STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

2  

Sarika Jinturkar

Inspirational

मी अनुभवलेली माणुसकी

मी अनुभवलेली माणुसकी

2 mins
143

हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे 🙏🙏

माणसाने माणसाशी माणसासम वागणे......  


या गीताच्या ओळी कानावर पडल्या की वाटत माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी पैसा, संपत्ती, स्वार्थाहून श्रेष्ठ आपण केलेले सत्कर्म आणि माणुसकी हाच खरा धर्म..🙏


 खरंच आहे माणुसकी जगायला शिकलं की हृदय आपोआप जोडली जातात, मन जिंकता येतात, नाती आपोआप बहरतात... आपल्या आयुष्य बघितलं तर तसं खूप साध व सोप आहे... आपण ते कठीण केल आहे पैसा झाला मोठा आणि माणुसकी झाली आहे दिन... प्रेम, आपुलकी सगळेच केव्हाच गेलय हरवून तत्त्व, आदर्श सगळेच बसलो आहे आपण गमावून😌


माणुसकी ही सद्यस्थितीत हरवत चाललीय. सर्वत्र नसली तरी कुठे ना कुठे आपल्याला ती नक्कीच दिसते विसरत चाललेल्या माणुसकीचे दर्शन अधून-मधून कुठे ना कुठे घडते.. दैनंदिन जीवनात मी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अनुभवलेली माणुसकी..आज या लेखातून इथे सांगण्याचा प्रयत्न करते...  


मला तर वाटते माणसाला मिळालेली सर्वोत्तम भेट म्हणजे माणुसकी ज्यामुळे इतर जीवसृष्टी पेक्षा आपल्याला एक उच्चतम स्थान मिळते. आपल्या दैनंदिन जीवनात वावरत असताना आपण कितीतरी माणुसकीचे चांगले वाईट अनुभव हे घेतच असतो..मला घडलेले माणुसकीचे दर्शन 

 कुटुंबात गप्पा रंगताना, एखाद्या कार्यप्रसंगी तुम्ही-आम्ही असे न बोलता आपण एकच आहोत असे बोलण्यात माणुसकी दिसते. एखाद्या कठीण प्रसंगात देवासारखं धावून येणाऱ्या माणसात माणुसकी दिसते. लहानशा संसारात भुकेने व्याकूळ असलेल्या दोन घास मिळावे यासाठी धडपड करणाऱ्याला दिलेल्या आपुलकीच्या स्पर्शात सुखद क्षण, मिळताच माणुसकीचा हात निरागस हास्य जेव्हा ओठी उमटते तेव्हा त्यात माणुसकी दिसते ☺️अडचणीत असणाऱ्याला कुठलीही परतफेडीची अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता मदत करण्यात माणुसकी दिसते  


लॉकडाऊनच्या काळात रस्ताने हजारो किलोमीटर पायी जाणाऱ्या मजुरांना जेवण्याची सोय, आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस, डॉक्टर कर्मचारी यांना आवश्यक किंवा साधा अल्पोहार चहा पाण्याची केलेली सोय, सद्यपरिस्थितीत अस्वस्थ झालेल्या ज्येष्ठांना आत्मविश्वास,  

बळ देऊन सगळं ठीक होणार याची दिलेली ग्वाही पाय ठेवायलाही जागा नसताना गर्दीत काही ठिकाणी होतात वाद, त्या गर्दीत सहज "जाऊ, द्या ना भाऊ,ताई म्हणून काहीजण मिटवतात वाद खर तर इथेच घडत माणुसकीचं दर्शन आणि हीच असते खरी आनंदाची बाब☺️


अशा कितीतरी गोष्टी... 

 स्वत्व सांभाळून समोरच्याचे अस्तित्व जपणे,

 स्वाभिमान जपून दुसऱ्याला आदर देणे 

विचारांच्या मूल्यांना भावनेची जोड देणे 

हळव्या क्षणांना मायेचा स्पर्श देणे

 अलवार दाटलेल्या धुक्यात 

 कधी वाट दाखवणे  

यालाच तर म्हणतात माणसाने माणसाशी

 माणुसकीने वागणे..

 निस्वार्थ सेवा हीच खरी ईश्वर सेवा

 स्नेह, प्रेम, माया, मैत्री.... पक्षी प्राणी यांच्या विषयी असावी थोडी भूतदया

 नात जगाशी, नात निसर्गाशी नातं मनाचे प्रत्येक मनाशी, असावी हृदयातून परस्पर विषयी आपुलकी

 हीच तर खरी असते माणुसकी

जगू या थोडं माणुसकीसाठी अनामिक त्यांच्या सुखासाठी

 माणुसकी बोलली जात नाही ते कृतीतून दिसते जिथे माणूस माणसाशी प्रेमाने वागतो तिथेच तिही वसते😊 


खरं काहीतरी थोडं स्वतः करून पहाव

 जाताजाता प्रत्येकाने माणूस 

म्हणून जगावं  

"मडक्यासाठी पाणी की पाण्यासाठी मडकं...?"

 आहोत एकमेकांसाठी अनुभवांती शिकून घ्यावं  

आज आहे उद्या नाही सारे असतेच असे नाही 

अवघा आहे ठेवा माणुसकीचा

 शेवटी काही उरत हाती नाही  

म्हणूनच जसा जमेल तसा धर्म निभावावा माणुसकीचा 

आपल्या परीने उचलावा वाटा जरासा खारीचा🙏 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational