Ujwala Rahane

Inspirational

3  

Ujwala Rahane

Inspirational

"मी धारावी बोलतेय"!..

"मी धारावी बोलतेय"!..

4 mins
229


नमस्कार, 

    मी धारावी बोलतेय!.. काय म्हणताय, ओळख आहे ना माझी? आहो या कोरोनाच्या काळात खुपच प्रसिद्धीच्या झोतात आले होते. एक तो काय, कोरोना पॉझिटीव्ह सापडला माझ्या कुशीत, आणि माझ्याकडे बघायचा दृष्टीकोनच बदलला हो तुमचा!.. तशी थोडी फार प्रसिद्धीच्या झोतात मी कमीच, मुंबईतील एक अडवळणी वळणावर मी राहते. सायन आणि माहिम या दोन स्टेशनाच्या मध्ये छोट्याशा भागात. 


 झोपडपट्टी साठी प्रसिद्ध हे लेबल माझ्या कपाळावर चिटकवलयं आणि हो मी ते अभिमानाने मिरवते नक्कीच! माझ्या कुशीत जे लेकरू येते त्याचे पालकत्व मी स्विकारते. मग जात धर्म प्रांत, उच्च, निच याचा विचार माझ्या मनाला शिवत नाही. माझ्या कडे मदतीचा हात जो मागेल त्याची मी अन्न व निवाऱ्याची सोय नक्कीच करते. फक्त कमवा व खा हा नियम मात्र मी सर्वापरी लागू करते. 


   दाटीवाटीने का होईना पण आसरा मी नक्कीच देते.माझ्या कडे येणारा अतिथी खाली हात येतो पण कष्टाचे धडे माझ्या घरातच घेतो. यशाची थैली भरतो आणि कष्टाची मीठ भाकरी खाऊन आनंदाने रात्रीची निद्रा शांत पणे घेतो. आपल्या अंगणात हेच तर आनंदाचे झाड तो लावतो. येणाऱ्या फळाची देवाणघेवाण आपापसात नक्कीच करतो. 


   तर अशी मी धारावी. अचानक या कोरोना सारख्या संकटाने मला का हेरावे? असो कोरोना संकटामुळे मी अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आले. हे माझे सुदैव म्हणू कि, दुर्दैव? कारण जो तो माझ्याकडे संयशीत नजरेने पाहू लागला. पण मी लढले घाबरले मुळीच नाही. कारण मी जमवलेला मायेचा पाश माझ्या पाठीशी उभा होता. कोरोनाशी सामना करायला.  


    एक साधीशी गोष्ट झाली हो!.. माझ एक लेकरू, हातावरचे पोट हो त्याचे, रोजच्या प्रमाणे रोजी रोटीसाठी बाहेर पडले.आपले नेमून दिलेले काम ते बिनदिक्कत पार करत होते, अचानक कोरोना ने बरोबर त्यालाच हेरले आणि त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांने माझ्या हद्दीत प्रवेश केला. आणि सगळीकडे हाहाकार झाला. धारावीत कोरोना शिरला. खरे सांगू साधीभोळी माझी लेकरं,घाबरून गेली हो! घाबरले होते पण हार नक्कीच त्यांनी पत्करली नव्हती. 


  एकमेकाच्या सहकार्याने कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी लढायला ते सज्ज झाले. मी एकच सांगीतलं होतं त्यांना लढायचे आणि आपल्या लढ्यात सहभागी असणाऱ्या, प्रत्येक योध्दयाला सहकार्य करायचे. सांगितलेल्या सुचनांचे पालन करायचे. माझ्या शब्दांच्या बाहेर कोणीच नव्हतं. सगळेच सगळ्यां नियमांचे पालन करत होती. 


   प्रसंगी जे मिळेल ते खात होते. नाही मिळाले तर चुपचाप घरात बसतं होते. फक्त एकच ध्येय आपली माय यातून वाचलीच पाहिजे. माझ्या लेकरांचा आत्मविश्वास प्रशासन वाढवत होते. संकटावर संकटे आ वासून ऊभी होती. परिस्थितीनुसार शासन परीसराचा झोन बदलत होते. लोकांची रोजी रोटी बंद, अत्यंत दाटीवाटीने पण एकोप्याने राहणारी माझी लेकरं इतके एकजीव होते म्हणून सांगू! एकाच्या घरात काय चालले आहे हे सहज दुसऱ्याच्या घरात ऐकू येईल आशी यांची वस्ती, पण तो सुसंवाद हरवला होता. यांना परत सुसंवादीत करणं प्रशासनासमोर एक आव्हान होतं. पोलीस सर्व गेट सील करत होते. वैधकिय व आपत्कालिन परिस्थितीत महापालिकांच्या गाडीतून लोकांना बाहेर घेऊन जाण्यात येत होत.


