Ajay Nannar

Horror Thriller Others

4.3  

Ajay Nannar

Horror Thriller Others

मृत्यूचा खेळ

मृत्यूचा खेळ

3 mins
308


मी , राजु आणि सुरज आम्ही तिघेही चांगले मित्र आहोत. आम्ही तिघांनी सकाळी रात्री बाहेर जाण्याचा प्लॅन केला. राजुला कधी एकदा आपण निघणार असे झाले होते. आम्हाला रात्री बाहेर फिरण्याची सवय होती आणि तेवढीच मज्जा ही येत असे. आम्ही ठरल्याप्रमाणे कार ने निघालो. रात्र खूप झाली होती. कदाचित 11 वाजले असावे. मी ड्रायव्हिंग करत होतो. पण त्या रात्री काय घडणार याची कोनालाच कल्पना नव्हती.


    आम्ही आता गाव ओलांडून पुढे आलो होतो. रात्रीचे 12 कधीच वाजुन गेले होते. आता रस्त्यावर फक्त आम्ही आणि आकाशातील चांदण्या आणि रातकिड्यांची किरकिर व आमच्या गाडीचा फोकस मध्ये असलेला लाईट. आजुबाजुला होता तो फक्त काळाकुट्ट अंधार. बाजुने ना कोणती भरधाव वाहने होती. थंडीचे दिवस असल्यामुळे वातावरणात गारवा चांगलाच जाणवत होता.


      आता आम्ही मुख्य रस्त्याला लागलो होतो. आमच्या गप्पा चालल्या होत्या. गप्पा मारता मारता वेळ कधी निघून गेला कळलेच नाही. आता आम्हाला पुढे घाट रस्ता लागणार होता. घाटाला खूप वळणे होती. आम्ही घाट रस्त्याला लागताच राजु मला म्हणाला आपण या घाटात जायला नको कारण या घाटात रात्री खुप अपघाती मृत्यू होतात आणि येथे रात्री अपरात्री भुत प्रेत आत्मा यांचा वावर असतो. मी राजुला म्हणालो राजू आजच्या जगात ही तुझा भुताखेतांवर विश्वास आहे. असे काहीही नसते हे सगळे आपल्या मनाचे भास असतात. मग राजु काही बोललाच नाही आणि शांत बसला.


     आता आम्ही घाटात जाणार एवढ्यात गाडी बंद पडली. कदाचित डिझेल संपले होते. आम्ही थोड्या दूर असलेल्या एका पेट्रोल पंपावर गाडी लोटत गेलो आणि गाडीत डिझेल टाकले . तेवढ्यात पंपावरचा तो माणूस आम्हाला म्हणाला पोरांनो एवढ्या रात्रीचे तुम्ही या घाटात काय करत आहात.तुमचे येथे जाणे बरे नाही. येथे मृत्यूचा खेळ चालतो रात्री. आजपर्यंत ज्या कोणी या घाटात रात्रीच्या वेळी प्रवास केला आहे तो कधीच परत आलेला नाही. तुम्ही येथे नवीन दिसताय म्हणून सांगतो जाऊ नका.


आम्ही हो म्हणून निघालो पुढे. जवळपास निम्मा घाट ओलांडला होता तोच अचानक एक विचित्र आवाज ऐकू आला " मागे फिरा आल्या रस्त्याने परत जा नाहीतर कोणीच वाचणार नाही ".


     हे वाक्य ऐकताच राजु आणि सुरज पुरते घाबरूनच गेले त्यांच्या अंगावर भितीने सर्रकन काटा उभा राहिला. अचानक एक सावली भर्रकन गाडीच्या काचेच्या समोरून गेल्यासारखे वाटले. थोडे पुढे गेल्यावर समोरून एक भरधाव वेगाने एक ट्रक आमच्याकडे येताना दिसला. त्या ट्रक ला पाहून आमचा जीव जातोय की काय असे झाले कारण त्या ट्रकला चालवणारा चालकच नव्हता. आम्हाला हा काय प्रकार आहे काहीच कळेना. असे वाटत होते की हा प्रकार पंपावर असलेल्या माणसाने सांगितल्या सारखा

 "मृत्यूचा खेळ " आहे . आम्ही या खेळात पुरते अडकून पडलो होतो. आम्हाला बाहेर पडणे आता खूप अवघड होते. 


   शेवटी मी गाडीतल्या FM वर श्री हनुमान चालिसा लावली. व आता सगळे देवावर सोडून दिले.


     मी अचानक गाडीच्या मिरर मध्ये पाहिले तर तोच ट्रक पुन्हा आमच्या गाडी समोरून आला आणि आम्हाला धडकून गेला....

आम्ही बेशुद्ध पडलो....आणि सकाळी जाग आली तेव्हा आम्ही गावात दवाखान्यात ICU मध्ये होतो. 


    आम्ही घडलेला सगळा प्रकार घरी सांगितला. आणि माझे लक्ष घरातील फोटो फ्रेम कडे गेले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या फोटोत दुसरे तिसरे कोणी नसुन तोच मानुस होता जो आम्हाला पेट्रोल पंपावर भेटला होता. आणि तो मानुस 10 वर्षापुर्वीच मेला होता. देवाच्या आशिर्वादाने आम्ही वाचलो. म्हणतात ना " देव तारी त्याला कोण मारी " 


    मग आईने सांगितले 10 वर्षापूर्वी तुझे मामा तिथे पंपावर कामाला होते. त्याच घाटात ते एके रात्री ट्रक घेऊन जाताना त्यांना समोरून दुसऱ्या ट्रकची धडक बसली आणि त्यातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांनीच आपल्याला या प्रकारातून बाहेर काढले. 


   या घटनेमुळे मला भूत खरंच या जगात आहे की नाही माहित नाही पण देव मात्र सर्वत्र आहे. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये , आम्ही ज्या घाटात रात्री अडकलो होतो त्याच घाटात चार जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आम्ही कधीच त्या घाटात फिरायला गेलो नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror