मुळीच नाही सांगायचे
मुळीच नाही सांगायचे


जीवनाच्या वाटेवर कधीकधी कळत-नकळत परिस्थितीला सामोरं जावं लागतं. असाच प्रकार घड़ला अगदी संगीताबरोबरपण.
संगीता कुटुंबातील सर्वांत मोठी म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून कॉलेजमध्ये प्रोफेसर होती. स्वतः लग्न नाही केलं पण लहान बहिण मृदुलाचे लग्न थाटात केले.
मृदुलाला पहिल्यांदा मुलगा झाल्यावर, त्याला हार्टचा काही त्रास होता, तर रुग्णालयात उपचार सुरू होते. ह्या दरम्यान जुळ्या मुली झाल्या तिला, मग प्रश्र्न पड़ला की ह्यांचे संगोपन माझ्याकडून कसे व्हायचे, तेवढ्यात संगीताने ओढ़ा घेतला हो, आणि म्हणाली एकीला तू संभाळ, एकीची संगोपनाची जबाबदारी आईच्या रूपात संपूर्णपणे मी घेते आणि "तुझं सिक्रेट माझ्याकडे अगदी सुरक्षित राहील हं".
मृदुला म्हणाली मी तिची आई म्हणून मुळीच नाही सांगायचे.