Pradip Warade

Inspirational

3.3  

Pradip Warade

Inspirational

नवनिर्माणाची पहाट....

नवनिर्माणाची पहाट....

6 mins
949



“आमच्या चेहऱ्यावरील हास्य तू

मनमोहक आकर्षक कृष्ण तू

तूची सर्व भक्तांचा ईश्वर

तूची भर्ता भोक्ता महेश्वर

घरात देवरूपी पुत्र अवतरले

कुलकर्णी कुटुंब आनंदले….”

आज खूप- दिवसांनी नाना म्हणजेच सुधाकर राव "संचीत" चा अडगळीतील फोटो बघून त्या बाजूला लिहिलेल्या त्या ओळी कौतुकाने वाचत त्या चेहऱ्याकडे बघत लीन झाले होते, संचित च्या हुशारीचं त्यांना नेहमीच कौतुक वाटायचं, तो त्यांच्या सारखाच होता। करारी बाणा,दृढ निश्चयी, स्वच्छंदी मनाला आवडेल तसं वागणारा MAY BE त्याच्या हजारो चुका असतील पण स्वतःच्या मुलातील चुका शोधेल तो बाप कसला ?

तेवढ्यात " हे मला पगार देतात म्हणजे यांनी मला काय विकत घेतलाय का? माझी मला काही LIFE आहे कि नाही ?" हाच विचार करून घालून पडून बोलणाऱ्या मॅनेजर बद्दल संचित राग व्यक्त करत होता. परंतु नाना आज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते "दरवेळेस आपल्यामुळेच हा जॉब सोडतो याचा हा स्वभाव बनायला नको" हाच विचार करून नानांनी त्याला बोलायला सुरुवात केली "अरे किती जॉब सोडणार अजून? आठव मी रिटायर झाल्यापासून हा १० वा जॉब होता तुझा असं म्हणत सुधाकररावांना अश्रू अनावर झाले होते …”

त्यांना माहिती होत कि त्यांचीच करारी वृत्ती संचितला मिळालेली आहे, पण आजकालच्या जमान्यात जरा …अशक्यच ना ? असं म्हणूनच सगळ्या तत्वांना गुंडाळून; एका खाजगी कंपनी मध्ये २५ वर्ष नोकरी करून घराचा संभाळ केला होता त्यातून संचितचं आणि प्रतिभाच्या शिक्षणं देखील केली होती.

प्रतिभा घरातील मोठी मुलगी कसंबसं लग्न करून तिच्या घरी नांदत होती. परिस्थिती तशी बेताचीच पैशानी नसेल तरीही ती माणसं मनानी खूप चांगली होती, संचितच्या इच्छेविरुद्ध हे लग्न करण्यात आलेलं होत, संचीत नेहमी म्हणायचं तिला राणीसारखी ठेवतील अशाच घरी द्यायचं पण परिस्थितीसमोर कुणाचं काय चालत? तसंही गरिबांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी असतातच कुठे?

पण संचित वर मात्र नानाचा पूर्ण विश्वास होता हुशार व धाडसी निर्णय घेणारा आणि परिस्थितीशी दोन हात करून नशीब बदलविण्याची ताकद ठेवणारा… पण त्याच असं वागणं बघितलं कि जरा भीती वाटते…

आज तो देखील खिन्न होता नेहमी हसणाऱ्या सुधाकररावांनी एक वेगळी प्रतिमा त्याच्यासमोर होती, आईला रडताना अनेकदा त्याने पाहिलं होतं….पण नानाची अवस्था पाहून संचितलाही अश्रू अनावर झाले होते, कसाबसा त्याने तेथून पळ काढला, बाहेर आला; पायात चप्पल घातली आणि आपल्या पल्सर गाडीला किक मारून निघाला; त्याच्या आवडत्या ठिकाणी त्या आवडत्या व्यक्तीला भेटायला, गावच्याच बाजूला 4-५ km अंतरावर एक तलाव होता तसा तो गांधेली गावाच्या शिवरातलाच परंतु संचितच्या अगदी जवळचा…. संचितची ‘आवडती व्यक्ती’ जवळच होती. पाण्याकडे बघत त्या आवडत्या व्यक्तीला त्याने प्रश्न केला, खरंच माझं इतकं चुकत का ? मी इतका वाईट आहे का ? माझ्या कुटुंबाच्या सध्या गरजा सुद्धा पूर्ण करायची माझी लायकी नाही?

हेच प्रश्न विचारत होता तो स्वतःला,हो त्याची आवडती व्यक्ती म्हणजे तो स्वतः…

हीच ती जागा होती इथे आल्यानंतर तो स्वतःला भेटायचा, असंख्य प्रश्नांची उत्तर त्याला इथेच गवसली होती आणि इथेच उगवणार होती त्याची “नवनिर्माणाची पहाट”….

शांत गार वारा, मंद वाहणारे पाणी, वृक्षपर्णांचा सळसळ आवाज, बाहेरून असणारी कितीही शान्तता मनात चाललेल्या वादळा ला थाम्बवण्यास असमर्थ होती. अगदी उदास अंतःकरणाने बसलेला असतानाच त्या गाण्याची आठवण झाली..

“ना कोई उम्मीद है

ना कोई ख्वाब है,

ना पैरोतले वो रौब है,

मेरे लिये तो जिंदगी

बस एक खौफ है!! "

अचानक त्याचे लक्ष बाजूला असणाऱ्या "सुरवंट" जो कोषातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्याकडे गेले. त्याचे रूपांतर आता फुलपाखरा मध्ये होणार होते, कोषातून बाहेर येण्यासाठी तो संपूर्ण शक्ती पणाला लावत होता परंतु त्याची शक्ती अपुरी पडत होती, मी विचार करत होतो कि त्याला मदत करावी परंतु तेवढ्यात सुरवंट रावाने एक बाजू तोडण्यात यश मिळवले होते. आता मात्र मी अजूनच तिकडे आकर्षिला गेलो. त्याचा मात्र संघर्ष सुरु होता,मला वाटले होते तो आता संघर्ष थांबवेन… पण लगेचच "कट कट कट" असा आवाज आला आणि सुरवंटाने (कोषातून) बाहेर पाउल टाकले आता सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात झाले होते…. फुलपाखराने भरारी घेत, एका फुलावर स्वतःला स्थिर केले, त्याला बघून मलाच माझ्या प्रश्नाचे उत्तर गवसले होते,

"जो पर्यंत संघर्ष चालू तो पर्यंत 'माणूस' एकदा का त्याने भरारी घेतली कि ते महान व्यक्तिमत्व"

आता ठरलं वाटेल तसं! कितीही त्रास झाला तरी! काहीहि सहन करावं लागले तरीही काहीतरी करून दाखवायचं! आणि वाचनात आलेल्या त्या ओळी आठवल्या

“हरणार ना कधी मी

थांबणार ना कधी

लागली जी आग आता

विझणार ना कधी ….

आयुष्याला आजमावण्यासाठी

स्वताला सिद्ध करण्यासाठी

सज्ज झालेला मी माघारी

फिरणार ना कधी ….”

आजची हि एक नवी पहाट होती, आज बरंच काही करायचंय हे ठरवून सुरुवात झालेली. नेहमीप्रमाणे जो मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतो अशा बाळूला कॉल केला, त्याच्या आवाजात एक वेगळीच जादू होती "हॅलो! मित्रा बोलना काय झालं?'मी त्याला काही बोलायांच्या आतच त्याने मला शालिमार हॉटेलला बोलावलं होतं….

शालिमार "मेरा प्यार….शालिमार " विमानतळासमोर असलेलं ते एक निवांत हॉटेल जिथे अनेक गोष्टी घडल्या, बिघडल्या निर्णय ठरले गेले! त्या चहाच्या झुरक्यासोबत रस्ता,गाडया,विमानाचा आवाज आणि सर्वात महत्वाचं आमच्या सगळ्यांच्या आठवणी अशा बऱ्याच गोष्टी मिळायच्या तिथल्या चहाच वर्णन काय करावं

“जिंदगी तो DO और DIE है

हमसफर तो बस ये चाय है …”

तेवढ्यात बाळू तिथे पोहचला, मी उठलो आणि आमची जादूची झप्पी झाली, त्याला बोललो “मी जरा उदास आहे मित्रा!” तो म्हणाला “मित्रा मला माहितीय म्हणूनच इथे आलोय, बोला प्रॉब्लेम काय तो? परत भांडण झाला ना मॅनेजर सोबत…संचितने "हो" म्हटलं आणि लगेच बाळूने एक कॉल केला आणि सांगितले उद्या माझा एक मित्र येईल त्याचं जॉब च बघून घ्या.

बाळू हा नेहमी BUSY असणारा पण मित्रांसाठी कायम धावून येणार तो business करायचा कितीतरी वेग वेगळ्या सर्विसेस तो प्रोव्हाइड करायचा पण या सर्वांतून मित्रासाठी तो कसा वेळ काढायचा काय माहित त्यातही कुणाचं काय चाललंय वगैरे सगळं त्याला माहिती असायच कुणाचा वाढदिवस कुणाची अनिव्हर्सरी कसलाही कार्यक्रम त्याच्याशिवाय व्हायचा नाही ....

त्याने सांगितलेल्या कम्पनीत भेटायला ३ वाजता बोलावलं होतं मला एक कॉल आला आणि रीत्या पत्त्यावर मी २:४५ लाच पोहचलो माझा INTERVIEW झाला. आज पर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच असा आनंदात बाहेर पडलो होतो कारण जे विचारल गेल ते खरंच माझ्याही आवडीचं होतं, मला मशिन्स वगैरे दाखवण्यात आल्या AUTOMOBILE COMPONENTS बनवण्याचे काम होते, तसं इंजिनीरिंग केलेली असल्याने माहितीतलच काम होतं पण तरीही जरा भीती वाटत होती. बाळू चा REFERENCE असल्याने जरा जबाबदारी वाढली होती मला नेहमी वाटायचं आपल्यामुळे कुणाचं नाव खराब व्हायला नको ...

मी इथे आल्यापासून माझे बरेच गैरसमज दूर झाले होते. आधी मला नेहमी वाटायचं "मालक लोक आपली पिळवणूक करून आपल्याच जीवावर खाऊन पुन्हा आपल्यावरच रुबाब झाडतात…" परंतु इथे वातावरण जरा वेगळंच मिळालं होतं सगळे एकदम फ्रेंडली होते. साहेब सुद्धा सगळ्यांची मनापासून चोकशी करायचे,एखादी गोष्ट कुणाला जमत नसेल तर वर्कर चा ड्रेस घालून ते काम कसं सोप्या पद्धतीने करता येईल ? हे ते दाखवून द्यायचे, प्रत्येकाची वयक्तिक चोकशी करून कुणाला काय गरज आहे हे ते बरोबर हेरायचे ? शॉप मध्ये काम करताना अचानक त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ते म्हणाले संचित जरा दोन मिनिट केबिन मध्ये ये मला वाटलं माझं काही चुकलंच जरा घाबरतच मी केबिन मध्ये गेलो..

"मग घरी कोण कोण असतं तुमच्या.. ?.....भाऊ वगैरे ...?" मीही असा प्रश्न ऐकून जरा शांत झालो माझ्या कानावरती येऊन थांबलेलं पातळ रक्त ते ऐकून जरा थंडावलं होतं सगळी उत्तरे दिल्यानंतर त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला बरं बाळू कसा मित्र तुमचा ?तेवढ्यात न राहवून मी बोललो सर तुम्ही मला अरे तुरे केलंत तरी चालेलं त्यांचा उत्तरच त्यांच्या स्वभावाची जाणीव करून गेलं "वय आणि मैत्री या बंधनाचे पल्याड काही नाती असतात ती माणसाला नशिबाने मिळतात आणि तुही मला तसाच भेटलाहेस कालच पहिल्यादा तुम्हाला बघून ... सॉरी सॉरी तुला बघून मी TRY करेन हं! छान वाटलं; मला अशाच व्यक्तीची गरज होती. थोडक्यात तुझ्यात मला माझं प्रतिबिंब दिसलं. आता तू झटपट सगळं शिकून घे. म्हणजे मी बिनधास्त नवीन ठिकाण डोकं लावायला मोकळा ....."

राम साहेब स्वभावाने एक्दम मावळ होते प्रत्येक गोष्ट १० पावले पुढे जाऊन विचार करायचे ते आताचाच नाही तर १० वर्षानंतर कुठे असावं याचाही प्लॅन असायचा त्यांच्याकडे इथे मला आवडेल तास काम करायला मिळत होते PRODUCTION सुद्धा हळू हळू वाढत होतं मी आल्यापासुन साहेब हि बाहेर मार्केटिंग ची काम बघत होते त्यातून नवीन BUSINESS मिळायला सुरुवात झाली .....

मागील वर्षभरात बरच काही घडून गेलं होतं माझ्याही कामत जरा PROFESSIONALISM आलं होतं साहेब नेहमी बोलायचे "

"मुश्किल भरे रास्तों पर,

जलते अंगार पर,

धधकती आग पर,

आँधीयोंसे लढकर,

चट्टानो पर चढकर,

'मिट्टी'तीलक लगाकर,

तूफान को हराकर,

शत्रु को ललकारकर,

खुद को तू साबित कर 

तू  चल बेफीकर...."

माझंही मन आता जॉब मध्ये रामतय, हे बघून घरचे हि आता खुश होते. आई बाबा आणि ताई देखील माझ्या होणाऱ्या कामाच कौतुक करायचे. काहीही झालं तरी घरच्यांनी दिलेलेसंस्कार विचार आणि प्रेम यातूनच मला विशेष जवळीक मिळाली होती, राम साहेबांची त्यांच्या कडून खूप काही शिकण्यासारखं होतं आणि मी रोज एकेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्नकरत होतो ... आज संध्याकाळी निवांत घराबाहेर ओसरी वर बसून मागच्या वर्षभरात झालेल्या गोष्टींचे सिंहावलोकन करत बसलो होतो आणि तेवढ्यात साहेबांचा कॉल आला…. साहेबांनी Nirala Bazar ला बोलावले होते. मी तिथे पोहचलो तेथील  Smile हॉटेल मध्ये आम्ही भेटलो. माझी घाबरलेली अवस्था बघून ते बोलले “अरे काही झालं नाही एवढा का घाबरतोस?”  मी सहज बोलावलं, आज मी तुझी भेट एका व्यक्तीशी करून देणार आहे तुलाही भेटायला आवडेल त्यांना. “चंद्रा ग्रुप” नाव ऎकलंस कधी?” “अहो सर त्यांना कोण नाही ओळखणार? MIDC ला मानाचं स्थान प्राप्त करून देणारा ग्रुप” त्याच ग्रुप चे मालक सुभाष चंद्रा आपल्याला भेटणार आहेत ते 11 कंपन्यांचे मालक आहेत तरीही अत्यंत साधे. त्यांना भेटून काय वाटते ते फक्त observe कर आणि  तेवढ्यात एक Mercedes Q3 hotel  समोर उभी राहिली,त्यातून जे व्यक्ती उतरले त्यांना बघून असं वाटलं हे तेव्यक्ती नसतीलच पण गाडीतून दुसरं कुणीही उतरलच नाही आणि माझी  खात्री पटली  की ही तीच व्यक्ती आहे.आम्ही बसलो त्याच Table  जवळ ते आले तसे साहेब व मी दोघेही उभा राहीलो आणि त्यांना Shake hand केले. त्यांनी Chair सरकवत बसा म्हणुन इशारा केला आम्ही सर्व Chair वरती बसलो होतो आणि विषयाला सुरुवात झाली. त्या व्यक्तीने बोलायला 

 सुरुवात केली - ' कसा चाललाय व्यवसाय'- साहेब - तुमच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थीत चाललंय.

ती व्यक्ती - आमचा कसला देवाचे आशीर्वाद म्हणा पांडुरंग पांडुरंग...!

साहेब   - ते तर आहेच पण प्रत्येकापर्यंत त्याला पोहचता येत नाही म्हणूनच तुमच्या सारख्यांच्या रूपाने ते आमच्या आयुष्यात येतात.

ती व्यक्ती - "काय राम शेठ बिल मीच देणार हे !"  बस कर आता अजून मस्करी सहन न्हाय होणार .  आणि तिघेही हसलो.

तोपर्यंत वेटरला बोलावून मी सर्वासाठी ऑर्डर दिली होती साहेबांना अवडणारं  South Indian  मागवल होतं ते समोर आल आणि दोघेही जाम तुटून पडले. मी त्यांच्याकडे अवाकहोवून पाहत होतो. माझ्या मनात काय चाललंय हे कदाचित साहेबांना कळालं असावं आणि म्हणुनच तर त्यांनी माझ्याकडे बघून म्हटलं अरे ! करना सुरुवात आम्हाला South Indian आल्यावर सहन होत नाही हे ऐकल्यावर ती व्यक्ती थबकलीच ते म्हणाले " आपण तर पहिल्यांदाच भेटतोय तर तुम्हाला कसं कळलं मला South आवडतं म्हणून? "प्रश्नार्थक नजरेनं त्यांनी साहेबांकडे बघीतले… साहेब हसले आणि बोलले काय “सुभाष साहेब” तुम्हीपण facebook वर तुम्ही खूपच update आहात. आतापर्यंत Smile हॉटेलच्या 10पोस्ट सापडल्या त्या अर्थी आवडतं हॉटेल असावं हा आमचा अंदाज आणि 10 पैकी 7 पोस्टमध्ये South भेटलं त्यावरून दुसरा अंदाज... आणखी काय?

    हे ऐकल्यावर ते तर Shock झाले आणि लगेच बोलले, "It will be glad to work with you"

    माझा निर्णय बरोबर होता म्हणायचा.

    साहेबांनी विचारलं कसला निर्णय? तसं ती व्यक्ती बोलली तुमच्या Proposal मधील ते Covering letter वाचलं तेव्हाच खरंतर प्रेमात पडलो त्या शब्दांच्या.  आजपर्यंत भरपूर letters आले  withमोठ्या मोठ्या Politicians चे Reference असलेले.

    पण सगळेच रुक्ष आणि तुमचं एकमेव  Proposal  असं होतं ज्यात आम्हाला हे Tender मिळावं असं कुठेही लिहिलेलं नव्हतं फक्त भेट व्हावी एवढीच माफक  अपेक्षा.

    हे वाचूनच ठरवलं की या व्यक्तीला भेटायचं म्हणून आणि आज इथे आल्यावर लक्षात आलं की आपला  निर्णय योग्य आहे.

    "अहो साहेब Please पाजतो मी तुम्हाला चहा!!....

 ओह sorry थोड विसरलोच बोलण्याच्या ओघात  ही माझी सवय आहे."

    "का काय झालं?" त्या व्यक्तीने विचारलं आणि हीच माझी ही सवय आहे मी पण कोणी स्तुती  केले की हेच बोलतो. असो ! Tender विषयी बोलूयात तुमच्या कामाबद्दल जरा माहिती दिली तर बरं होईल.

    साहेब मी आतापर्यंत केलेली कामे आमचे ' संचीत राव' सांगतील.

    मला तर धक्काच बसला अचानक Explain करायचं पण...कसबस स्वत:ला सावरत मी बोलायला सुरुवात केली. आतापर्यंत साहेबांकडून ऐकलेलं सर्व काही सांगत होतो, त्यांचीकामे सांगताना मी त्यांना माझी आणि त्यांची झालेली भेट, माणसांची त्यांना असणारी पारख, परिस्थितीची जाणीव आणि  सर्वात महत्वाचे  म्हणजे Ergonomics जाणणारा व्यक्ती म्हणून मी त्यांची ओळख करून दिली तस त्या व्यक्तीने विचारलं 'Ergonomics हे काय असतं? 'आणि मग काय आपल्या आवडीचा विषय  बोलायला मैदान भेटलं, 

   "कंपनीतल्या साध्या Worker पासून ते upper-level पर्यंत सर्वांपैकी कुणाला काय आवडतं याची माहिती घेऊन त्याला त्याच्या आवडीचं काम साहेब देतात ज्यामुळे efficiency खूप वाढते  आणि माझ्यासारखे  देखील जे नोकरीमध्ये स्वारस्य नसणारे सुद्धा साहेबांमुळे आज या ठिकाणी आहेत. फक्त आवडीचे काम दिल्यामुळे आणि हेच Ergonomics तीनही factory च्या माध्यमातून साधारण 120 लोक काम करतात आणि सर्वांची माहिती नावासहित साहेबांकडे आहे. ते म्हणतात जर Employee खूष असतील तरच आपण खुष राहूशकतो.

        " इतरांना दुखवुन कमावलेला पैसा

         आणि आनंदाने मिळालेली ती लक्ष्मी "

    सुखी फक्त लक्ष्मीपती, पैसेवाल्यांना तर झोप  पण नीट लागत नाही. तीनही factory मधील प्रोडूकशन Proper पोहोचते वा नाही?  यासाठी आमच्याकडे साहेब जातीनं लक्षघालतात. Daily meetings, Brain Storming घेतात,  जेव्हा साहेब बोलतात ते ऐकूनच प्रत्येकाला काही तरी करण्याची इच्छा होते आणि त्यातूनच प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने स्वतःचे काम करण्याचा  प्रयत्न करतो.  याच सर्व गोष्टींमुळे Company चा Turnover 50 Cr पर्यंत पोहोचला आहे.

    "अप्रतिम" मी अशाच व्यक्तीच्या शोधात होतो, पण तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही हे ! China मधील Company शी COLLABORATION आहे. They are very professional  आणि जेव्हा  1000 Cr लावले जातील तेव्हा एकट्याला हे  मॅनेजर करण्यासारखं नाही वाटत.

     मी शांत बसलो तेवढ्यात साहेबांनी बोलायला सुरुवात केली, "कुठलीही गोष्ट without planning  मला आवडत नाही माझ्यासोबत संचित एक वर्षापासून आहे आणि आमचा आणखी एक जण service sector मध्ये आहे. तो एक दहा मिनिटात येईल. Distribution साठी तो नावाजलेला आहे. आम्ही दोघेअशा project साठी विचार करत होतो तेवढ्यातबाळू ने मला संचीतचं नाव सुचवलं कारण आमच्यामध्ये skillful म्हणजेच production साठी कोणीच नव्हतं  म्हणून संचीत…. आता एक समीकरण."

       Marketing & order - मी स्वतः

      Production & quality - संचीत & Team

      Sales & service - बाळू & Team

 तेवढ्यात बाळू तिथे आला आणि साहेबांनी त्याची ओळख करून दिली. त्या व्यक्तीने तीघांनाही बघितले पाच मिनीट observe करत म्हणाले, तुमच्यासोबत काम करायला मजा येईल.

           "आसमाँ की बुलंदीयों को छूने

                एक कारवां निकला है,

            सारी बंदीशे तोड़कर मंजिल चुमने

                 एक परींदा निकला है...."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational