मनाची स्वच्छता
मनाची स्वच्छता
स्वच्छता, निर्मळता, प्रसन्नता, मानवाच्या विचारांसह परिसरातून ही झळकते.
किती सुंदर शब्द आहेत, स्वच्छ, निर्मळ, प्रसन्न वाचूनच खूप छान वाटते. ज्या व्यक्तींचे विचार स्वच्छ आहेत, मन अगदी निर्मळ आहे आणि सदा प्रसन्न चित्त असते अशा व्यक्तींचा सहवास नेहमी आनंदी, समाधानी असतो. तसाच त्याचा परिसरही नेहमी स्वच्छ असतो. त्याच्या परिसरातूनच विचारांची सुंदरता झळकत असते.
आपण आपल्या मनात दुसऱ्या विषयी चांगल्या भावना ठेवून असलेला मळ काढून टाकावे, जसे परिसरातील घाण काढून टाकतो. दूषित विचारांपासून स्वतःला नेहमी दूर ठेवावे, जसे आपण आपल्या अवती भोवती नेहमी स्वच्छता ठेवतो. मनाला व इतरांना नेहमी प्रसन्न व हसतमुख ठेवावे जसे आपण आपला परिसर ठेवतो.
सुंदर परिसर व सुंदर मन हे एकमेकांवरच अवलंबून आहे जसे परिसराची सुंदरता मानवाला आकर्षित करून घेते तसे विचारांची सुंदरता ही मानवाला समाधानी बनवते.
रमेश आणि श्याम नेहमी, दोघे परिसर स्वच्छते वरून भांडण करत असायचे. परंतु ज्यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींचे विचार ऐकले त्यावेळी त्यांना कळून चुकले की फक्त परिसरच स्वच्छ ठेवायचा नाही तर मन देखील दूषित विचारांनी काढून चांगले विचार जोपासणे हे देखील महत्त्वाचे आहे. थोडक्यात म्हणजे रमेश आणि श्यामचे जसे विचार बदलत गेले तसे त्यांची राहणीमान देखील बदलत गेली.
