की , आणि ज्यांना या आठवणी सांगुत त्यांच्यासाठी आपल्या आठवणी म्हणजे एक आगळे जीवन दर्शन असेल.

लेख कसा वाटला ?

अभिप्राय कळवणे.


Rate this content
Log in