STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

नवरोबा की बैलोबा

नवरोबा की बैलोबा

4 mins
311

रात्रीचे दहा वाजले होते,शेजारच्या घरातून जोर जोरात भांडणाचा आवाज येत होता .उदय आणि मीना भांडत होते.मिनाचा आवाज अगदी बाहेर पर्यंत ऐकू येत होता.उदय तिला शांत रहा म्हणत होता पण ती ऐकायला तयार नव्हती.मिनाची बडबड चालूच होती.


दुसऱ्या दिवशी सोसायटीत यांच्याच भांडणाची चर्चा ."उदय ला त्याच्या बायकोने बाहेर हाकलले होते म्हणे .बिचारा गार्डन मध्ये फिरताना मला दिसला.कसली कजाग बायको मिळाली आहे त्याला.नुसती भांडत असते.सासू सासऱ्यांना तर भाव पण देत नाही आणि हा उदय बैल आहे नुसता..त्या मीना पुढं लोटांगण घालतो.


मग काय त्याला आई वडिलांची काही ही पडलेली नाही.भांडण मिटवायला मग बायको ला फिरायला घेवून जातो.वर आई वडिलांनाच गप्प रहा म्हणतो.


काय म्हणून श्रीमंत घरातली पोरगी केली उदय ने.ना त्याला किंमत देते ना त्याच्या आई वडिलांना.पैशाचा माज आहे तिला आणि उदय तिचा शब्द खाली पडू देत नाही.बायकोचा गुलाम आहे नुसता.


असे अनेक उदय आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो.बायको चा शब्द झेलनारा ,बायको साठी आई वडिलांना दुखणारा,बायको चे सगळे निमूट पने ऐकणारा.वेळ आलीच तर तिचा मार ही खाणारा..तेव्हा आपण सहज बोलून जातो." अरे याने काय हातात बांगड्या भरल्या आहेत काय..किती बायको चे ऐकतो .का नाही तिला एक थोबाडीत देवून सरळ करत.आई वडिलांचा अपमान करते ती आणि हा बघत बसतो...बैल आहे नुसता..". पण वाचक हो,कधी तरी विचार केलात का की त्याच्या या वागण्या मागे काही कारण असेल?


आज सगळे कायदे हे स्त्रियांच्या बाजूने आहेत.सासरी जरा जरी त्रास झाला तरी ती सून लगेच पोलीस कंप्लेंट करण्याची धमकी देते.नवरा काही उलट बोलला तर त्याचा कांगावा करत माझ्या वर घरगुती अत्याचार होतो.हिंसा होते अशी तक्रार द्यायला ही स्त्री मागे पुढे बघत नाही.त्यात "४९८ अ घरगुती हिंसा " हा कायदा खास स्त्रियां साठी आहे,याचा गैरवापर बऱ्याच महिला करतात.मी अशी अनेक उदाहरणे बघितली आहेत अगदी जवळून .की तिथे कायद्याचा बडगा दाखवुन स्त्रिया नवर्यावर अत्याचार करतात,त्याच शोषण करतात.नवर्या सोबत त्याच्या आई वडिलांना ही वेठीस घरतात.घरात सगळ्यांनी तीच च ऐकले पाहिजे ,ती म्हणेल तेच केले पाहिजे इतकी तिची दहशत असते.आपल्या मुलाला काही त्रास व्हायला नको म्हणून बिचारे आई बाप निमूट त्या सुनेचा त्रास सहन करत राहतात.मुलां कडे बघून पुरुष ही मग माघार घेत असतो.


मला नाही माहित की या स्त्रिया अस का वागतात..म्हंजे घरात सगळ काही असते सुखसोयी असतात.तरी सुद्धा त्या अशा वागतात,नवर्या ला आपल्या ताब्यात ठेवतात,त्याच्यावर हुकूमत गाजवतात,तर कधी कधी हात ही उचलतात.मग मला सांगा तो नवरा काय करणार अशा बायको समोर...बैल बनुनच राहणार ना? का उतार वयात वृध्द आई बापाला त्रास देणार? त्याच्या मनात खूप असते की आई वडिलांना सुखात ठेवावे..पण बायको अशी कर्दनकाळ असेल तर त्याच ही तिच्या पुढे काही ही चालत नाही.तिला नुसते जाब विचारले तरी ती मारक्या म्हशी सारखी त्याच्या अंगावर धावून येते.तिच्यावर हात उचलले तर कोसो दूर...तिला हाकलून देवून पण उपयोग नाही..कारण मुलांचे हाल.बिचारा आई वडील आणि बायको मध्ये पिसला जातो...मग काय इलाज आहे त्याचे कडे...तिचा बैल त्याला बनावेच लागते.


अजून एक आज काल मुलीचे आई वडील नको इतका हस्तक्षेप मुलीच्या संसारात करतात (काही अपवाद सोडून). मग काय मुलीच्या अंगात दहा हत्ती चे बळ संचारते.आणि तिचे आई वडील आपली मुलगी चुकते हे मान्यच करत नाहीत.ती म्हणेल ती पूर्व दिशा.

आपल्या डोळ्या देखत आपल्या मुलाचे हाल आई बाप बघत असतात आणि खचून जातात.कुठल्या मुहूर्तावर हिला करून आणली असे त्याने वाटत राहते.त्याच्या मनात आपल्या आई वडिलां साठी खूप काही करायचे असते,सूख द्यायचे असते पण बायको च्या जाचा मुळे तो स्व:ताच भरडत राहतो..आई बापा साठी त्याच हृदय तूटत असते.तो नालायक नसतो ..मुलगाच असतो पण परिस्थिती त्याला नाचवत असते .

जवळ जवळ ७०% टक्के माझ्या माहिती नुसार घरात हेच चित्र पाहायला मिळते.जरा काही बायकोला नवरा बोलला की ती जीव द्यायची धमकी देते.मला समजत नाही या बायका अशा कशा वागू शकतात..? त्यांच्या घरात तिच्या माहेरी तिचा भाऊ,वहिनी असतील तिथे तिची वहिनी अशी वागत असेल तर यांना चालेल का? तिच्या आई वडिलांची आबाळ तिला सहन होईल का? आज मुले अगदी आनंदाने बायकोच्या आई वडिलांना ही सांभा ळायला तयार असतात.तिच्या असंख्य चुका पोटात घेत असतात,त्यांना घर वाचवायचे असते..मुलां साठी जीव तुटतो त्यांचा.याला ही काही बायका अपवाद आहेत .आयुष्य एकदाच मिळते ते आनंदाने सुखात का नाही अशा बायकांना जगता येत.ही त्यांची एक विकृतीच म्हणावे लागेल मग! .लग्न झाल्या पासून नवर्या ला त्याच्या मित्र मैत्रिणी पासून ही तोडतात .कुठे त्याने ज्याचे म्हंटले की तिची परवानगी घ्यायची.तिला सारखा फोन करून कुठे आहे,काय करतो,ड्रिंक तर करत नाही ना सगळे अपडेट द्यायचे.खरच ही एक विकृतीच आहे.अशा स्त्रिया या नक्की मेंटली डिस्टर्ब असतील यात शंका नाही.

मला इतकंच म्हण्याचे आहे की सगळेच पुरुष बायकोच्या ताटा खालचे मांजर नसतात,जे असतात त्यांना अस बायकोचा बैल,बायकोचा गुलाम म्हणण्या आधी त्याची अगतिकता समजून घ्या.सगळ्याच बायका ही अशा नसतात ज्या नवर्याना बैल बनवतात.

प्रेमाने, समजस पने,आदराने एकमेकांना नवरा बायको ने कामात मदत केली .तिने ही त्याचे घर ,त्याचे आई वडील आपले मानून राहिले ..प्रेमाने सगळ्यांना सांभाळले तर तिच्या या प्रेमा खातर सगळेच पुरुष मग आनंदाने तिचा "गुलाम " बैल" मांजर" अजून काय बाबू, शोना,बेबी..सगळ.सगळ बनायला तो तयार आहे.

समाप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract