Lata Rathi

Drama Inspirational

3  

Lata Rathi

Drama Inspirational

मला भेटलेली पावसातील ‘ती’

मला भेटलेली पावसातील ‘ती’

3 mins
728


प्रत्येकच पहिली गोष्ट आपल्या स्मरणात राहते, हो ना!

आणि ते पण भर पावसातलं मन चिंब चिंब करणारं.... पण माझं मन सुद्धा चिंब चिंब झालंय, बालसुलभ खेळण्याच्या वयात जबाबदारीने काम करणं हे पाहून.


अशीच एका पावसाळ्याच्या दिवसात ‘ती’ मला भेटली.

सतत दोन दिवस झाले, सतत पाऊस कोसळत होता. तशी पावसाची आवश्यकता होतीच म्हणा. कारण त्यामुळेच तर उन्हामुळे त्रस्त झालेली वसुंधरा तृप्त होणार होती. 

   

काल खूप पाऊस होता, म्हणून ऑफिसला दांडी मारून छान गरम गरम कांदी भजी आणि अद्रक टाकून वाफाळलेला चहा घेऊन मस्तपैकी टीव्ही वरील जुना सिनेमा बघितला.

पण आज मात्र ऑफिसला जाणं खूप गरजेचं होतं. पाऊस अजूनही कोसळत होताच. 


मी गाडी काढली आणि निघाले त्या बेधुंद कोसळणाऱ्या पावसातून... रस्त्यावर पाणीच पाणी आणि सोबतीला बेधुंद हवा. वर काळे काळे ढग, मधेच विजांचा चमचमाट.... जणू काही धरती आणि आकाशाचे मिलन होणार.... असा माझा प्रवास सुरु होता. 

   

मधेच एका सिग्नलजवळ गाड्यांची लांडसडक रांग होती, विचारपूस केल्यानतंर कळलं, ऑइल घेऊन जाणाऱ्या टँकरला ट्रकने धडक मारली.... झालं.... रस्ता जाम..... दोन तास तरी नक्कीच ऑफिसला उशीर होणारच....


ऑफिसला कळवावे, कॉल करावं म्हणून गाडीची काच खाली सरकवली, कॉल करून परिस्थिती सांगितली...

  

बाहेर बघत असताना एका दुकानाच्या टिनाच्या शेडखाली नऊ दहा वर्षांची, निळ्या रंगाचा फ्रॉक, ठिगळ लावलेला, पण स्वच्छ फ्रॉक घातलेली मुलगी धावत धावत हातात प्लॅस्टिकची पिशवी त्यात काही गुलाबाची फुलं आणि मोगऱ्याचे गजरे घेऊन आली.


"दीदी, ले लो ना, फूल और गजरा... अपने बालो में लगाना बहोत सुंदर दिखोगी... सिर्फ 10 रुपये का हैं। 

लेलो ना दीदी! कम लगा दुंगी...”


कदाचित यावरच तिची आणि तिच्या परिवाराची गुजराण होत असेल, म्हणून तर एवढ्या पावसातसुद्धा काम करतेय...


मी नि:शब्द... फक्त तिच्याकडे बघत होते, किती लहान पोर... खेळायच्या, बागडायच्या वयात ही पोर काम करतेय.... खरंच परिस्थिती काय काय करविते.

 

तिने माझ्या हाताला हलवून मला माझ्या तंद्रीतून जागं केलं.

किती अगतिकतेने ती बोलत होती, आपल्या डोक्यावरून गालावर पडणाऱ्या थेंबांना ती आपल्या फ्रॉकच्या बाहीने पुसत होती.  


मी तिला आत घेतलं, 

विचारलं - शाळेत नाही जात तू?


ती - कहा दीदी, हम लोगो को स्कूल जानेको टाईमच नहीं मिलता।

घर में मां बीमार है। और तीन छोटे बहन भाई हैं। बापू रिक्षा चलाते है।

समय मिला तो थोडा पढ लेते है...


मी - रोज कितने कमा लेती हो।


ती - मिल जाते है जी कभी, पचास, तो कभी सौ भी.... फुलवाले को भी पैसा देना पडता है, तभी वो दुसरे दिन फूल देता हैं... दीदी लो ना, कुछ.... और भी घुमना हैं


मी - असं कर दहा फूल आणि दहा गजरे दे...


ती - साची दीदी...इतने दे दुं... मजाक तो नहीं कर रहे!


मी -  नहीं नहीं... साची... दे दो...


तिने लगेच दहा गुलाबाची फुलं आणि दहा गजरे दिले. 


दीदी आज हम जलदी घर जायेंगे, हमरा छोटा बबुवा है ना, उसको केक खिलायेगे....

   

तिच्या चेहऱ्यावरवरचं हसू अन समाधान मला खूप काही देऊन गेलं, ते शब्दात व्यक्त करणं कठीणच....

मी तिला 200 रुपये दिले आणि 100रुपये जास्तीचे बक्षीस म्हणून देऊ केले, पण तिने ते नाकारले... 


नहीं दीदी, जितने का हुआ, उतना ही दो, एक बार आदत लग जाये तो हम मेहनत करना भूल जायेंगे....


दोनशे रुपये घेऊन ती धावतच गेली... कदाचित परत फुलं आणि गजरे आणण्यासाठीच...

   

तोपर्यंत रस्ता खुला झाला होता. मी ऑफिसमध्ये पोहोचली, जाताच आपल्या सहकारी बंधू-भगिनींना फुल आणि गजरे दिले. 


मैत्रिणी- अरे बापरे! (गमतीने) आज काय तू घरचा बगीचाच उचलून आणलाय की काय?


मी - नाही गं! (पूर्ण स्टोरी सांगितली)


खरंच मैत्रिणींनो तुम्ही पण असं कधीतरी करा... आपण आपल्यासाठी तर नेहमीच करतो, कधीतरी यांच्यासाठी जगून पाहा.... खूप समाधान मिळतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama