Prabhakar Pawar

Crime Others

4  

Prabhakar Pawar

Crime Others

मृगजळ

मृगजळ

6 mins
372


"कशी काय आजची तरूण पिढी भरकटते ह्या आभाशी दुनियेत. .मला वाटते केवळ हे दुबल्या मनाचे लक्षण आहे. ."


स्नेहा चॅटींगमध्ये व्यस्त होती आणि संयोगीता तिला लेक्चर सुनवित होती. .स्नेहाने चॅटिंग करताकरता ऐकले आणि वर पाहून संयोगीताला म्हणाली. .


"कसं आहे ना बाळा ?. . जेव्हढं आपल्याला माहीत असेल अनुभव असेल तरच दुसर्‍याला लेक्चर द्यावे. .नाहीतर मुग गिळून गप्प बसावे. .तू मैत्रिण आहेस माझी. माझा बाप बनू नकोस. ."


"खरं बोलले की सख्ख्या आईला राग येतो. मग तू तरी कशी अपवाद असशील बाई. ."


संयोगीता काहीशी त्रासिकपणे बोलली. स्नेहाला सांगण्यात फायदा नाही. हे तिच्या लक्षात आले होते. ती सरळ साध्या स्वभावाची होती. अनेक अनुभव ऐकून सोशल मिडीया पासून काहीशी दूर राहणे पसंद करत होती. .तिला रागवलेली बघून स्नेहा आॅफलाईन झाली. मोबाईल खाली ठेऊन तिच्या जवळ गेली. .तिचा नाकाचा शेंडा पकडून हलवला आणि समजूत काढण्याच्या सुरात तिला म्हणाली. .


"संयु बाळा रागावलीस का माझ्यावर. रागवलीस की खूप गोड दिसतेस. आई शपथ मी मुलगा असते ना ?. तर तुलाच पहिला प्रपोज केला असता. ."


"बस झाली हा मस्का पाॅलिशी. .मला तुझे हे तासन्तास मोबाईलचे वेड आवडत नाही हं ?. .अरे वस्तू साठी माणूस नाही. .तर माणसासाठी वस्तू आहे. .किती वापर करावा याला पण मर्यादा असतात की. तेव्हढीच अतिमहत्त्वाची कामे असतील. तर माझी हरकत नाही. पण येऊन जाऊन काय सारखा मोबाईल. आज किती दिवसात भेटतोय आपण. आणि गप्पा करायच्या सोडून तू मोबाइल हातात घेतलास. मग राग येणार नाहीतर काय गं. ."


संयोगीताला बोलत असता ही कमरेवर हात ठेऊन तिला पाहत होती. ती बोलायची थांबल्यावर स्नेहाने बोलायची सुरवात केली. .


"अगं महत्वाचे कामच करीत होते. आणि सारखा सारखा तुम्ही लोकं त्या मोबाइलला का बाई दोष देता. मला काही समजत नाही. उलट किती मदत करतो तो माणसाची. .बघ घरात कोणी नसला गप्पा करायला तर तो असतोच. कुठली माहीती हवी असल्यास तो आहेच. गेम खेळायला तो हवाच. मुव्हीज बघायला तो हवाच. तो तसूभरही मित्र मैत्रिणी पेक्षा मला तरी कमी वाटत नाही. .बिच्यार्‍याला कितीतरी दोष देतात माणसं. पण तो गपगुमान सारे ऐकतो. कधी कुणाचा राग करत नाही. ."


संयोगीताला आता स्नेहाची किव यायला लागली. ही मुलगी मोबाईलच्या खूपच आहारी गेली आहे. पण आता हीला निष्कारण प्रतिउत्तर देऊन नाराज करायला संयोगीताला जिवावर आले होते. .


"बरं झाले बाई तुला मित्र मिळाला. आता आमची गरज नाही. .पण कोणते अतिमहत्त्वाचे काम करीत होतीस. ते तर सांग म्हणजे मला निघायला. ."


स्नेहा म्हणाली. .


"शहाणीच आहेस. एव्हढ्या लांब आलीस भेटायला आणि निघायचे म्हणतेस. .कुणी बाॅयफ्रेंड आहे का जोडीला. .अगं तस काही असेल तर लाजायचे कशाला ?. ."


"असं काही नाही हं. .पण तुला मोबाइल सुटत नव्हता. मग मी काय सांगू बंर. पण काय काम करीत होतीस. ते काही बोलली नाहीस. ."


स्नेहा म्हणाली. .


"ह्याच मोबाइल मित्राने मला एक मानवी मित्र शोधून दिलाय. आता समजलं का ?. चॅटिंग आणि आॅनलाईन मध्ये काय मजा असते ती. ."


"काय ?. म्हणजे मोबाइलवर सूत जमवलस काय तू . ."


संयोगीताच्या बोलण्याने ती खूप गोड लाजली. .एक दिवस फ्रेंड रिक्वेस्ट तपासतांना त्याची प्रोफाईल हीला भावली. मग फेसबुक मेसेंजरवर चॅटिंगला सुरवात झाली. मग नकळत दोघे वाहून गेले. आैपचारीक गप्पा कधी वैयक्तिक झाल्या हीला समजलं नाही. तिने तर एक समीकरण बनवले. आॅनलाईन प्रेमात सतत एकमेकाच्या सानिध्यात राहता येते. तो कॅनडाला ही भारतात. इकडे रात्र तर तिकडे दिवस. पण ही रात्री त्याच्यासाठी जागी असायची. दोघे प्रत्यक्ष केव्हा भेटलेच नव्हते. संयोगीताला त्यांच्या या प्रेमा विषयी एक वेगळेपणा वाटला. म्हणून ती जास्तीतजास्त माहीत करून घेत होती. .


"तुम्ही दोघे कधी भेटला नाहीत तरी तुमच्यात प्रेम. हे काही माझ्या पचनी पडत नाही. प्रेमाची सुरवात तर 'आखोके रस्ते दिलमे उतरके' अशी काहीशी असते. पण येथे हे काय बाई नवीनच प्रकार आहे. तुमचं बोलण तरी झाले आहे का?. ."


"नाही अजून आणि मला तशी गरजही पडली नाही. त्याचे शब्द मला भावले माझे त्याला! हेच आणि असेच सात्त्विक प्रेम हवे होते मला. दोघांनी एकमेकाला समोरा समोर पाहीले की प्रेम संपले. आणि मला संपवायचे नाही. ."


स्नेहा पुर्ण आत्मविश्वासात बोलत होती. संयोगीताला तिच्या बोलण्यात अोव्हर काॅन्फीडन्स वाटत होता. .


"स्नेहा अगं ज्यावेळेस व्यक्तीशी समोरा समोर संवाद साधला जातो. त्यावेळी त्याच्या बाॅडी लँग्वेजवरून सत्य असत्याचा उलगडा होत असतो. .तू समोर न भेटता हे काय करून बसलीस. ."


संयोगीताच्या बोलण्यात काहीशी स्नेहा बद्दल चिंता होती. पण स्नेहा त्याची आणि तिची बाजू निर्धोकपणे मांडत होती.


"अगं खूप श्रीमंत आहे तो. हे बघ किती महागड्या गिफ्ट दिल्यात त्याने. .जर त्याच्या मनात काही खोट असती. तर त्याने हे सगळे कशासाठी केले असते. ."


संयोगीताला मान्य केल्या शिवाय पर्याय नव्हता. मनात वाटत होते तिला, हीच्या विश्वासाला तडा जाऊ नये. .


स्नेहा उच्चशिक्षित एका मल्टिनॅशनल कंपनीत जाॅबला. घरची अर्थिकस्थिती पण चांगली. चांगल्या पगाराची नोकरी. अचानक अनोळखी मुलाच्या आॅनलाईन प्रेमात पडलेली. हीला पण भारतीय वेळेनुसार रात्रपाळी करायला लागायची. मग दोघांना हवा तेव्हढा वेळ मिळायचा. तो तिच्यावर तेव्हढच प्रेम करत होता. त्याचा स्वभाव तिला भावला होता. संयोगीता सहज म्हणाली एखादा म्हातारा असला तर काय करशील. त्यावेळेस तिनं संयोगीताला सिरिअसली घ्यायला हवे होते. पण तिने हसून घालवले. .


आज त्याचा मेसेज इनबॉक्स मध्ये येऊन स्थिरावला होता. आज तिला विकली आॅफ होती. हीने डोळे चोळतच मोबाइल हातात घेतला. त्याचा मेसेज पाहीला आणि ही एकदम फ्रेश झाली. .


त्याने एक करोडपेक्षा जास्त किंमतीचा हिर्‍यांचा नेकलेस पाठवला होता. एव्हढी किंमती भेटवस्तू तिला आयुष्यात प्रथमच मिळत होती. तिने संयोगीताला पहिला फोन केला. .


"हॅलो संयु अगं ऐकतेस का ?. खूप आनंदाची गोष्ट तुला सांगायची आहे. तुलाच पहिला फोन केला आहे मी. ."


"हो ऐकते आहे बोल. काय गं काय आनंदाची गोष्ट सांगते आहेस. तुझा कॅनडावाला तुला भेटायला आला की काय ?. ."


संयोगीता मज्जाक करण्याच्या मुडमधे होती. .स्नेहाला फ्कत तिला गुड न्युज सांगायची होती. .


"अगं त्याच्यापेक्षा मोठं आहे हे. त्याने मला वन सी.आर. पेक्षा जास्त महागडा नेकलेस पाठवला आहे. ."


संयोगीताला आनंद झाला. ति तेव्हढ्याच लगबगीनं म्हणाली. 


"अय्या मी येते बघायला. थांब मी आल्या शिवाय पॅकिंग फोडू नको. ."


"गप गं शहाणे अजून मला मिळाला नाही. त्याने पाठवला आहे. त्याचा मेसेज केला त्याने. पण तू आल्यावरच मी फोडीन. ."


स्नेहाला दुसरा मेसेज आला. 


पण त्याचे डिलिव्हरी चार्जेस पे करावे लागतील. साठ हजार मात्र. .


ही तयार झाली. कारण करोड रूपयाच्या पुढे साठ हजार क्षुल्लक रक्कम होती. स्नेहाने दिलेल्या लिंकवर पैसे पाठवले आणि पार्सलची वाट पाहू लागली. .


पार्सल आले नाही आठवडा उलटून गेला तरी. मग तिने पर्याय नव्हता म्हणून पुन्हा फोन केला. .


त्याने रिप्लाय दिला. मी चाैकशी करून सांगतो म्हणून. .


त्याचा पुन्हा मेसेज आला. .


'तुला पाठवलेला नेकलेस कस्टममध्ये आडकला आहे. कस्टम ड्युटी पे करावी लागेल. नाहीतर पार्सल पुन्हा माघारी येईल. .


आता पर्याय नव्हता कस्टम ड्युटी भरावी लागणार होती. त्याने प्रेमाखातर एव्हढं महागडं गिफ्ट पाठवले. आणि आपण कस्टम ड्युटी भरायची नाही. त्याच्या नजरेत आपण चूक ठरणार. .


कस्टम ड्युटीची चाैकशी केली. तर समजले की वस्तूच्या किंमतीच्या साधारण वीस टक्के भरावी लागणार. .म्हणजे जवळजवळ बावीस लाखाच्या आसपास. .हीने दुसर्‍या दिवशीची वेळ मागवून घेतली. आणि पैश्याची जमवाजमव सुरू केली. .दागीने,एफ.डी.,अार.डी. मोडली मित्र मैत्रिणी कडून उसने पैसे घेतले. आणखी कमी पडले तेव्हा संयोगीताला फोन केला.


संयोगीताने विचारले. आणि पार्सल आले आहे का ?. म्हणून चाैकशी केली. .


त्यावेळेस तिला समजले हीने साठ हजार तर भरलेत आणि आज बावीस लाख भरणार आहे. संयोगीता बोलली घाई करू नको मी येते मग आपण दोघी जाऊन पैसे भरू. कारण फोनवर ती ऐकणारी नव्हती. .


संयोगीताला समजले. .की असे कुठल्याही प्रकारचे पार्सल आले नाही. .पार्सलच्या नावाने हे सर्व धंदे पैसे उकलण्याचे आहेत. .अनेक प्रकारे परदेशातील काही युवक मुलींशी मैत्री करतात. .त्यांना अगोदर तुटपुंजा किंमतीच्या भेटवस्तू देतात. त्या जाळ्यात चांगल्या प्रकारे गुरफटल्यावर. त्यांना मोठ्या किंमतीचा गंडा घालतात. .


संयोगीताने सुत्र हलवली. आॅफिसला काही दिवसाची रजा टाकली. स्नेहाला जाऊन भेटली. त्याचा आलेला मेल हीने तपासला. त्याने फेक बुकींक रिसीट फोटो काढून पाठवली होती. त्या रिसीटवर स्नेहाने डोळे झाकून विश्वास ठेवला होता. आॅन लाईन साठ हजाराची रक्कम ट्रान्सफर केली होती. स्नेहा करोडोचा नेकलेस मिळणार म्हणून सुखावली होती. एव्हढा महागडा गिफ्ट तिला कुठल्याही भारतीय प्रियकराकडून मिळाला नसता. तिने ठरवून पण तिला करोडोचे गिफ्ट खरेदी करायला शक्य नव्हते. .


संयोगीताने तिला ह्या मृगजळातून बाहेर काढले खरे. पण ते स्नेहाला पचनी पडायला अवघड गेले. .


"स्नेहा !. आता बस तुझं हे आॅनलाईन प्रकरण. साठ हजाराची शुद्ध फसवणूक करून बसलेस बाई तू. मी कस्टमला चाैकशी केली. ."


स्नेहा संयोगीताकडे बघत होती. तिला आता शब्द सुचेना. त्याचा उद्देश हा स्नेहाला जाळ्यात अोढून फसवायचाच होता. .


"बघता अशी कुठलीशी व्यक्ती तुला करोडचे गोफ्ट कशी पाठविल ?. झाल्या प्रकाराने शहाणी हो बाई. पहिले जाऊन पोलिस केस करू चल. ."


अश्या अगोदर बर्‍याच स्नेहा फसल्या आहेत. .संयोगीता साधारण ऐकून होती. म्हणून तिने मैत्रिणीला वाचवले. .


समाप्त. .


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime