Dr.Smita Datar

Fantasy

2  

Dr.Smita Datar

Fantasy

मनीच्या कानी - 3

मनीच्या कानी - 3

2 mins
8.2K


हाय मनी,

      हल्ली न बाबा माझी खूप काळजी घेतो. तुम्ही दोघे परदेशी गेल्यापासून घरात आम्ही दोघेच. घरात म्हणण्यापेक्षा घराबाहेरच जास्त. दोघे आपापल्या करीयर मध्ये बिझी. पण ईन अ वे, ते बर. मला तर वाटते, बाबा आणि माझी जन्मभर भांडणे न होण्याच कारण म्हणजे कमी वेळ भेटण. आपोआपच चांगलं बोलले जात, एकमेकांची काळजी घेतली जाते. एकमेक करत असलेल्या मेहनतीची कदर होते. सुरुवाती पासूनच आमच नात एकमेकांविषयी आदराच, प्रेमाचंच आहे, पण तेव्हा नाही म्हटल तरी पुरुषी बेदरकार वृत्ती प्रमाणे बाबा खूप केयरिंग नव्हता. किवा कुठेतरी आपण सगळे एकत्र असल्याने अशी विशेष काळजी तो करत नसावा. पण आता त्याला ही जाणीव झालीये की त्याने माझ्याकडे लक्ष नाही दिल तर मी खरच अगदी एकटी पडेन. सो, बदललाय तो.

     आम्ही सुरुवातीपासूनच एकमेकांशी खूप बोलायचो. एकाच दुसऱ्याला पटल नाही तर सांगायचो. चर्चा करायचो. दुसऱ्याच ऐकून घेण सुद्धा एक कला आहे. दुसऱ्याला सांगण आणि त्याच ऐकण असा समसमा संवाद व्हायला हवा. ज्वालामुखी प्रत्येकाच्याच मनात असतो, लाव्हारसाचा थोडा थोडा निचरा झाला तर ठीक , नाहीतर तापलेली वाफ कोंडून एक दिवस त्याचा उद्रेक ठरलेला म्हणूनच मित्र मैत्रीणीत पण जो नीट ऐकून घेतो न आपलं तो जवळचा वाटतो. लहान मूल नाही का सगळ्याचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत? Attention seeking syndrome म्हणतात त्याला. असे आपल्याकडे लक्ष देण सगळ्यांनाच हवस असतं. आपण कोणालातरी आवडतो, आपली पण कदर आहे, ही भावनाच माणसाला उमेद द्यायला पुरेशी असते.

   हल्ली न आम्ही ठरवून डेट करतो. सिनेमा, लंच , डिनर, लोणावळा असं काहीतरी अधेमध्ये ठरवतो. नाती शिळी होऊ न देण पण आपल्याच हातात असत न शेवटी.खूप मजा येते, बाबाला माझी स्पेशल काळजी घेताना पाहिल्यावर. दोघंच असल्याने परस्परांचा कंटाळा पण नको न यायला.

  तुमच्या फोटोज वरून कळतंय , मनीमाऊ ची स्वारी मजेत आहे ते. अशीच मजेत रहा. अभ्यास चाललाय न? तुझं मिलियन डॉलर स्माईल असंच सांभाळून ठेव.

  लव यू.

मम्मा

  


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy