नववर्षाचे शुभारंभ
नववर्षाचे शुभारंभ


ऋतूबदलण्याचे सृजनशील हिरव्यागार सदिच्छा!जूने साचलेले कुबट अटून जावून नविन लसलसणारे चैतन्यमय असे काही तूमच्या मनामनात रूजो हीच चैत्र पाडव्याच्या निमित्ताने देवा जवळ प्रार्थना.
पाडव्याचा विशेष संदर्भ महणजे, रामायणातील, प्रभु श्रीराम या क्षत्रिय राजाने रावण या ब्राह्मणाचा पराभव करून त्याचा वध करून विजय मिळविला. अशा श्रीरामाचे लक्ष्मण, सीता, हनुमान व इतर वानर सैन्यासह अयोध्येत आगमन झाले तो हा दिवस. या दिवशी अयोध्येतील जनतेने मोठ्या आनंदाने आपआपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या. तोरणं बांधली. रांगोळ्या काढल्या. म्हणून अशी ही चैत्र-पालवी, अखंडता स्नेहाची, जपणूक परंपरेची , उंच शुभ-गुढी आदर्शाची , संपन्नेतीची , उन्नतीची , मराठी नववर्षाचे शुभारंभ साजरा करण्यासाठी दर वर्षी घरो-घरी आनंदाने उभारली जाते.