किशोर राजवर्धन

Romance

5.0  

किशोर राजवर्धन

Romance

मनी मल्हार #1

मनी मल्हार #1

4 mins
1.0K


(1)

संघर्षी आणि रुपिका दोघीही जिवाभावाच्या मैत्रिणी…नाही नाही…! मैत्रिणी कसल्या सख्या बहिणी जणू… कॉलेजचा कट्टा त्यांच्याशिवाय पूर्ण होत नव्हता..आठ-दहा मुलींच्या ग्रुपची जान होत्या. नाटक , सिनेमा, कॅफे, मॅक डी…., समुद्र किनारी फिरणे , पावळ्यात स्वच्छंद हिरवाईत बागडणे मनसोक्त आयुष्य जगणे हा त्यांचा छंद होता.. ह्या ग्रुपची एक खास वैशिष्ट म्हणजे सर्व मुलींच एक टोपण नाव ठरलेलं होत. प्रत्येकीच्या स्वभाव व आवडीनुसार त्यांनी ते नाव स्विकारल होत. रुपिकाला मांजर खुप आवडायच्या, कधी-कधी तर रस्त्यावरून जाताना कोणतीही मांजर तिच्या पायात येऊन घुटमळाची मग रुपिका लाडाने तिच्या वरून हात फिरवाची त्यांना जवळ घ्याची आणि त्या पण लाडात तिच्या कुशीत यायच्या म्हणून सर्व मुली तिला “मनी” म्हणतं. तर संघर्षीचा आवाज चिमणी सारखा. ती अभ्यासात हुशार असल्यामुळे आणि कधी-कधी ग्रुप मध्ये एखाद्या विषयावर न थांबता बोलायची. कुणालाही बोलू द्यायची नाही. सारखी चिऊ-चिऊ करायची म्हणून तिला सर्व मुली “चिऊ” म्हणायचे. 

दोघीही ज्युनिअर कॉलेजपासुनच्या मैत्रिणी. दोघींच्याही आवड-निवड सारख्याचं. प्रत्येक गोष्ट शेरींग करायच्या ग्रुप मधल्या मैत्रिणी मस्करी करत म्हणायच्या “ दोघीचं प्रेम जर एकच मुलावर जडलं तर… जमलं तुमचं…? ”

चिऊ जास्त भावनीक आणि हुशार असल्यामुळे गप्प राहायची. शक्यतो उत्तर द्यायला टाळायची.

पण मनी मात्र सर्वांना हसतं उत्तर द्याची “…हो….जसं ज्ञान शेरींग केल्यानं वाढतं. तसं प्रेम पण वाढतं …”

चिऊ बौध्द परंपरेत वाढलेली. तिचे वडील त्यांच्या परिसरातल्या बुध्द विहाराचे अध्यक्ष आणि राजकारणात नुकते पाऊल ठेवलेली नामांकित व्यक्तीमत्व होते. त्यामुळे बुध्द , महात्मा फुले , सावित्रीमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांच्या ग्रंथ संपदेतील बरीच पुस्तकं तिने मोकळ्या वेळेत वाचलेली असल्यामुळे ती त्यांच्या आधुनिक विचारांचा वारसा जपणारी होती. तिच्या सोबत राहून मनीला अपसूकच बुध्द , महात्मा फुले , सावित्रीमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल ख-या अर्थांने ते कळतं होते. तिच्या सोबत तिनेही काही ग्रंथ वाचले होते. जी पुस्तक लोक कधी ही घेण्याचा किंवा वाचुन त्यातील अर्थबोध प्राप्त करण्याच्या भानगडीत ही पडत नाहीत. ह्या वर्षी दोघीही बी.ए. शेवटच्या वर्षीत होत्या म्हणून चिऊने मनीला आणि सर्व ग्रुपला तिच्याकडे जयंतीला येण्याच आमत्रंण दिलं होतं. चिऊ मनीची जिवलग मैत्रीण आणि ग्रुपची आणं,बाणं,शाणं सर्वकाही असल्यामुळे मनी आणि सर्वजनी उत्साहात येण्यास तयार झाल्या.

आज चोहीकडे निळ्या रंगाची उधळण करत सूर्योदय ऊगवला होता. मुंबई निळ्या रंगाच्या निळाईत रंगुन निघाली होती. आम्हां भारतीयांना हेवा वाटावा असे विश्वरत्न , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती सोहळा साजरा करण्याकरिता ठिक-ठिकाणी वेगवेगळे सांस्कृती कार्यक्रम सुरु होणार होते आणि काही चालु होते. मुंबईच्या प्रत्येक चौका-चौकात, गल्ली-गल्लीत, नाक्यावर , रस्त्यांवर जागो-जागी महामानवाला अभिवादन देणारे पोस्टर्स झळाळत होते..

     संध्याकाळ होत होती.. तसे रस्ते जयंती सोहळा साजरा करण्यासाठी रंगी-बेरंगी दिव्यांच्या रोशणाईत लख-लखण्यास सुरुवात झाली होती. मल्हार स्टेजवर लॅपटॉपला DJ चे इन्सर्टुमेंट जोडत काळजी पूर्वक चेक करत होता. कारण त्याला आज खुप प्रयत्नांनी DJ ची ऑर्डर मिळाली होती. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत समारंभानंतर चेंबुर मधिल लेबर कॅम्प इमारतीच्या परिसरात सांस्कृती कार्यक्रम झाल्यानंतर डान्स सोहळ रंगवणार होता….

चिऊने मोबाईल वरुन कॉल केला… “ Hello…! मनी…. म्याऊ……!”

 “अगं..कुठे आहेस..? निघालीस का…?”

 “मी वाट बघते..म्याऊ… तुझी…! ”

“स्टेशनला आल्यावर कॉल कर….. मी येते घ्यायला तुला… ”

मनीने ड्रेसवर ओढणी घेत एका हाताने ओढणी व्यवस्थित करत चिऊला म्हणाली “ चिऊ..अगं किती.. प्रश्न विचारतेस….” “मी बोलू का..?” इतक्या्त चिऊ मोबाईलवर बोलताना शांत झाली..

“मी निघाले आताचं...आणि मी काय पहिल्यांदा येते का तुझ्या घरी चिऊ..! उगाच नको तिथे काळजी करतेस… ”

 “आपली गँग कुठपर्यंत आली….”

चिऊने आरशात पाहतं लिपस्टीक ओठांवर लावत.. म्हणाली

 “पोहचतील सगळ्या..तुच उशीरा येतेस….”

मनीने सॅन्डल घालतं…. “ओके…” म्हणतं कॉल ठेवला..आणि चिऊच्या घरच्या दिशेने निघाली..

प्रमुख पाहुण्याचा आदरतीर्थ समारंभ नुकताच पार पडला होता आणि त्यांनी भाषणसभा उरकून विश्वरत्न , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन ते पुढील कार्यक्रमासाठी निघुन गेले…

मल्हारने DJ सुरु केला. तसं DJ च्या तालावर सर्वजण डान्स करण्यात मग्न झाले…चिऊने वेगवेगळ्या फुलांच्या तरुण कोवळ्या कळ्यांनसोबत डान्सच्या घोळक्यात प्रवेश केला. तिने डान्सच्या तालात मल्हारला उजवा हात वर करुन थम्सअप केलं… मल्हारनेही तिला तसचं थम्स अप करत DJ वर पुढच गाणं घेण्यासाठी कन्ट्रोलबोर्डवर बोटे वळवली…..…चिऊ आणि तिचा ग्रुप मल्हारच्या DJ तालावर बेधुंद होऊन डान्समध्ये रमला होता. मल्हार त्या सर्व तरु्ण यौवनात पदार्पण केलेल्या कळ्यांनकडे अधुन-मधुन कटाक्ष टाकत होता. त्या कळ्या DJ च्या तालात वेल्हाळ होऊन नाचत होत्या. त्याची नजर मध्येच एका नाजुक सोनचाफ्याच्या कळीवर येऊन थांबली….डान्सकरत असताना मनीच लक्ष अकस्मातपणे स्टेजवर असलेल्या मल्हारकडे वळली…DJ च्या तालात गाण्याच्या आवाजात मनी मल्हारच्या तरुण मनामध्ये किक हार्डची धडधड वाढत एकमेकांनसोबत बीट मॅच करत होती.. मनी मल्हार दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं..आणि दोघांच्याही चेह-यावर हास्याची स्मितचंद्रकोर उमटली….तेवढ्यात मनीचं लक्ष अशुच्या हातातील घड्याळाकडे गेलं….

 रात्रीचे 10:00 वाजले होते. घरी निघण्यासाठी तिने चिऊला आणि अशुला इशारा केला… मनी चिऊला म्हणाली “मी निघते…! खुप उशीर होईल घरी पोहचायला… ”

चिऊ म्हणाली “ ठिक आहे..! थांब मी येते तुला स्टेशनपर्यंत सोडवायला…..”

मनीने मान हलवतं होकार दिला…आणि ती चिऊसोबत डान्सच्या कल्लोळातून बाहेर जाण्यासाठी मार्ग काढत असताना तिने मागे वळून स्टेजवर मल्हारकडे पाहिलं… त्याच्या माथ्यावरचा निळा टिळा घामाच्या दवबिंदुनी भरला होता…. गळ्यात निळे हेडफोन डूलत होते. एलईडीच्या डिस्कोच्या प्रकाशात त्याचा चेहरा प्रकाशमान झाला होता. अलगद तिची नजर पाठी काळोख्या नभात गेली… मल्हार स्टेजवर असल्यामुळे नभात चांदण्याराती उगवलेली चंद्रकोर त्याच्या कुरुळ्या केसांच्या झुबक्यावर पाढं-यारंगांने तेजून आलेली पाहिली….आणि मनी चिऊला सोबत घेऊन ग्रुपला बाय करत निळकंठ मल्हाराच्या गर्द निळ्यारंगीत प्रेमात, डान्सच्या कल्लोळातून घरी जाण्यासाठी बाहेर पडली….



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance