किशोर राजवर्धन

Romance

5.0  

किशोर राजवर्धन

Romance

मनी मल्हार #2

मनी मल्हार #2

5 mins
920


मनीचा (रुपिका) स्वभाव प्रेमळ आणि स्वप्नाळू होता. तारुण्याच्या उबंरठ्यात पदार्पण केल्यापासून ती तासनतास कॉलेजच्या लायब्ररीत बसून, वेगवेगळ्या लव्हस्टोरी वाचून तिच्या स्वप्नातल्या राजकुमारचा चेहरा ठरवत त्याचा पाठलाग करत होती. कधीकधी ती नभागंणातल्या चंद्रात त्याचा चेहरा शोधायची. त्याच्यासोबत मनातल्या मनात गप्पा मारायची. पण तो चेहरा स्पष्ट होत नव्हता. पण ह्या वर्षी ज्या चंद्रात तो चेहरा शोधत होती, तो आज स्पष्ट झाला होता. मनीच्या मनातल्या तारुण्याच्या उबंरठ्यावर असलेली कोवळी गुलाबी स्वप्नांची रास तो येण्याने थांबली होती. अलगद तिच्या मनात दोनोळी तयार झाल्या..


तुझ्या डोळ्यात पाहते

माझ्या स्वप्नांची रास…


तिला त्याचा छंद लागला.... तिला त्याच्याशिवाय कोणीच गवसतं नव्हत. ती त्याच्या स्वप्नांमध्ये विरत राहू लागली... तिच्या कानोकानी DJ चा तोच नाद घुमत होता. तसं तिला त्याच्याबदल काहीही माहिती नव्हतं. पण जाणून घेण्याची हुरहूर लागली होती. (चिऊ आणि सर्व कॅम्पमधील ग्रुप दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत पिकनिकचा प्लान करुन फिरायला जात असे. तिने एकदा तिच्या बिल्डिंगच्या ग्रुपचे पिकनिकचे फोटो दाखवले होते. ते पाहत असताना मनीचं मन क्षणभर ज्या चेहऱ्यावर विसावलं होतं. त्याच्याबदल आंतरिक ओढ निर्माण झाली होती, आणि त्याचा पाठलाग करत त्याला पुन्हा भेटण्यासाठी ती आज तयारीला लागली होती.)


जसं संघर्षी (चिऊ) आणि मनी कॉलेजच्या मैत्रिणी होत्या तसेच संघर्षी (चिऊ) आणि मल्हार दोघेही बालपणीचे मित्र होते. दोघही एका परिसरात वाढलेले. मल्हार दिसायला गोरापान, दररोजच्या व्यायामाने कमावलेली शरीरयष्टी, स्वभावाने प्रेमळ आणि सुशील असल्यामुळे त्याचा सहवास हवाहवासा वाटायचा. दोन वर्षापूर्वीच मल्हारच्या कुटूंबाने लेबर कॅम्प सोडून कुर्ल्यातील नेहरुनगर येथे त्याच्या वडिलांनी आयुष्याच्या पुंजीतून मुत्यूपूर्वी घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहायला गेले होते.


जयंती सोहळा उलटून एक महिना होऊन गेला होता. तरीही 14 एप्रिलची रात्र मल्हारच्या मनात इको इफेक्टसोबत तो क्षण लुपरोल होत होती. (पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस. त्यावर डार्क हिरव्या फुलांची नक्षी. मधल्या सोनचाफ्याच्या कळीचं देखणं रुप तो अजून विसरलेला नव्हता. डान्स करताना तिच्या हाताची लयबद्ध हालचाल, तिच्या यौवनाची कमनीय काया, ओठांवर गडद लाल कलरची लिपस्टीक , तिच्या कमरेच्या ठुमक्यांसोबत गोलाकार फिरणारे कानातले झुमके,  त्याच्याकडे पाहताना अकस्मितपणे हळूवार वळलेली तिची नजर, दोघांच्या नयनानी एकमेकांवर सोडले शर, दोघांच्याही चेहऱ्यावर एकमेकांना पाहून उमटलेली हस्याची स्मितचंद्रकोर त्याच्या काळजात हवीहवीशी वाटणारी जखम देऊन गेली होती. ती जखम भरुच नये अस वाटत होतं.) तरीही मनातल्या जखमेवर औषध शोधण्यासाठी तो विचारात गर्क झाला. इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने स्क्रिनवर नजर टाकली. लेबर कॅम्पच्या ग्रुपमधला मित्र रवीचा फोन होता. त्याने फोन पिकअप करुन रवीची चौकशी केली. रवीने त्याला दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी पिकनिकच्या ठिकाणांची म्हणजे लोणावळा, खंडाळा, सिंहगड, पुणे शहर आणि नतंर त्याच्या गावी जाण्याची माहिती दिली. रवीसोबत बोलून झाल्यावर तो पिकनिकच्या तयारीला लागला. 


आज सकाळी कॅम्पमध्ये सामानाची आवराआवर करत मल्हार आणि चिऊच्या मित्र-मैत्रिणींची गडबड चालू होती. सकाळचे 7:30 वाजले होते. ट्रावलर अजून आली नव्हती. वीस जणांच्या तीन-चार दिवसांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मल्हार चेक करत होता. तितक्यात बुक केलेली ट्रावलर हॉर्न वाजवत रवी आत घेऊन आला. 

चिऊने मोबाईलवरुन कॉल केला “मनी. म्याऊ… अगं..कुठे आहेस..?”                 

“किती वेळ…?”

मनी घाईत चिऊला म्हणाली “अगं आले……”

चिऊने समोर मनीला पाहिलं. मल्हार गाडीत सामान चढवत होता… इतक्या त्याची नजर चिऊसोबत असलेल्या मनीकडे वळली… दोघांची नजरानजर झाली. मल्हारला पाहून मनीची कळी मनातून फुलली. त्याला पाहून ती अवखळ झाली.

सामान चढवून सर्वजण गाडीत चढले. घरच्यांचा निरोप घेत गाडीने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. चिऊने सर्व ग्रुपसोबत मनीची ओळख करुन दिली. मल्हारच्या ह्रद्यातल्या जखमेचं औषध त्याच्या समोर होतं. तिच्या बोलण्याने त्या जखमेवर हळूवार फुंकर पडत होती. मुंबईच्या रस्त्यांचे खड्डे, ट्राफिकमधून मार्ग काढत गाडीच्या आणि गाण्यांच्या मैफिलीसोबत मनी मल्हार एकमेकांच्या प्रेमात एकमेकांना नजरकैद करत वेग घेत होते…


तीन दिवसांच्या, सहवासाच्या गंधात मनी-मल्हार दोन ह्रद्याच्या रेशीमगाठी बांधल्या जात होत्या आणि त्याचा गंध ग्रुपमध्ये हळूहळू दरवळ होता. तिसऱ्या दिवशी ट्रावलर जेजुरी गडाच्या पायथ्याशी रवीच्या गावी आली. सर्व ग्रुप गड चढून सोन्याच्या जेजुरी गडावर पोहचला. गडावर पोहचल्यावर देवदर्शनासाठी सर्वजण देवाच्या गाभाऱ्यात आले आणि हात जोडून वदंन करु लागले. पण मल्हार आणि चिऊ दोघही आत येऊन परतले. दोघेही बाहेर येऊन सेल्फी काढण्यात मग्न होते. हे मनीने हेरले. देवदर्शनानंतर सर्वजण गड फिरण्यात आणि सेल्फी, फोटो काढण्यात गुंतले. मल्हारने मनीला नजरेने खुणावलं. ती त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्याजवळ आली आणि गड पाहण्यासाठी दोघंही ग्रुपमधून वेगळे झाले. मल्हारने गडाच्या पाठीमागच्या पायऱ्या उतरत असताना मनीला मध्येच थांबवत तिच्या काळ्याभोर डोळ्यात पाहिलं आणि मनातलं प्रेम शब्दात मांडण्यासाठी तो शब्द शोधत होता. पण ते ओठांवर येऊन थांबत होते.

स्वत:ला सावरत तो तिला म्हणाला,“मनी I’m Fall in Love…..! तू मला आवडतेस”

ती त्याचेकडे पाहात होती. काय उत्तर देऊ ह्या दुविधेतून मार्ग काढत ती शांततेत म्हणाली…

 “मल्हार ह्या अगोदर किती मुलींना म्हणालास हे..!”

दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि दोघेही खळखळून हसु लागले…

पुन्हा दोघे चालू लागले. दोघांच्याही मनाचे स्पंदन वाढत होते.

मल्हार दोघांच्यामधली शांतता दूर करत म्हणाला…..

 “तसं माझे तीन अफेअर्स होते… पण कोणतंंही अफेअर अजून माझ्या मनाचा तळ गाठू शकलं नाही.”

 “तू पहिली आहेस…जिला पाहून वाटलं माझ्या मनाचा शोध संपला.”

मनी त्याचं बोलणं मनात साठवून घेत त्याचा चेहरा न्याहाळत होती… दोघेही बोलताबोलता पुन्हा गडावरच आले जिथुन ते दोघे ग्रुपपासून वेगळे झाले होते. दोघेही मुख्य व्दाराकडे गड उतरण्यासाठी चालू लागले. मुख्य व्दाराच्या पायऱ्या उतरताना “येळकोट… येळकोट…जय मल्हार…! सदानंदाचा येळकोट..!” च्या नामाचा जागर करत खंडोबाच्या भक्तांचा घोळका त्या दोघांच्या बाजूने जाऊ लागला.

इतक्यात घोळक्यात मनीच्या सँडलचा पट्टा तुटून तिचा पाय जरा मुरगळला. ती स्वत:चा तोल सावरत असताना तिने मल्हारचा हात घट्ट पकडला. त्या स्पर्शाने त्याच्या मनातल्या किबोर्डवर मनीच्या प्रेमाची मधुर धुन सुरु झाली. मल्हारने मनीच्या जवळ जात तिच्या काळ्याभोर डोळ्यात पाहिलं. दोघांच्या नजरेत एक तीक्ष्ण चमक उमटली. त्याने तिच्या नजरेला नजर भिडवत गहिवरून म्हटलं,“I Love You….” त्याचवेळेस भक्तांनी हळदीचा भंडारा उधळ्ण्यास सुरुवात केली. मनी मल्हार त्या भंडाऱ्याच्या सोनेरी रंगात पूर्ण न्हाऊन गेले. तिला आता चालताना त्रास होत होता हे मल्हारने पाहिलं आणि तिला आपल्या बाहुपाशात उचलून घेत तो गडाच्या पायऱ्या उतरु लागला.


मनी त्याचा भंडाऱ्याने सजलेला सोनेरी चेहरा पाहत त्याच्या हृदयाचे ठोके जोरात पडताना अनुभवत होती. ती त्याच्या बाहुपाशात विरघळत होती. इतक्यात तिचं लक्ष त्या दोघांना शोधत पुन्हा गडावर येणाऱ्या चिऊकडे गेलं. तिने मल्हारला इशारा करत चिऊ येताना दाखवलं आणि म्हणाली,“प्लीज सोड..आता. खूप ईशु होईल!”

त्याने तिला अलगद खाली उतरवत… तिचा हात हातात पकडला. ती हळूवार पाय उचलत चालण्याचा प्रयत्न करु लागली.

(मनी मल्हार दोघांना एकमेकांच्या हातात हात घातलेला पाहून चिऊला पहिल्यांदा तिच्या जिवलग मैत्रिणीबद्दल जेलसी फिल झाली… तिने दोघांनाही सळेंच्या नजरेने पाहिलं.) पण तरीही त्या फिलिंग्सकडे दुर्लक्ष करुन ती दोघांनाही संयमाने म्हणाली, “ कुठे होता दोघे..! आम्ही केव्हापासून शोधतोय तुम्हाला….?”

मनी म्हणाली, “अगं…आम्ही रस्ता चुकलो होतो.”

चिऊने काळजीच्या स्वरात विचारलं,“ तू अशी का चालतेस….?”

मनीने वेदनेच्या स्वरात म्हटलं, “गड उतरताना जरा पाय मुरगळला होता. आत ठीक आहे.”

चिऊने हुंकार दिला. दोघांना “ok. चला..!” म्हणत थोडी पुढे निघून आली.

मनीने चिऊसोबत निघताना मल्हारने तिचा पकडलेला हात सैल करत… तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

मनीने त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावरचे भाव ओळखून त्याच्याजवळ जात भंडाऱ्याने सजलेले दोन्ही हात दाखवत हलक्या प्रेमळ स्वरात म्हणाली, “हे बघ. देवाने तुझ्या प्रेमाची हळदच लावली…”

(त्याने मान वळवून गडाकडे पाहिलं. मुख्य व्दारातून गड उतरताना त्याच्या मनात प्रेम आणि भंडारा उधळणीतला क्षण बॅकस्पिन करत आठवला. त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. पुन्हा त्याने मान वळवून मनीकडे पाहिलं. दोघांच्याही सोनेरी चेहऱ्यावर चंदेरी हास्यकोर उमटली आणि तिघेही आयुष्याच्या पुढील परतीच्या प्रवासाला निघाले…)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance