माता शैलपुत्री
माता शैलपुत्री
नवरात्र पहिली माळ
आजची देवी शैलपुत्री
शैलपुत्री म्हणजे पर्वताची कन्या शैल म्हणजे पर्वत .
या काळात योगी आपले मन मुलाधार चक्रात स्थिर ठेवतात तिथून त्यांची योगसाधना सुरू होते
तिचा मंत्र
ओम देवी शैलपुत्रे नमः
वंदे वांछितलाभाय चंद्रार्दकृत शेखराम
वृषारुढा शुलाधारा शैलपुत्री
यशश्विनीम्
या देवी सर्वभूतेषु मां शैलपुत्री रुपेण संस्थीता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
तिचे शस्त्र त्रिशूल आणि कमळ आहे
ती वृषभारुड आहे
आजचा नैवेद्य गाईचे शुद्ध तूप आहे
तिचे वाहन वृषभ किंवा बैल असल्यामुळे गाईच्या दुधापासून बनवलेली खीर मिठाई आजच्या नैवेद्यात चालते
तिच्या अंगावरती शुभ्र वस्त्र असते
कथा
कथा अशी आहे की प्रथम ती दक्ष प्रजापतीची मुलगी होती आणि दक्षाने एक मोठा यज्ञ केला त्यामध्ये सती आणि शंकर यांना न बोलावता इतर सर्व जावयांना बोलावले पार्वतीचे आदल्या जन्मीचे नाव सती
पार्वतीला मात्र वडिलांच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण लागत नाही त्यामुळे ती स्वतः न बोलावता शंकर तिला सांगत असतात जाऊ नको तरी पण ती आपल्या पित्याच्या घरी जाते तिथे गेल्यानंतर वडील आणि आई दोघेही तिच्याकडे दुर्लक्ष करतात थोडक्यात यज्ञात दिली जाणारी अवधाने शंकरांना देत नाहीत स्वतःच्या अपमानापेक्षा पतीचा अपमान सतीला जास्त झोंबतो
त्यावरती एका मराठी चित्रपटांमध्ये
उमा म्हणे यज्ञ माझं
जळालं माहेर
मायबाप बंधू बहिणी
दारिद्र्यात नसते कोणी
लेक पोटची झाली
कोपऱ्याचा केर
उमा म्हणे यज्ञी माझं
जळाले माहेर
असं गाणं देखील आहे
त्यावर सती रागाने यज्ञात उडी घेते आणि स्वतःला भस्म करून घेते त्या रागावर शंकर तांडव करतात सतीचे शव हातात घेऊन तांडव करत असताना सगळे अखिल ब्रम्हांड डळमळू लागते.
तेव्हा शिवाचा राग शांत करण्यासाठी विष्णू आपल्या सुदर्शन चक्र आले च्या देहाचे बारीक तुकडे करतात अशी एकूण 108 शक्तीपीठे आपल्या देशात आहेत त्यातील एक नेपाळमध्ये देखील आहे जिला गुहेश्वरी म्हटले जाते
तीच सती पुढच्या जन्मात शैलपुत्री या रूपाने पुन्हा जन्माला येते आणि काशीमध्ये घाटावरती तिचे वास्तव्य आहे.
