Sangita Tathod

Romance

2.6  

Sangita Tathod

Romance

नव्याने जुळताना

नव्याने जुळताना

3 mins
176


नव्याने जुळताना सई आणि जुई दोघी सख्या बहिणी.सई जुईपेक्षा तीन वर्षांनी मोठी.दोघी बहिणींचे खूप पटायचे.एकमेकींशीवाय त्यांची खरेदी होत नसे. घरी काही नवीन पदार्थ बनविला तर जुई घरी नसेल तर सई तो खात नसे.दोघींचे प्रेम बघून नातेवाईक म्हणत यांनी एकाच घरी दिले तर बरे होईल.जुई एका बँकेत जॉबला होती. सई पोस्ट ग्रॅज्युएट झाली.तिला चांगले स्थळ चालुन आले.मग नकार कशाला द्ययाचा म्हणुन.लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला.घरातील पहिलेच लग्न धुमधडाक्यात पारपडले.पाठवनीच्या वेळी जुई आणि सई खूप राडल्या. जुई लग्नानंतर दोन महिन्यातच माहेरी परतआली.तिला सासरी खूप त्रास होता.कोणाला फोनकरायला बंदी ,घरातुन बाहेर जायचे नाही.नवरा सततसंशय घ्यायचा.घरी कशाला कमी नसतांनाही सासुप्रत्येक काम घरीच करायला लावायची.अशा सर्वगोष्टींना जुई अक्षरशः खुप कंटाळली होती.एक दोनवेळा तर नवऱ्याने तिच्या अंगावर हात सुध्दा घातलाहोता.सईने जुईला तिचा सासुरवास सांगितला.या गोष्टीचा जुईच्या मनावर खूप परिणाम झाला.माझ्या साध्या ,सरळ सुस्वभावी ताईला कोणी त्रासच कसा देऊ शकते ? एक वर्षांनी जुईला तिच्या नावऱ्यापासून घटस्फोट मिळाला.पण या काळातजुईची बिघडलेली मनस्थिती सईने जवळून अनुभवली होती.


तिचा लग्न या संस्थेवरचा विश्वास उडाला होता.इकडे सईच्या बँकेत काम करणारा समीर यालासई आवडू लागली होती. जवळपास एक वर्ष तो सईला या ना त्या कारणाने सईला सांगण्याचा प्रयत्नकरत होता.पण सई त्याला अजिबात रिस्पॉन्स देतनव्हती.शेवटी एक दिवस समीरने सईला कॉफी शॉपमध्ये नेले ,तिला सरळ प्रपोज केले ," सई ,तू मला खूप आवडतेस ,माझ्याशी लग्न करशील का "सईला ,समीरचा खूप राग आला.लग्न हा शब्दऐकताच ती संतापली.म्हणाली,"समीर ,तू समजतो कोण स्वतःला.मी तुझ्याशी लग्नकरायचे सोड.आज पासून एक शब्दही बोलणार नाही."

रागारागाने सई निघून गेली.काही दिवसातचसमीरने दुसरीकडे बदली करून घेतली.त्यानंतरत्याने लग्नही केले.समीरच्या लग्नाची पत्रिका पाहूनसईच्या डोळ्यात नकळत पाणी आले. सईच्या घरी, तिच्या लग्नाचा विषय निघत होता.तर सईने स्पष्ट सांगुन टाकले , °मला लग्न करायचे नाही.तुम्ही कोणीच मझ्यासाठीमुलगा शोधण्याचे कष्ट घेऊ नका.ताईच्या लग्नाचे जेतमाशे झाले तसे मला करायचे नाही."" सई ,असा विचार नको करूस ,माझं लग्न सक्सेसनाही झाले म्हणुन तुझेही होणार नाही असे नाही."जुईने. सईला तिच्या आई ,वडिलांनी ,जुईने खूप समजावले पण तिचा नकार कायम राहिला. सईला वाटले होते समीर लग्न करून त्याच्यासंसारात खुश असेल.पण काही दिवसातच बातमीआली की ,समीरची बायको फारच विचित्र आहे.ती त्याला सतत मानसिक रित्या टॉर्चर करीत असते.तरीही सहनशील स्वभावाच्या समीरने सर्व सहन केले.समीर बद्दल हे सर्व ऐकून सईला फार दुःख होते.


शेवटी तीन वर्षाची लग्न गाठ तुटली.पुन्हा योगायोगाने सई आणि समीर एकाचबँकेत आले.समीर आधीच खूप थकला होता.सईलात्याच्याकडे बघुन फारच वाईट वाटत होते.सईत्याच्याशी मुद्दाम बोलायची.जे तिच्या सालस ताईसोबत झाले होते ,तेच समीरच्या बाबतीत झाले होते.समीर त्याच्या वैयक्तीक आयुष्याचा कोणताही परिणाम त्याच्या कामावर होऊ देत नव्हता.त्याची तिचं कामाविषयी तळमळ.तेच त्याचे सर्वांशी आपुलकीचे वागणे.हे बघुन सई पुन्हा त्याच्याकडे आकर्षित झाली होती.काही चुकीच्या समजुती मुळे सई पासुन सई दूरझाली होती.तिला वाटत होते एकजात सर्व ,पुरुषवाईट असतात.एका माणसाने माझ्या ताईच्याआयुष्याचे वाटोळे केले.अशा विचारांमुळे सईनेसमीरच्या बाबतीत असलेल्या तिच्या मनातील प्रेमभावना पूर्णतः पुसून टाकल्या होत्या.


पण... समीरला पुन्हा तिच्या डोळ्यासमोर पाहून, त्या भावना पुन्हा उफाळून आल्या.एक दिवस समीरलाती हट्टाने बाहेर घेऊन गेली.समीरला आश्चर्य वाटले पण तो काही बोलला नाही.शेवटी सईने समीरचीहात हातात घेऊन म्हणाली ," समीर ,तुला ओळखण्यात मी चुकली रे.जी गोष्टमी आधीच करायला हवी होती.ती आज करतेय.मला माफ करून करशील का माझ्याशी लग्न - -?" अनपेक्षित असलेल्या प्रश्नाने समीर सुखावला.उशिरा का होईना सईने समीरला मनातील सर्व सांगितले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance