किशोर राजवर्धन

Romance

5.0  

किशोर राजवर्धन

Romance

मनी मल्हार #3

मनी मल्हार #3

6 mins
1.0K


(3)

मनी, चिऊ आणि त्यांचा ग्रुपचं कॉलेज मधलं स्वपनाळू आणि रंगीन आयुष्य आता मागे पडलं होतं. प्रत्येकजण करिअर मध्ये स्थिर होण्याच्या धडपडीत लागले होते… चिऊने पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने पुढे वाटचाल सुरु केली आणि तिचा आवडता विषयात तिने पदवीत्तर नंतर PhD करण्याच ठरवलं…… मनीने नोकरी करण्याचा निर्णय घेतला…. तिच्या घरच्यानी तिच्या लग्नासाठी वेगवेगळी स्थळ शोधण्यास सुरुवात केली होती…..पण मनीच्या मनी तारुण्याच्या पहिल्या प्रेमात तिच्या मुखाशी फक्त एकच नाव ति घेत होती….‘मल्हार , मल्हार…..’

तुझ्या डोळ्यात पाहते

माझ्या स्वप्नांची रास….

तुझ्या श्वासांची दरवळ

पुन्हा-पुन्हा भेटीची आस….

मनीच्या दोनोळीचं रुपांतर आता चारोळीत झालं होतं. छोठी-मोठी रुसवा फुगवी, भांडण आणि मिलनाची अमृतगोडी चाखत दोघांच्याही प्रेम कम अफेर्सला दोन वर्ष झाली होती…

पावसाळ्याचे सुरवातीचे दिवस होते. पण ह्यावर्षी तो मुंबईकरांसोबत ऊन-पाऊसाचा खेळ खेळत होता. मनीला आज ऑफिसला निघायला नेहमीपेक्षा खुप उशिर झाला होता. तरीही ती आज निश्चिंत होती. तयारी झाल्यावर तिने आईला “मी निघते…” म्हणून बाहेर पडली.. ऑटोरिक्षा पकडून ति कांजुर मार्ग स्टेशनला पोहचली. स्टेशनवर येताच पहिल्यांदा तिने इंडीकेटर पाहिलं. लगेच तिच लक्ष सी.एस.टी.ला जाणारी ट्रेनच्या अनाऊस्मेंटकडे गेलं. तिने धावतच रेल्वेब्रिज चढून प्लॅटफार्म नंबर दोनची ट्रेन पकडली आणि डब्यात चोहीकडे नजर फिरवली. पूर्ण डब्बा महिलांनी भरला होता. आपणं योग्य डब्यात चढलो आहेना याची खात्रीकरुन तिने सुटकेचा नि:श्वास सोडला…

मल्हारला प्रत्येक वेळी भेटायला जाताणा तिला त्याच्या सोबत व्यतित केलेला एक-एक क्षण आठवायचा…( मल्हार सोबत असताणा तिला वेळच भान राहत नव्हत इतकी ति त्याच्या प्रेमात प्रेमवेडी झाली होती. पण ति टुर्स आणि ट्रावेल्स एजन्सीमध्ये नोकरीला लागल्यापासून दोघंच्याही भेटीगाठी कमी झाल्या होत्या. आज ति तब्बल एक महिन्याने त्याला भेटणार होती….) पुन्हा ति त्याचा विचार करत… मल्हारच्या प्रेमात दोन वर्ष कशी क्षणभुंगार होऊन निघुन गेली.…ह्या आठवणीच्या गर्दीत येणार प्रत्येक स्टेशन मागे टाकत ट्रेनसोबत त्याला भेटण्यासाठी वेग घेत होती….

मल्हार एक-दीड तास झालं मनीची वाट पाहतं सी.एस.टी. स्टेशनवर उभा होता..उतरणा-या प्रत्येक ट्रेनच्या गर्दीमध्ये तो तिला शोधत होता.. इतक्यात लेडीज स्पेशल ट्रेन वेग कमी करत प्लॅटफार्म नंबर तीनवर येऊन थांबली.. वेगवेगळ्या सुंदर रंगीत फुलांचा आणि कळ्यांचा एकत्र वर्षाव व्हावा तसं त्यामधली गर्दी त्याच्या चोहीबाजूने जाऊ लागली. सर्व सुंदर रंगीत फुलं आणि कळ्यांच सौदर्य डोळ्यात भरत त्यांची आप-आपल्या ऑफिस,कॉलेज , काम, नोकरीचं गंतव्य गाठण्यासाठी चाललेली धावपळ तो पाहतं होता…..गर्दीतुन मार्ग काढतं अवचित ति त्याच्या समोर उभी राहिली. सोनचाफ्याच्या कळी सारख तिचं नाजुक गोजिर रुप पाहुन किंचित तो हरवून गेला...दोघांनी एकमेकांचा हात हातात घेत चालत… सी.एस.टी. स्टेशच्या गर्दीतुन बाहेर आले…..चालता चालता गप्पा करत मरीन ड्राईव्हला आले..उधाणलेल्या समुद्राकडे पाहतं बसले.. किना-यावर येणा-या प्रत्येक लाटेकडे पाहत असताना मनीने मल्हारला म्हंटलं “ एक विचारू..? ” त्याने तिच्याकडे पाहतं होकार दिला..

तिने विचारलं “ प्रत्येक वेळी.. तु देवाच्या गाभा-यापर्यंत येतोस…आणि परततोस..”

त्याने तिच्याकडे गहि-या खोल डोळ्यात पाहुन उत्तर दिलं “ तुझी त्या दगडावर श्रध्दा आहे. माझी माणसावर..मी दगडाच्या देवापेक्षा माणूसकीला देव मानतो..आणि माझी श्रध्दा तुझ्या प्रेमावर आहे.. तु्झं माझ्यावरचं प्रेम हेच माझ्यासाठी मी देव समजतो.. ”

त्याच्या शब्दात खोल अर्थ दडलायं याची जाणिव तिला झाली. (उधाणलेल्या समुद्रावरून जिवलग मैत्रिण चिऊच्या आठवणीची लाट येऊन तिला धडकली... तिने एकदा हाच प्रश्न तिला विचारला होता आणि तिने ही हेच उत्तर देत……….माझी श्रध्दा तुझ्या मैत्रीवर आहे..…पण ह्याच्या तर्कवितर्कात न आडकता आठवणीची लाट पुन्हा परत खोल मनाच्या तळाशी गेली… आणि येणा-या वा-याच्या सुसाट स्पर्शाने ति त्याला बिलगली…)

मल्हारने विचारलं “ तु सांगितलसं आपल्याबद्द्ल घरच्यांना…! ”

तिने त्याच्या हद्यावर नाजुक बोटाची रेष आखतं म्हटंल “नाही.. अजून ....”

त्याने तिला आपल्या नजरे समोर आणतं म्हणाला “ प्लिज वेळेत सांग … नाहीतर पुढे….” इतक्यात तिने त्याच्या ओठांवर हात ठेवतं त्याच बोलण थांबवून पुन्हा त्याच्या मिठीत बिलगतं.. त्याच्याकडे पाहतं म्हटंल “ गप्प… एकतर महिन्याने भेटतोस… प्रत्येक वेळी तुझं आपलं तेच-तेच.. सांगेन मी…पण मला आता भुक लागली..” तो तिच्याकडे प्रश्नार्थ पाहात होता. त्याला उत्तर देण्यासाठी तिच्याकडे काही शब्द सुचेना……

     ढगाळलेलं वातावरण, पण पाऊस बरसत नव्हता.. फक्त सोसाट्याचा वारा सुटला होता. दोघांनी सोबत लंच केला.. आणि मल्हार मनीला घेऊन त्याच्या घरी आला.. तिने त्याच्या मम्मी बदल विचारलं.. त्याने फ्रिज मधून पाण्याची बॉटल तिच्या हातात देतं म्हणाला..

 “मावशी आजारी…ति तिला पाहायला गेली…येईल..!”

मनी तिच्या भविष्यातील घराचा वेध घेत होती… मल्हारने विचारलं .. “तुझ्यासाठी कॉफी करु…” तिने हुंकार देत..फिरत मल्हारच्या रुममध्ये आली..

(बेड्च्या आजुबाजूला मल्हारचे कपडे इतरत्र विखुरलेले होते… बेडच्या समोर भिंतीवर सम्राट अशोक युध्दात विजयी झाल्यानंतर त्याचा परिणाम पाहुण बुध्दांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करत असल्याची युध्दाच्या विविध रंगात रंगलेली पेंटिग व याच्या खाली लिहिल होत. “ नि:संदेह बुध्द हा जगाचा प्रकाश आहे.” बेडच्या डाव्या बाजुला बुक शेल्फ त्यात बाबासाहेबच्या भाषणाचे खंड आणि बौध्द धम्मावरील वेगवेगळी पुस्तक , उजव्या बाजुला भिंतिवर क्लासिकल गिटार आडकवले होते. त्याच्या खाली इलेक्ट्रोनिक म्युझिक किबोर्ड, त्याच्याच बाजूला डेक्सवर पर्सनल कॉम्पुटरच्या बाजूला बाबासाहेबांच्या ब्लॅक ऑन्ड व्हाईट फोटोची छोठीशी फ्रेम, दुस-या बाजुला रेड पेन होल्डर कप बाजूला लॅपटॉप.. लॅपटॉपवर ब्लॅक कलरची डायरी.. रुम न्याहाळत असताना.. तिचं लक्ष लॉपटॉपवर असलेल्या ब्लॅक कलरच्या डायरीवर गेलं.. ति हातात घेत … पहिलं पान उलगडलं… निळ्या स्केच पेनने मोठ नाव लिहीलं होतं.. मनी मल्हार  त्याला पिवळ्यारंगाची बॉर्डर आखली होती.. डायरीची पानं जसजशी ति उलगडतं होती तसं तिला दोघांची पहिली भेट, छोटी मोठी रुसवा फुगवी ह्याच प्रत्येक बारीक सारीक टिपणं वाचत असताना.. वेळ जशी तिच्यासाठी थांबली होती…..तिने मल्हारचं मन तिच्या प्रेमाने भरलेल्या डायरीच पुढचं पान उलगडलं… आणि कविता वाचू लागली…)

तुझ्याचसाठी वेचले क्षण मी प्रितीचे

उधळुन दे रंग सारे प्रेमाने भरलेल्या प्रितीचे...


गुंतु दे श्वासात श्वास बहरु दे वृक्ष आपल्या प्रितीचे

दरवळू दे सुगंध तुझ्या माझ्या प्रितीचे....


स्पर्शाने तुझ्या कर क्षण सोन्याने प्रितीचे

हळूवार फुलु दे तुझ्या ओठांतील स्मित प्रितीचे....


विसरुन जगाचे भान जाऊ गावी स्वपनांनच्या प्रितीचे

रंगुनी रंगात तुझ्या होईल मी प्रितीचा.....


For My Love.. मनी….


कविता वाचत असतांना तिच्या मनात काही शब्द उमलले.. ते पुढे लिहिण्यासाठी तिने डेक्सवर पेन होल्डर कप मधून पेन उचला आणि ति कविता पूर्ण केली…


पाहुनी चंद्रकोर प्रितीची

मनी तुझ्याच प्रितीची....


राहीलास तासं-तास उभा वाट पाहत तुझ्या प्रितीची

क्षमा कर साजणा चुकी तुझ्या प्रितीची...


दे हातात हात गाणे गाऊ तुझ्या माझ्या प्रितीची

घे मिठीत राजसा स्वर जुळुदे तुझ्या माझ्या प्रितीचे...


फक्त तुझीच मनी…..


इतक्यात मल्हार टिपॉय मध्ये कॉफीचे दोन कप घेऊन आत आला.. त्याने तिने लिहीलेले शब्द वाचले… टिपॉय डेक्सवर ठेवत त्याने तिला मिठीत घेतलं…तिच्या माथ्यावर ओठ ठेवत फोरहेड किस करताना त्याच लक्ष सकाळपासून तिने लावलेल्या दोन भुवयामधीलं पांढ-यारंगाची चंद्रकोर टिकलीकडे गेलं. तिच्या हातातला पेन घेत पांढ-यारंगाची चंद्रकोरीच्या खाली त्याने दिल चा आकार काढला..त्याने काढलेलं दिल पाहण्यसाठी तिने तिच्या मोबाईल मध्ये दोघांचा सेल्फी घेतला..

मंद काळ्या ढगाळलेल्या ढगांतुन पावसाच्या सरी बरसु लागल्या. जणु त्या अवनीला अंबरातुन बरसणा-या मल्हारवर प्रेम उधळण्यासाठी खुणावत होत्या. खिडकी मधुन थंड ताजी हवा त्यांच्या शरिराला स्पर्शकरुन आतले वातावरण सुगंधित करत होती. मनीने मल्हारच्या मनातील सावळे भाव ओळखले..त्याच्या डोळ्यात निळ्याछ्टा अवतरल्या होत्या..मल्हारने पुन्हा फोरहेड किस केलं.. मनीचा चेहरा लाज आणि शरमेने एकदम गुलाबी झाला. ते दोघेही काही क्षण एकमेकांकडे बघत होते. त्याने तिचा खालचा ओठ त्याच्या दोन्ही ओठामध्ये घेऊन ओढला..तसाच वरचा ओठ ओढताणा त्या चुंबनाच्या आवाजाने… मनीने पुन्हा मल्हारचा ओठ तिच्या दोन्ही ओठामध्ये घेऊन ओढला..चुबंनाने दोघांचे ओठ ओले झाले.. मधुर मधुर साद सोबत हव्या हव्याशा स्पर्शने दोघांन मध्ये कामेच्छा आवतरली..बाहेरच्या जोरदार पावसामध्ये दोघांच्या वरीलवस्त्रासोबत अंर्तवस्त्रे वाहून गेली…मल्हार मनीच्या कायेवर ऑल ओव्हर किस करत त्याच्या प्रेमाचे गुलाबी ठसे उमटवत होता. त्याच्या चुबंनाच्या स्पर्शाने ति उद्दीपित होत होती.. तो सुखदायक अनुभव मनात साठवत मनी अंबरातून बरसणा-या मल्हारात बेधुंद होऊन त्याला अर्पण झाली. तो तिच्यावर अरुढ होऊन तिच्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता……जोरदार पुरुषार्थाच्या स्पर्शाने मनीच कोमार्यभंग पावलं आणि त्याचा लाल रंग त्याच्या पुरुषार्थावर चढला. तिने आत्ता पर्यंत जपून ठेवलेलं स्त्रिधन तिच्यावर मनापासून प्रेम करणा-या मल्हारवर उधळल्याचा आणि तो लुटल्याचा आनंद दोघांच्याही डोळ्यात झळाळत होता. ………..आणि तासभरात दोघेही नखशिखांत प्रणयाच्या परमोच्च आनंद शिखरावर पोहचले. सोनचाफ्याच्या कळीच आज फुलात रुपातंर झालं..बाहेर हळूहळू पावसाची रुणझूण कमी होत होती…तसं प्रणयगंध मल्हारच्या रुममध्ये दरवळून तो पावसाच्या गंधात नाहीसा होत होता.. मनीने त्याच्या कपाळावर ओठ ठेवले… त्याच्या मिठीत शिरत घठ्ठ आलिंगन दिलं…दोघेही बेडवर तसेच पडून होते. मल्हारचं लक्ष अलगद त्याच्या डेक्सवर ठेवलेल्या कॉफीच्या दोन कपांकडे गेलं.. कपांमधील कॉफी प्रमाणे दोघही प्रणयात चिंब चिंब भिजुन शांत आणि थंडगार झाले होते….त्यांच्याकडे पाहतं तो शुन्यामध्ये मग्न झाला. त्याच्या समोर वर्तमानातले अपूर्ण प्रश्न भविष्याच्या वाटेवर उभे होते….Rate this content
Log in

Similar marathi story from Romance