Jyoti gosavi

Drama Romance

2  

Jyoti gosavi

Drama Romance

निर्णय

निर्णय

9 mins
1.0K


अरे अभी आता तरी लवकर उठ आणि स्वतःचे आवर आणि ते बोकडासारखे खुंट  वाढलेत ना ते जरा काप दाढी वगैरे घोटून तयार हो ,त्या मुलीच्या वडिलांचा सकाळीच फोन आलाय ते लोक ठीक पाच वाजता पोहोचतील  

अभि म्हणजे डॉक्टर अभिराम कुलकर्णी एका प्रख्यात हॉस्पिटल मध्ये निष्णात डॉक्टर म्हणून प्रसिद्ध ,रंगाने काळा सावळा पण पाच फूट 10 इंच उंचीचा आणि बलदंड शरीराचा ब्रह्मचारी ,अजून कोणाच्या जाळ्यात सापडला नव्हता.

बाळ अभी दुपारी जेवून खाऊन लोळत पडे आणि प्रत्येक मुलगी बघण्याच्या वेळी माय लेकरामध्ये हा प्रेमसंवाद चालत असे .

खरे तर त्याच्यावर जीव टाकणाऱ्या त्याच्या बरोबरीच्या कितीतरी जणी होत्या. हॉस्पिटलमधल्या नर्सेस होत्या ,पण स्वारी

आपल्याच नादात असे आणि असाच एक पन्नासावी मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवला होता.

अगं आई एक तरी सुट्टीचा वार मला उपभोगायला देत जा. तुझं आपलं दर रविवारी एक मुलगी ,मला ना मित्रांकडे जाता येत ,ना कोणत्या कार्यक्रमात जात येत .आज गडकरीला सुंदर काव्यसंध्या चा कार्यक्रम आहे ,तो आता बुडणार .

अरे आता एकट्याने किती दिवस कार्यक्रमाला जायचं आता जोडीने फिरायचे दिवस आले.

अशा संवादात कसातरी साडेचारला अभिराम उठला मग मात्र अजिबात वेळ न दवडता त्याने फटाफट दाढी अंघोळ उरकली काळ्या रंगाची जीन्स व लेमन कलरचा शर्ट आवडला चढवला व आवडता सेंट मारून पंधरा मिनिटात तयार

हे बघ मी पावणेपाचला तयार झालोय आता साडेपाच वाजले तरी त्या लोकांचा पत्ता नाही ,कुठे आहे तुझी मुलगी?

अरे मुलगी नाही सुन म्हण सून ,असं वाक्य विद्याताई म्हणायला आणि घरातला फोन वाजायला एकच गाठ

हॅलो ट्रॅफिकमधे अडकलो आहे थोडा उशीर होईल इती मुलीचे वडील

ठीक आहे होतो असा कधी कधी प्रॉब्लेम तुम्ही सावकाशीने या विद्या ताईंनी फोन ठेवला

अगं पण रविवारी ट्रॅफिक असते हे माहित नाही का त्या लोकांना आपल्याच शहरात राहतात ना, लवकर निघायला काय झाले अभी तंणतणला.

शेवटी एकदाचे सात वाजेपर्यंत मंडळी पोहोचली .बेल वाजल्या बरोबर अभिच्या बाबांनी दार उघडले .ते शाळेत हेडमास्तरांच्या पदावर ती होते. प्रामाणिक व सचोटीचे शिक्षक म्हणून त्यांना दोन वेळा आदर्श शिक्षकांचा राज्य पुरस्कार मिळालेला ,शांत व हसमुख व्यक्तिमत्व.

आई वडील मुलगी व मुलगा असे चौघे जण आले होते आजकालच्या प्रथेप्रमाणे न्यूक्लिअर फॅमिली असल्याने बाहेरचे कोणी बोलविण्याचा प्रश्नच नव्हता वडीलांच्या मागे ती उभी गोरीपान शेलाटी टप्पोऱ्या डोळ्यांची नी अपऱ्या नाकाची अभिने एक नजर टाकली आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला हीच ,हीच माझ्या मनीची प्रियतमा अगदी तशीच आहे मला पाहिजे तशी.

अशीच होती मनात माझ्या माझी सजनि ग !त्याने मनातल्या मनात ही ओळ गुणगुणली किंवा पाहताच ती बाला कलिजा खलास झाला अशी त्याची अवस्था झाली नंतर पाहण्याच्या कार्यक्रमात आपण काय बोललो काय वागलो याबद्दल त्याला काहीच आठवत नव्हते पंख लावून हवेत तरंगत होता

नंतर किती वेळ त्याचा मोबाईल सापडेना सगळे कॉल करून करून दमले फोन कव्हर क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता त्याला तर एकदम सैरभैर झाल्यासारखं झालं होतं आणि काही कारणाने आईने फ्रीज उघडला तर चक्क फ्रीजच्या दरवाज्यात त्याचा मोबाईल मग सगळेजण त्याला हसू लागले डॉक्टर गौरी वरून चिडवू लागले अरे आत्ताच तुझी अवस्था अशी लग्न झाल्यावर काय होणार

मग काय म्हणतो अभी कशी वाटली मुलगी ?आईने विचारले

अगं कशी काय चांगली होती!

नुसतेच चांगली अजून काही विशेषण नाही .अरे मला तर मुळीच आवडली नाही शिष्ठ वाटली आईने गुगली टाकली आणि त्यात अभिचा कँच बरोबर पकडला

तसं काही नाही आई अगं काही काही माणसं नसतात फरशी बोलकी म्हणून काय थोडीच तुम्ही त्यांना शिष्ट ठरवाल.

अरे तू तर आतापासूनच तिची बाजू घ्यायला लागला अजून होकार यायचय म्हटलं

काय म्हणालीस तिचं नाव त्यांन आईला विचारलं

मी तर अजून काहीच म्हणाली नाही पण तो विचारले म्हणून आता सांगते तिचं नाव आहे डॉक्टर गौरी जोशी पुण्याला शिकते मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला आहे आईने माहिती दिली त्यानंतर आठ दिवसानंतर मुलीच्या वडिलांचा होकाराचा फोन आला आणि वडीलधाऱ्यांनी एकत्र येऊन साखरपुड्याची तारीख ठरवली.

अभी देखील स्वतःच्या नशिबावर जाम खुश होता कारण त्याला मनापासून आवडलेली मुलगी त्याची पत्नी बनणार होती . सर्व नातेवाईक मंडळी व मित्रमंडळी आमंत्रित करून मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला त्यानंतर दोघांच्या भेटी होत राहिल्या पण मुलगी एकदमच सोवळी चार फुटाचे अंतर ठेवून वागायची आणि एक दिवस तिचा अचानक फोन आला.

हॅलो मी डॉक्टर गौरी बोलते आहे.

बोल ,बोल, अगं तू बोलावं म्हणून मी जिवाचे कान करून बसलेलो असतो पण तू तर काय बोलतच नाहीस.

तसं नाही मला जरा वेगळंच बोलायचे आहे.

बोल बाई बोल काहीही बोल अगदी शिव्या दिल्यास तरी ओव्या म्हणून समजून आवडीने खाईन

मला हे लग्न करायचं नाहीये

क ,क काय म्हणालीस अभी तीन फुट उडाला कानाजवळ कोणीतरी फटाका उडवल्यावर माणूस जसा सुन्न होतो ना तसं काहीसं झालं काय बोलावं काय करावं हेच त्याला कळेना.

अगं पण प्रॉब्लेम काय झाला तू अशी अचानक पणे कसा काय निर्णय फिरवू शकतेस मी विचारतो ?साखरपुड्या पूर्वीच तु हा विचार करायला पाहिजे होता .तिने पलिकडून फोन कट केला

दोन्ही घरातील वातावरण एकदम तंग झाले काय करावं ते कुणालाच कळेना पत्रिका छापायला टाकलेल्या हॉल केटरर सर्व बुक झालेले आणि या मुलीच्या डोक्यात काय खूळ शिरलं तेच कळेना

एक दिवस दोन्ही मित्रांना घेऊन अभि अचानक तिच्या क्लिनिक वर गेला त्याला बघून ती प्रथम सटपटली. नंतर त्यांचा हसून स्वागत केलं चहा मागवला इकडच्या-तिकडच्या विषयांवर त्यांची नजर चुकवत गप्पा मारल्या पण मूळ विषयाच नाव घेईना

डॉक्टर गौरी मी तुमच्याशी दहा मिनिटात बोलू शकतो का? तेवढा वेळ आहे का ?शेवटी अभिने डायरेक्ट विषयाला हात घातला .दोन्ही मित्र बाहेर येऊन उभे राहिले क्लिनिकचा दरवाजा बंद करून वाटाघाटी सुरू झाल्या.

अचानक लग्न मोडण्याचं काय कारण त्याने विचारलं.

माझी मर्जी ती उत्तरली!

अशी मर्जी चालत नसते आपण ज्या समाजात राहतो ना त्याचे काही नीतिनियम असतात ते सर्वांनी पाळावयाचे असतात.

तुला मी आवडलो नाही का?

न आवडण्या इतके तुम्ही काही वाईट नाहीत

म्हणजे खूप चांगला पण नाही असं तुला म्हणायचे का

तुम्ही मला वकिली शब्दात पकडू नका तुम्ही मला फारसे पसंत नव्हता पण नापसंतही नव्हतात होय नाही च्या सीमारेषेवर मी होती आणि घरच्यांनी जरा जास्त फोर्स केला आणि मी हो म्हटले

पण मग माशी कुठे शिंकली

तुम्हाला पाहिल्याबरोबर मनात जश्या घंटा किणकिणायला 

हव्यात असं काही मला वाटलं नाही.

अगं तुला घंटाच  किणकिणायला हव्यात तर गोव्याहून चांगल्या चर्चच्या घंटा मागवतो पाहिजे तेवढ्या दोघे मिळून बडवूयात.

उगाच फालतू बडबड करू नका मला हे लग्न करायचं नाही

तुझ्या मनात दुसरा कोणी मुलगा आहे का ?तिने मान डोलावली

कोण तो, काय नाव त्याचं?

शशांक दीक्षित

मग आधीच घरात का नाही सांगितलं एवढी डॉक्टर मुलगी तू पण तुझ्या तेवढी पण निर्णय क्षमता नाही

त्याला मी आवडते का नाही मला माहीत नाही पण मला मात्र तो आवडतो उंच गोरापान हिरो टाईप वगैरे वगैरे

म्हणजे मी तुझ्या स्वप्नीचा राजकुमार नाही?

मला अगदी गुलबकावलीचे फूल आणणारा राजकुमार हवा असं नाही पण शशांक शी तुलना केली तर तुम्ही डावे वाटता

पण कोणाची कोणाशी तुलना कशाला करायची तो त्याच्या जागी मी माझ्या जागी त्याच्यातले गुण माझ्यात नसेल तसे माझ्यातले गुण त्याच्यात नसतील माझ्यावर कॉलेजपासून आजच्या घडीला कित्येक तरी मुली मरतात तू मला काय समजलीस त्याने आवाज चढवला

हे पहा माझ्या क्लिनिकमध्ये येऊन माझ्यावर आवाज चढवू नका एखाद्या लहान मुलाच्या हातून एखादा खेळणं निसटल तर तो जसा दंगा करतो ना ,तसं तुम्ही करताय.

खरा विचार केला तर पोरकटपणा तूच करतेस पण ठीक आहे हा तुझा पक्का निर्णय झाला का?

तिने हो म्हणून मान डोलावली आणि अभि रागारागाने तेथून बाहेर पडला अभिला काय करू आणि काय नको सुचत नव्हतं मन सैरभैर झालेलं कामात लक्ष लागेना, खाण्या-पिण्यात लक्ष लागेना.

अभी अरे असं कसं करून चालेल जगात तिच एक अप्सरा आहे का? तिच्यापेक्षा एक से बढकर एक देखण्या मुली तुला सांगून येतील आईने परोपरी विनवले परोपरी समजावले पण हे काही त्याच्या डोक्यातून जाईना.

इकडे गौरीच्या घरच्यांची अवस्था काही वेगळी नव्हती मुलीची जात ,साखरपुडा झाल्यावर लग्न मोडते म्हणजे काय? डॉक्टर असली म्हणुन काय झालं तिला दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला घरातील कोणालाच अन्नपाणी गोड लागेना ,आणि कोणताच ठोस निर्णय त्यातून बाहेर पडेना आणि एक दिवस अचानक या घटनेला कलाटणी मिळाली तर साक्षात गौरी जोशी फोनवर , मला तुमच्याशी काही बोलायचे

मला वेळ नाहीये म्हणत त्याने फोन कट केला

त्याच्याकडे पुन्हा दुपारी फोन आला मला तुमच्याशी बोलायचं नाहीतर मी, मी तुमच्या क्लिनिक वर येऊ का ? मला तुमच्याशी बोलायचं आहे

पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये म्हणत त्याने फोन कट केला आताशी कुठे स्थिर झालेला मनाचा मांड डहुळला भेटाव की नको काय करावं याचा त्याला प्रश्न पडला या मुलीचा पुन्हा काय भरवसा घ्या मी काय तिला खेळणे वाटलो? मनात आलं की जवळ घेतलं मनात आलं की भिरकावून दिले. त्याच्या मनात गौरी जोशी चे विचार पिंगा घालू लागले .कसेबसे पेशंटआटोपून तो निघाला तर क्लीनिक बंद करायच्या वेळेस गौरी जोशी हजर, नाईलाजाने त्याने तिला आत मध्ये घेतले .

बस !त्याने खूर्ची ऑफर केली

हा बोल आता!

त्याने सुरुवात केली "मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे" गौरी बोलली

, पण आता मी नाही लग्न करायला तयार

का ,?

माझी मर्जी!

माझेच डायलॉग मला ऐकवू नका मला माहित आहे की मी आजही तुम्हाला आवडते

म्हणून तू माझा गैरफायदा घेतला मी काय एखादं खेळणं वाटलो का आणि तुझ्या त्या शशांक दीक्षितचा काय झालं? त्यानं नाही म्हटलं म्हणून माझ्याकडे आलीस मी काय तुला स्टेपनी वाटलो?

आता माझे कोणतेही निर्णय मी घेऊ शकत नाही जो निर्णय माझे आई-बाबा घेतील तोच निर्णय, तू पुन्हा मला भेटायला येऊ नको.

त्याने तिला धुडकावून लावली .तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याला मनातून वाईट वाटत होतं ,पण आता त्याने स्वतःचे मन कठोर करायचं ठरवलं होतं मनाच्या सैरभैर अवस्थेत एक आठवडा गेला घरात तो काहीच बोलला नव्हता आणि एक दिवस दुपारी क्लिनिक बंद करून घरी आला पाहतो तर त्याची आई आणि गौरी जोशी मस्त एकमेकींशी गप्पा मारत हसत खेळत जेवणाचं टेबल लावत होत्यातिला घरात पाहुन त्याला आश्चर्य वाटलं आणि माझ्याकडे जमलं नाही तर डायरेक्ट आईकडे वशिला लावला ते काही नाही मी आईचे देखील ऐकणार नाही. त्याने मनोमन ठरवलं. तणावातच जेवण पार पडलं तिच्याकडे जरा देखील न बघता अभी बाहेर निघाला ."अरे अभी थांब ना जरा काय घाई आहे बघितलं का कोण आलय ते, गौरी आली आहे ओळखलस का ?आईने विचारलं

हो आई मी तिला चांगलं ओळखतो आणि मला तिच्याशी काही एक देणे घेणे नाही तू आहेस आपली भोळी लगेच समोरच्या त्या सगळ्या गोष्टी खर्‍या मान्य करायला पण मी नाही

अभी थांब माझा ऐकून घे आणि त्यानंतर तुला योग्य वाटेल तो निर्णय घे तू मी तुझ्यावर काही जबरदस्ती करीत नाही. चेहऱ्यावर रागाचा आव आणत तो तिथेच बसला खरे तर त्यालाही काय घडले हे जाणून घ्यायची उत्सुकता होती

हिने तुला लग्नाला नकार दिला तेव्हा आम्हालाही राग आला होता मीच तर तुला सांगितले होते की तिच्या सारख्या 56 मुली मिळतील म्हणून पण त्या 56 मध्ये ही असणार नाही ही मनाने सरळ आहे स्वतःची प्रामाणिक आहे आता थोडीशी बालिश आहे खरी पण तिच्यातील खरेपणा मला भावला म्हणून मी तिचा पुन्हा विचार केला एका क्षणी हिला वाटलं की जो आपल्याला आवडतो त्याला विचारायला काय हरकत आहे उद्या लग्न झाल्यावर त्याच्याशी माझं लग्न झालं असतं तर असा विचार करीत बसण्यापेक्षा तिने जाऊन शशांकला विचारले तेही मूर्खासारखे रात्री बारा वाजता त्याच्या रूमवर गेली तर तिथे आधीच एक मुलगी बसलेली तिच्याशी त्याचे प्रेमाचे चाळे चाललेले बरे तर हिने आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि परत फिरली त्यातून पण त्याने सांगितले की , मी तुझ्याकडे अशा नजरेने कधीच बघितले नाही .फक्त एकच मूर्खपणा झाला की ती तुला न सांगता साऱ्या गोष्टी गुपचूप करू शकत होती व त्याने नाकारले तर सज्जनपणाचा आव आणून पुन्हा तुझ्याकडे येऊ शकत होती पण ती सरळ मार्गी व प्रामाणिक असल्याने तुला तिने साऱ्या गोष्टी सांगितल्या. मी दोन माणसे कॉलेजवर पाठवून तिच्या कॉलेजवर चौकशी केली असता तिच कुठेही अफेअर वगैरे काही नाही एकदम सरळ नाकासमोर चालणारी ,पण स्वभावाने मात्र विक्षिप्त नाकावर माशी देखील बसून घेत नाही अशी ही ख्याती, बाकीचे कुठे काही नाही आता हिने मला सर्वकाही सांगितले मला ते पटले म्हणून मी तुला आता सारे काही ऐकवले काय निर्णय घ्यायचा तो तुझा तू ठरव दोघांनाही एकटा सोडून आई किचनमध्ये गेली काही क्षण शांततेत गेले दोघेही स्तब्ध बसले 

शेवटी आपणच गोंधळ घातला आहे तेव्हा तो आपणच निस्तरला पाहिजे एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूया असा विचार करून गौरीने पुढाकार घेतला

काय हो तुमचा काय निर्णय झालाय काय असेल ते आत्ताच सांगा मला काही वाईट वाटणार नाही चूक माझीच आहे तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य आहे.

अभिने वर बघितले तिच्या नजरेला नजर देऊन अभि म्हणाला तुला निर्णय पाहिजे काय जरा बाहेर भेट मग तुला निर्णय देतो आणि त्याने तिला कचकन डोळा मारला त्याबरोबर ती लाजून किचनमध्ये पळाली व आपल्या भावी सासूच्या गळ्यात पडली .एवढा वेळ बेडरूममध्ये बसलेले तिचे आई-वडील त्याचे बाबा सारे हसत हॉलमध्ये जमा झाले

अभी राव आम्हाला तुमचा निर्णय एकदम आवडला आता तिला जो काही निर्णय द्यायचा आहे तो बाहेर गेल्यावर द्या मात्र आपण आता सर्वांचे तोंड गोड करुया . आपण सर्वांनी इतके दिवस खूप तणावात काढले आता जरा मोकळे होऊ यात आईने आतून साखरेचा डब्बा आणला व डबा उघडून साखर तोंडात घालणारतोच त्याचा मित्र पेढे घेऊन आला.

अहो साखर कसले खाता पेढे घ्या पेढे वहिनी बाई बाहेर या आणि अभिला पेढा भरवा आता परत काही होण्याआधी उद्याच्या उद्या यांचे लग्न लावून द्या गौरीने बाहेर येऊन अभिला पेढा भरला आणि सारे घर आनंदात बुडून गेले असा हा निर्णय सर्वांनाच आवडला


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama