मी सक्षम आहे
मी सक्षम आहे


आज माझ्या हातात असलेलं "बेस्ट एम्प्लॉइ ऑफ द इअर मेडल" केवळ माझ्या आईमुळे. मी किन्नर असल्याने आतापर्यंत मला लोकांच्या नजरेत माझ्यासाठी केवळ तिरस्काराची भावना दिसत होती. सुरुवात माझ्या घरापासून झाली होती.
मला स्वीकारायला नकार दिला, त्याचदिवशी आई मला घेऊन घराबाहेर पडली. अतोनात कष्ट घेत, पदोपदी मला साथ देऊन, खूप शिकवून मला मोठं केलं. समाजात मला सन्मान मिळवून दिला. त्यामुळेच आज मी इतक्या मोठ्या हुद्यावर आहे. त्यावेळी माझी आई सक्षम होती माझ्यासाठी, माझ्या नशिबाला घडविण्यासाठी.
आज तीच प्रेरणा घेऊन मी सक्षम आहे,
उद्या माझ्याचसारख्याला दत्तक घेऊन,
त्यालाही सक्षम बनवणार दुसऱ्यासाठी...
आजही मला माझ्या आईचे वाक्य आठवते,
"मी सक्षम आहे... त्यालाही करणार..."