मी सैनिक भारत मातेचा
मी सैनिक भारत मातेचा
मला न कशाची तमा
न लवलेश कुठल्या भीतीचा
ऊन, पाऊस, ना दऱ्याखोऱ्या
मी सैनिक भारत मातेचा ll1ll
सदैव हातावर शीर घेऊन
फडशा पाडून शत्रूचा
इंच ही ना देणार कुणाला
असा पुत्र मी भारत भू चा ll2ll
हे भारत भू सांग मजला
कसे फेडू हे पांग तुझे
जीवनातल्या श्वासात तू
ध्यानी मनी स्वप्न तुझे ll3ll
चिरडून टाकीन मी त्याला
जो हात घालील तुझ्या अस्मितेला
शेवटचा रक्ताचा थेंब ही तुझ्याचसाठी
प्रणाम या सैनिकाचा भूमातेला ll4ll
