Swarup Sawant

Inspirational

3.3  

Swarup Sawant

Inspirational

मंजुळा

मंजुळा

4 mins
1.7K


.मंजुळा नावातच खूप काही आहे.तिचा आवाज मंजूळ आहेच शिवाय दिसायला हि सुंदर. बोलण्यात विनम्रता . ती बोलायला लागली की सारा आसमंत मंत्रमुग्ध झाल्याचा भास होतो. असे वाटायचे तिने मनमोकळे बोलत रहावे अन् आपण ऐकत रहावे. असेच युगानयुगे चालत रहावे . ती चालताना तिच्या पैंजणाचा ताल एेकून असे वाटायचे जणू सारा निसर्ग त्याचा ताल धरून डोलत आहे.तिचे डोळे इतके मोहक की त्यात आयुष्यभर पोहत रहावे. परमेश्वराने जणू फुरसत घेऊन तिला बनवले असावे.

मंजुळा तिच्याशी बोलण्यासाठी सारी मुले तरसायची. तिच्या वागण्यात पेहरावात इतकी सादगी की तिच्याबद्दल कुणाच्याही मनात चांगलेच विचार यायचे.अशी हि मंजुळा माझी जिवनसाथी बनावी अशी माझी खूप इच्छा होती. पण तिच्यापाशी गेले की माझे शब्दच गोठून जात. ती इतक्या निर्मळ मनाची होती की माझ्या मनात असे काही असेल याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. तिला आपण विचारले आणि तिने नाही म्हटले तर मैत्री तोडली तर हा विचारही मला असह्य होई. म्हणतात ना क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा असेच काहिसे माझे झाले होते.

दिवस कसे जातात तेच कळत नाही. आमचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले .निरोपाचा दिवस उजाडला. काय करावे काय करू नये .भूक तहान विसरलो.गुलाबाचे फूल घेऊन She loves me. She loves me not. करुन पाहिले दहांदा . पाच वेळा नाही पाच वेळा हो. फूल वाया घालवली त्यापेक्षा तिला दिली असती तर ---जरतरच्या विचारात असतानाच अबोली कलरची साडी अगदि मोजकेच दागिने घातलेली अगदी साधी मंजुळा प्रवेशली. सगळ्यांच्या नजरा भिरभिरल्या. जणू काही घडलेच नाही या आविर्भावात ती सहजगत्या मिरवत होती.माझे सारे विचार गोठले. तिला विचारायचे धाडसच झाले नाही.एकमेकांचे फोन घेतले. फोन करु मैत्री ठेवू अशा आणाभाका घेऊनच निघालो. आधी पायावर उभे राहू .तोपर्यंत फोनवर मैत्री टिकवू. असा विचार करुन मनावर ताबा ठेवला. व प्रेम एका कुपीत बंदिस्त करुन निघालो.

काही दिवस आम्ही एकमेकांना आवर्जून फोन करत होतो.पण हळूहळू करियरच्या धेय्याने भारावून टाकले .पैशाच्या मागे कधी धावू लागलो समजलेच नाही.

सेटल झालो .आवक वाढली आईची सुनेसाठी मागणी सुरु झाली. अन् मनाच्या कुपितल्या मंजुळेने आवाज दिला. मंजुळा ,कुठे असेल लग्न झाले असेल का?की माझ्या प्रेमाची वाट पाहात असेल

मी थरथरलो. आपले निस्सिम प्रेम आपण कसे विसरलो.मोबाईल मधून मंजुळा कधी गेली मला समजलेहि नाही.अरे बापरे!! माझ्या आयुष्यातूनही अशीच गेली नसेल ना????पटकन फेसबुक इंस्टाग्राम वेगवेगळ्या ठिकाणी शोधकाम सुरु केले. कुठेच नव्हती. खूप मोठी चूक केली.करियरच्या गर्दित मलाच मी कसे विसरलो. शेवटी मित्र शोधले. म्हणतात ना सच्चे दिल से ढुंडो तो भगवान भी मिलते है।

अखेरीस शोधकामात यशस्वी झालो .म्हणजे मोबाइल नंबर मिळवण्यात हो.

काहिसा घाबरतच तिला फोन लावला .हॅलो तोच मंजुळ आवाज कानी पडला. पण आवाजात एक प्रकारची खिन्नता जाणवली. मी ओळख सांगताच तिला रडू कोसळले .जणू काही माझाही आवाज ऐकण्यास तिचेही कान तरसले होते.

आम्ही भेटायचे ठरवले. भेटीचा दिवस आला. माझ्या ह्रदयाची धडधड वाढत होती. ती आपल्याला नकार देईल का? की होकार ?विचार करत भेटीच्या ठिकाणी पोहोचलो.नजर भिरभिर करत त्या सु्ंदरतेला शोधत होती.तितक्यात माझे नाव कानी पडले मंजूळतेचे त्यात नामशेषही नव्हता. तिला पाहून अवाक झालो. ते सौंदर्य लोप पावले होते. काळजीच्या स्वरात मी तिची विचारपूस केली

तिची खूप ट्रजेडी झाली . बाबा अकाली गेले.घरची जबाबदारी तिच्यावर आली. भावंडाना मार्गाला लावले. अन् तिच भावंडे आपआपल्या मार्गांनी निघून गेली. जरुरीेपेक्षा जास्त श्रमाने ती थकून गेली .तिला संधीवाताने त्रस्त झाली

सगळे सौंदर्य हरपून गेले. आईची जबाबदारी होती ती वेगळीच .

मी सुन्न झालो. आज तिला मी मागणी घालणार होतो. पण तिची ती अवस्था पाहून माझ्या मनाने खच खाल्ली.मी कसा घरी पोहोचलो ते मला समजले खूप काही वजन उचलल्या सारखे वाटत होते.काय करावे सुचत नव्हते.

विचार करू लागलो .या अवस्थेत तिला स्विकारणे म्हणजे समाज वेड्या काढेल

आजारी मुलीशी लग्न करायला निघालो.तर पहिले घरातून बाहेर.मग विचार केला मंजुळा जर तशीच असती तर सुंदर गोड तर काय झाले असते . मी तिथेच तिला मागणे घातले असते. मग नक्की मी काय करत होतो .तारुण्यातील आकर्षण, पॅशन ,की -------- छे !डोक्याचे भजे झाले. जर मी तेव्हाच तिचा झालो असतो आणी आता मी आजारी असतो तर ??? प्रेम, स्वार्थ ,मिथ्या आकर्षण की तरूणाईचे वेड . काही दिवस कामात झोकून दिले. पण व्यर्थ .खोल अंतरीचे प्रेम स्वस्थ बसू देत नव्हते. प्रेम आंधळे असते. हे कधी पटले नव्हते. आता त्याची प्रचिती येत होती.

कधीतरी खोलवर रुजलेल्या प्रेमाला खूप वर्षांनी अंकुर फुटला होता. तो जपण्यासाठी शांत मनाने पावले माझ्या प्रिय मंजुळेकडे वळली.प्रेमाला नाव देण्यासाठी ,न्याय देण्यासाठी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational