Niranjan Ghatpande

Abstract Tragedy

2  

Niranjan Ghatpande

Abstract Tragedy

मनोगत

मनोगत

2 mins
19


आज मी जरा माझ्या मनातले काही विचार मांडणार आहे .मला खात्री आहे कि आपणा सर्वांच्या मनात देखील असे विचार किमान एकदा तरी डोकावून गेले असतील .बरेच दिवसांपासुन लिहीन असे म्हणत होतो  आज धाडस करत आहे .न आवडल्यास मला क्षमा करा व विसरुन जा.

सोशल मिडीया आल्यापासून सर्वजण जरा जास्तच व्यक्त होयला लागले आहेत असे मला वाटते. प्रसंग काहीही असो सर्वप्रथम ह्या सार्वजनिक चव्हाट्यावर व्यक्त होणे आजकाल प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. आणि जर का तुम्ही असे केले नाही तर ते मागासलेले पणाचे लक्षण मानुन आपण मोकळे होतो.खंरच एवढे व्यक्त होणे गरजेचे आहे का? आणी असेल तर ह्याची एवढी गरज आत्ता का भासते आहे? समजा आपण इथे व्यक्तच झालो नाही तर अशी कोणती आपत्ती कोसळणार आहे? बरं इथे व्यक्त होण्यास माझा अजिबात आक्षेप नाही, पण आपण कसे, कोणत्या स्वरुपात,कोणत्या मनस्थितीत व्यक्त होत आहोत व त्याचे समाजमनावर किती सखोल परीणाम होवु शकतात ह्याची एक माणूस म्हणून आपल्याला अजिबात फिकीर नसणे ह्याहुन दुसरे बेजबाबदारपणाचे व अधःपतनाचे उदाहरण नाही.हा सार्वजनिक चव्हाटा आज शाळकरी पोरांच्या हातात भ्रमणध्वनी मार्गे सहज उपलब्ध आहे, त्यामुळे ह्याचे परिणाम कोवळ्या मनांवर सहज उमटतात.

भ्रमणध्वनीचा शोध आणि विशेषतः ह्या स्मार्ट फोन चा शोध लागण्या आधी आपण जगत नव्हतो का? कधी काय अडले होते आपले ? मग आत्ताच का आपल्याला तो आपल्या प्रियजनांहुन हि प्रिय झाला आहे?

ह्या स्मार्ट फोनने आपल्याला पंगु करून ठेवले आहे. ह्याने कितीतरी गोष्टी आपल्याकडुन हिरावून घेतल्या आहेत.एकमेकांना प्रत्यक्षात भेटण्यात मिळणारा आनंद, एकमेकांशी गप्पा गोष्टी करण्यातला आनंद , एकमेकांना काय हवे आहे काय नको आहे हे जाणुन घेण्यातला आपलेपणा, जिव्हाळा, कधी कुणाला काही लागले , खुपले तर त्यामागची काळजी ....असे असंख्य क्षण आपल्यापासुन हिरावून घेतले आहेत व आपल्याला एकदम शुष्क, भावनाशून्य व निर्बीड बनवले आहे. जो तो आपापल्या भ्रमणध्वनी मध्ये इतका गढुन गेला आहे की आपल्या बाजूला काय घडते आहे ह्याची जाणीव पण नसते ...किंव्हा तशी ती करून घेण्याची गरज पण भासत नाही ह्या पेक्षा मोठा दैवदुर्विलास तो कोणता?

गरज पडल्यास माणुसच माणसाच्या उपयोगी पडणार आहे हे साधे सरळ वास्तव्य आपण विसरत चाललो आहोत नव्हे तसे करण्यासाठी आपल्याला हा भ्रमणध्वनीरुपी राक्षस भाग पाडतो आहे , ह्याचा धोका वेळीच लक्षात घेऊन ह्यांचा तावडीतुन लवकरात लवकर आपल्या सर्वांची सुटका होवो हिच सदिच्छा.


ही पोस्ट आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठीही ह्याच राक्षसाचा आधार घ्यावा लागला आहे ...असो


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract