होय ! खरंच आहे मी खास
होय ! खरंच आहे मी खास
होय खरंच आहे मी खास
माझ्या स्वतःसाठी , माझ्या कुटुंबियांसाठी
माझ्या मित्र-मैत्रिणींसाठी आणि
माझ्या माझ्या जगाच्या अस्तित्वासाठी
जिवंत खळखळणारा झरा आहे
म्हणून खरंच आहे मी खास
प्रत्येक अडचणींवर मी मात करते
कधी स्वतःशी तर कधी जगाशी लढते
कधी हसते , कधी रुसते, कधी धडपडते तरीही
विजयाचा आनंदोत्सव मी सतत साजरा करते
अशी धडपडतच बनलेय मी खास खरंच मी आहे खास
झेलून असंख्य वार
वेळ पडल्यास पचवावे ही लागले अपमान
योग्य असूनही अयोग्य आणि अपात्र ही ठरवले कोणी नाही डगमगले कोणत्याही परिस्थितीत मी
अशीच निर्भीड होऊन बनलेय मी खास
झाले मी कवच माझ्या कुटुंबासाठी
त्यांच्यावरचे वार झेलत होते मी माझ्या छातीवरती अनैतिक, लादलेली बंधने, झुगारले मी
बेगडी प्रथांच्या जोखडा मधून बंड पुकारले मी ती
पाय रोवून उभी राहिले म्हणूनच बनलेय मी खास
माझ्यातील ' स्त्री ' ही दैवी असीम शक्ती
आहे नक्कीच खास, अन् त्यातच दुर्गा कालीची भक्ती प्रतिकूल परिस्थितीवर
मात करून निर्भयपणे जगण्याचे सामर्थ्य हीच माझी दैवी शक्ती
या शक्तीचे मिळाले आहे वरदान म्हणूनच मी बनले खास
अनंत उर्जा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यांनी बनले मी खास
खरंच मी आहेच खूप खास !
