महानायक
महानायक
मी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनातील जीवनावरील महानायक नावाची विश्वास पाटील लिखित कादंबरी वाचली. जवळजवळ ही कादंबरी वाचून मला बारा ते पंधरा वर्षे झाली असतील, परंतु आजही ती बर्यापैकी लक्षात आहे. सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनाचे अनेक पैलू ,त्यांची दूरदृष्टी, त्यांची धाडसी वृत्ती यातून दिसून येते. एका प्रतिष्ठित आणि सुखवस्तू घरात जन्माला येऊन देखील त्यांनी देशासाठी काट्या चा रस्ता निवडला. त्यांचे आई वरील प्रेम ,घरातील वातावरण , आणि इंग्रजांच्या नजरेत धूळ फेकून परदेशात जाणे काही सोपी गोष्ट नव्हती.
त्यासाठी बेमालूम वेषांतर करणे त्यांची खासियत होती.
काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची दोन वेळा बिनविरोध निवड झाली होती परंतु गांधीनी त्यांना डावलुन नेहरुंना अध्यक्ष केले देशावरती अत्युच्च कोटीचे प्रेम सुभाष बाबूच करू शकतात .
"शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" या न्यायाने ज्या काळात महात्मा गांधी दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने लढा मग ते आपल्याला स्वातंत्र्य देतील असे सांगत होते त्याच वेळी हिटलर सारख्या माणसाशी देखील हातमिळवणी करून इंग्रजांच्या साम्राज्याला बाहेरून धक्का देण्याचे मनसुबे सुभाष चंद्र बोस रचत होते .
त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्य देखील घडवून आणले, त्यांच्याबरोबर सर्व जातीधर्माचे शिपाई होते. त्या काळामध्ये स्त्रियांची पलटण उभी करणे तिला "राणी लक्ष्मीबाई "नाव देणे ही काही सर्वसामान्य गोष्ट नव्हती . पण सुभाषबाबूंनी करून दाखवले .
नुसतेच सत्याग्रह आणि मोर्चे यापेक्षा स्त्रियांच्या हातात हत्यारे देऊन त्यांना रणरागिणी म्हणून सिद्ध केले. त्यांच्या सुदैवाने भारतातून जर्मनीला जाताना ते सापडले नाही सहा महिने बाहेरची हवा माहित नाही सूर्यप्रकाश माहित नाही असा पाणबुडीच्या आतून त्यांनी प्रवास केला. अक्षरशः सहा महिन्याचा प्रवास केल्यानंतर सुभाष चंद्र बोस पांढरे फटक पडले होते आणि आजारी देखील पडले होते परंतु देशासाठी त्यांनी या साऱ्या हाल-अपेष्टा सहन केल्या. हिटलरच्या भेटीसाठी देखील त्यांना बराच काळ वाट पहावी लागली. असे ऐकून आहे हिटलरने त्यांना सांगितलं तुमच्या देशांमध्ये" शिवाजी" सारखा राजा झाला त्यांची नीती तुम्ही का वापरत नाही? तुम्ही गनिमी काव्याने लढा त्यानंतर ते जपान कडे गेले त्या काळातल्या जपानच्या पंतप्रधानांनी त्यांना मदत देखील दिली आणि त्यांच्या पहिल्यावहिल्या मंत्रिमंडळाला मान्यता देखील दिली. भारताचे पहिले पंतप्रधान हे सुभाषचं
द्रबोस आहेत खरोखर समांतर सरकार चालवणे रेडिओ स्टेशन उभे करणे. इकडे इंग्रज जंगजंग पछाडत असताना देशाबाहेरून रेडिओ वरती भाषण करून त्यांनी इंग्रजांना मंत्रिमंडळ स्थापन केल्याचे कळवले. स्वतःच्या नावाच्या नोटा नाणी काढली तेव्हाचा ब्रह्मदेश व आत्ताचे म्यामार देखील त्यांचे भव्य प्रमाणात स्वागत झाले. खरोखर एक मनुष्य बाहेर पळून देशाबाहेर जाऊन तिथून सेनेची बांधणी करतो आणि बाहेरून हल्ला करतो याला कितीतरी धाडस पाहिजे त्यांनी सैन्य कसे मिळवले? जे भारतीय सैनिक, इंग्रजांच्या बाजूने लढताना जर्मनीचे कैदी झाले होते त्यांनी तेच सैन्य इंग्रजांविरुद्ध उभे केले आझाद हिंद सेना उभी केली "होंगे कामयाब" यासारखे स्फूर्ती गीत आपल्याला दिले . सैन्यात चैतन्य निर्माण केले तीनी दलाची स्थापना केली त्यांचे प्रमुख नेमले आणि एक समांतर सरकार स्थापन केले.
निव्वळ निसर्गाच्या प्रतिकूल पणामुळे त्यांचा प्रयत्न फसला आणि इम्फाळ दिबांग या ठिकाणी आपले सैन्य रोगराईने आणि उपासमारीने मेले नाहीतर 1945 च्या दरम्यानच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते भारताची सीमारेषा पार करण्यासाठी आल्या सैन्याची किती हाल झाले ते कसे कसे जगले या गोष्टी या कादंबरीत कळतात या कादंबरीचे त्याकाळात अस्मिता रेडिओ वाहिनी येथे रोज सकाळी पावणे सातला अभिवाचन होत असे गांधीजींनी त्यांच्याबाबतीत केलेला दुजा भाव आपल्याला या कादंबरीत कळतो आणि अखेर सुभाषबाबूंचा मृत्यू हे आजही एक गूढच आहे तर त्यांच्या जीवनाचे पैलू यांचा विवाह आणि शेवटचा विमान अपघात आणि विमानात ते मेले किंवा नाही यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला या कादंबरीत कळतात. इंग्रजांना त्यांची एवढी दहशत होती ही जाताना पण ते नेहरू सरकारशी हा करार करून गेले होते की "सुभाषचंद्र बोस" कधी सापडले तर त्यांना इंग्रजांच्या हवाली करावे.
आपणाला स्वातंत्र्य मिळण्याचे सुभाष चंद्र बोस यांचे मोठे योगदान आहे जरी आजाद हिंद सेना तेव्हा हरली तिची वाताहत झाली पण त्यातीलच काही सैन्य भारतामध्ये पोहोचले सुभाष चंद्र यांच्या दैदिप्यमान कामगिरीची गोष्ट साऱ्या भारताला समजली त्यांच्या प्रेरणेने येथील सैनिकांनी असहकार पुकारला .सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध केले किंवा आलेल्या आजादहिंद सैनिकांवर हत्यार धरण्याचे नाकारले ज्या सैनिकांच्या जीवावर मुठभर इंग्रज आपल्या देशावर राज्य करत होते तेच सैन्य आपल्यावर उलटते म्हटल्यावर त्यांनी स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कादंबरीच्या नावाप्रमाणेच सुभाष चंद्र खरोखरच "महानायक "आहेत.