 नागरिकांना पालिकेकडून जेवणाची पॅकेट्स पुरवण्यात येत होती. लोकांची सर्वतोपरी मदत केली जात होती हे मी सुन्न नजरेने पाहत होते. प्रशासनाने केलेले माझ्यावरच्या उपकाराची मला जाण होती. प्रशासन नक्कीच नागरिकांचा आत्मविश्वास वाढवत होते. डॉक्टर व परिचारिका आणि प्रशासन यांचे अथ्थक प्रयत्न मी डोळ्यांनी पाहिलेत.त्यांना माझ्या लेकरांनी सहकार्य केले हि पण माझ्या साठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. 


   खरे सांगते, आमची सहकार्याची भावना पाहून चोविस डाॅक्टरांचा ताफा रात्रंदिवस आमच्या सेवेस हजर झाला. अगदी जिवावर उदार होऊन आले होते हे डॉक्टर आमच्या मदतीला धावून, त्यांची आमच्या प्रतीची भावना पाहून अक्षरशः त्यावेळेस मी एकटीच धाय मोकलून रडले होते. पण परत प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते कि, आमचे सहकार्य त्यामुळे त्यांना मिळणारे यश पाहून अचानक या डॉक्टरांच्या संख्येत वाढ झाली आणि विश्वास बसणार नाही एकदम साडेतीनशे डाॅक्टरांनी धारावीतील कोरोनाचे चॅलेंज स्वीकारले. अविरत कामाला लागले. खरच सलाम त्यांच्या कार्याला!.

  

अचानक चमत्कार गत पेशंटची संख्या घटू लागली. खरच यश पदरी पडलं आणि धारावी कोरोनातील केसेस कमी झाल्या. याचा मला आभिमान आहे कोरोना शेवटी हतबल झाला. धारावीतून त्याने काढता पाय घेतला. 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती " परमेश्वरा कडे देर आहे लेकिन अंधेर नही, खरच दिशा तो वरचा दाखवतो कोणत्यान् कोणत्या रूपात येऊन. पण योग्य मार्ग आपल्याला निवडायचा असतो हे निश्चित. 


हे आता कळलंय माझ्या लेकरांना. गरीब आहेत पण लाचार नाहीत.तुम्ही एक मदतीचा हात पुढे केला तर अजन्म तुमचे ते ऋणी राहतील याची मला खात्री आणि विश्वास आहे. परत तुमच्या विश्वासावर मी ऊभी राहते आहे. तुमचे आशीर्वाद, सहकार्य व प्रोत्साहन माझे मनोबल नक्कीच वाढवेल. लघुउद्योगाची हि नगरी आपले आभार मानते आहे. वस्तीतील संस्था, राजकीय पक्ष, प्रशासन, डॉक्टर, याचा मला मोलाचा आधार मिळाला. या सर्वांच्या सहकार्याने व तुमच्या विश्वासावर मुंबईच्या महानगरीच्या आणि बाजारातील गरजा अखंड पुर्ण करण्यासाठी मी सज्ज आहे. मुख्य म्हणजे शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून, आता फक्त अपेक्षा तुमच्यातला माझ्या प्रतीचा विश्वासाची!.


   परत घेऊन ऊभी आहे तुमच्या व्यक्तीमत्वाला साजेश्या लेदर पर्सेस, बॅगस् आणि जॅकेट निर्यातीसाठी. त्यासाठी शर्टाची खरेदी नक्कीच माझ्या वस्तीतूनच होईलच बरोबर ना? माझ्या नगरीची महती मी आधीच सांगितली इथे प्रांताप्रातांतील खाद्य संस्कृती पण गुण्यागोविंदाने आरामात आणि माफक दरात तुमची पोटपुजा करते लक्षात आहे ना तुमच्या? परत पर्यटकांच्या यादीतील माझा नं. अव्वल आहे आणि तो अव्वलच राहणार. हे सगळे तुमच्या विश्वासावर द्याल ना साथ?


कायम तुमच्या ऋणात बांधलेली 

   तुम्हाआम्हा सर्वांचीच, 

     "धारावी धारावी"


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational