Niranjan Ghatpande

Others

2  

Niranjan Ghatpande

Others

करोनारुपी आसूड

करोनारुपी आसूड

2 mins
16


हे खऱ्या अर्थाने गाजवले ते करोना नामक महासाथीने.ह्या साथीमुळे उनमत्त, उद्दाम, मगरूर झालेल्या मानवाला असाकाही चपराक ह्या साथीने दिला आहे की किमान पुढील 50 वर्षे तरी कोणी ह्या करोनारूपी दानवाला विसरू शकणार नाही असे वाटते.

कोणी म्हणते आहे की हे बायोलॉजिकल युद्ध आहे, कोणी म्हणते आहे की देवाचा कोप आहे... कुणी काही तर कुणी काही म्हणत असते.पण एवढे खरे की निसर्गाची अपरिमित हानी करणाऱ्या मानवाला निसर्गाने असा काही तडखा लागवला आहे की ह्यातून सावरायला त्याला किमान 3-4 वर्षे तरी सहज लागतील. ह्या महामारीमुळे लोकं आता विचार करू लागली आहेत की आपले नक्की काय चुकले? कुठे चुकले. जीवन हे किती क्षणभंगुर आहे हे कळले. काही तासातं होत्याचे नव्हते झाले. कितीतरी संसार उध्वस्त झाले, कित्येकजणांनी आपल्या डोक्यावरचे छत्र (आई बाबा) गमावलं. आपण म्हणतो विज्ञाननाने खूप प्रगती केली आहे... पण अजून एवढीही नाही की साधा प्राणवायू मुबलक प्रमाणात मोफत सर्वांसाठी उपलब्ध करू शकेल. आयुष्यभर जो प्राणवायू आपली साथ देतो ज्यासाठी आपल्याला एक रुपयाही मोजावा लागतं नाही त्याची किम्मत आत्ता लोकांना कळायला लागली आहे जेव्हा जवळ जवळ निम्याहून अधिक पृथ्वीवरून आपण झाडें, डोंगर, दऱ्या खोऱ्या, वन्यजीव नष्ट करून बसलो आहोत. मनुष्या व्यतरिक्त कोणत्याही प्राण्याच्या संखेचा उद्रेक आपण आजपर्यंत पहिला आहे का? प्रगतीच्या नावाखाली आपण निसर्गचक्रच बदलायला निघालो होतो ज्याला आळा घालणे ही काळाची गरज होऊन बसली होती.

ह्या करोनाने आपल्याला खुपकाही शिकवलं आहे जसे की निसर्गापुढे माणूस कितीही शिकला, प्रगत झाला तरी हतबल आहे.

तुमची मूलभूत गरज नक्की काय आहे व ती भगवायला तुम्ही किती असमर्थ आहात हे दाखवून दिले.

घड्याळाच्या काट्याबरोबर धावणाऱ्या मानवाला खरा वेळ तू आयुष्यात कश्याला दिला पाहिजेस व किती साध्या साध्या गोष्टीत आनंद व समाधान समावलं आहे हे दाखवून दिले.

जुन्या रूढी परंपरा ज्या आपण मॉडर्न जमान्यात वावरतो आहोत म्हणून कैक वर्षे अगोदरच बासनात गुंडाळून ठेवल्या होत्या त्याच रूढी परंपरा किती योग्य व दुर्गामी विचारांच्या होत्या व आहेत ह्याची नव्याने प्रचिती अनुभवायला मिळाली.

जुनं तेच सोनं हे शब्दशः खरे करून दाखवले.

आपण आपल्याच जवळच्या लोकांना किती ओळखत होतो पूर्वी व त्यांची नवीन ओळख पुन्हा नव्याने ह्या लोकडाऊनच्या काळात करून दिली.

माणूस हा आहे त्याच्यात आहे तेव्हढ्यात सुखाने व आनंदात राहू शकतो हे दाखवून दिले. बऱ्याच जणांना व जणींना घरचे जेवण हेच सर्वोत्तम ह्याचा पुनः प्रत्यय आला.

हॉटेल्स शिवाय ही आपण जगू शकतो असा नवा अविष्कार पण कित्येकजणांना झाला असेल. किती नाहक आवाजवी खर्च आपण पूर्वी करत होतो ह्याची जाणीव बरेचजणांना झाली असेल.

अडचणीत फक्त माणूसच माणसाच्या उपयोगी येतो व पैसा असूनही आपण निसर्गापुढे हतबल आहोत ह्याची जाणीवही अनेकांना करून दिली आहे.

त्यामुळे करोना हा एक प्रकारे आपल्या सर्वांचाच एका अर्थाने कडक गुरु आहे ज्याने आपल्याला बऱ्याच गोष्टींची नव्याने ओळख करून दिली आहे.

आपण त्याच्याकडे कोणत्या नजरेने पाहायचं हे प्रत्येकाने स्वतः ठरवावे लागेल.

धन्यवाद


Rate this content
Log in