Jyoti gosavi

Others

3.5  

Jyoti gosavi

Others

कृष्णा तुझी रूपे किती?

कृष्णा तुझी रूपे किती?

4 mins
72


कृष्णा तुला काय म्हणावं? याचं मला नेहमीच थोडं पडतं,

 तुला देव म्हणावं, मित्र म्हणावं, सखा म्हणावं, का रक्षण कर्ता म्हणावं काय म्हणावं ?

अरे इतर देवापुढे कसं नतमस्तक होता येत ,हात जोडतो, मनातलं काहीतरी मागतो, पण! तुझ्या बाबतीत असं होतच नाही.

 असं वाटतं की तू माझाच आहेस, माझा मित्र आहेस, माझा सखा आहेस ,न सांगता माझ्या मनातलं सगळं जाणतोस ,तर तुला काय रे मागायचं! न मागताच तुला ते समजतं आणि तू देतोस .


लहानपणी परब्रह्म स्वरूप देवांचाही देव असताना, तू यशोदेला आई पण दिलेस ,तिच्याकडून हट्ट पुरवून घेतलेस .खोड्या केल्यास , लोणी चोरलेस .

बर! तुझे हट्ट पण असे की जे पुरवता येणार नाही


 आई मला चंद्र दे धरुनी 

त्याचा चेंडू दे करोनी

 चंद्र कसा रे बाळ धरायचा 

चेंडू कसा रे बाळ करायचा 

दहीभात केला वाया गेला

 बाळ ताटी बसूनी जेवेना


आई मला सर्प दे धरुनी 

 त्याचा चाबूक दे करोनी 

सर्प कसा रे बाळ धरायचा

 चाबूक कसा रे बाळ करायचा

 दहीभात केला वाया गेला

 बाळ ताटी बसूनी जेवेना


मग काय तू सूर्य मागितलास ,साप मागितलास ,आई तुझी सावली काढून दे ,आई तुझ्या डोळ्यातली भावली काढून दे. अशा गोष्टी तू केल्यास. 

आणि वेळ आल्यावर तिला अखिल ब्रह्मांड देखील दाखवले मुलात मूल झालास तरी तुझं देवत्व त्यात सोडलं नव्हतंच.

गोपांचा सवंगडी झालास, त्यांच्याशी गवळ्याच्या मुलांप्रमाणे खेळलास, आणि गोकुळावर आलेल्या अनेक संकटातून तू त्यांना तारुन नेलेस .

गोवर्धन तू स्वतः उचललास पण मोठेपणा मात्र त्या गोवळ्यांना दिलास .

जळासूर आगासूर बकासुर किती राक्षस मारले पण श्रेय स्वतःला कधी घेतलं नाहीस.

 कर्मण्येवाधिकारस्ते ना फलेशू कदाचन  

एवढा मोठ तत्वज्ञान सगळ्या जगाला शिकवलंस .

खरं फळाची अपेक्षा न करता जर माणसाने निरपेक्ष काम केलं तर जगातली किती भांडण आणि किती वाईट गोष्टी बंद होतील ..


नंतर ज्याला ज्या मार्गाची इच्छा आहे त्याला तो तो भक्ती मार्ग दाखवलास. कलियुगातला माणूस जास्त कामातूर 

त्यामुळे ज्याला बाल सखा पाहिजे त्याला बाल सखा म्हणजे काय सख्ख्या भक्ती . तर

ज्याला सगळीकडे कामच दिसतो, त्याला गोपिकांच्या प्रेमातून भक्तीला लावलेस .पण नुसता कामच नाही हा गोपिका कशा निरपेक्षभक्ती करत होत्या ते देखील दाखवलेस .


भारतीय संस्कृतीत स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे.

 याचसाठी नरकासुराच्या बंदी शाळेत असणाऱ्या 16100 स्त्रियांना आपल्या पत्नीचा दर्जा दिलास, नाहीतर बिचाऱ्या रानोमाळ भटकल्या असत्या. ना माय बापाने घरात घेतले असते ना नवऱ्याने घरात घेतले असते, म्हणून तिथे 


 माना मानव वा परमेश्वर 

मी स्वामी पतीताचा 

योगी म्हणूनी उपहासा 

मी भोगी कर्माचा


या तत्त्वाने त्यांना आश्रय दिलास.

. पुढे मित्रत्व निभावण्यासाठी, मित्रत्वाचे नाते निभावण्यासाठी, सुदाम्याने एवढ्याशा चिंध्या चिंध्या झालेल्या गाठोड्यात बांधून आणलेले सुके पोहे मोठ्या आवडीने खाल्लेस, आणि त्याला सगळे वैभव दिले एकट्याने पोहे खाल्ले असतेस तर त्रिभुववनाचे दान दिले असतेस, म्हणून रुक्मिणीने हात धरून तुझ्या हातातले अर्धे पोहे स्वतःला घेऊन खाल्ले होते ‌

 आणि तू मात्र मैत्रीच्या नात्यापुढे राजा आणि रंक हे नाते देखील मिटवून टाकले.


प्रियकराचे नाते देखील छानच निभावलेस ,जेव्हा रुक्मिणीचे मनाविरुद्ध लग्न करणार होते आणि तिला फक्त तुझ्याशी लग्न करायचे होते तेव्हा कोणालाही न सांगता रातोरात तिच्या नगरीला जाऊन रुक्मिणीला घेऊन आलास. 


बहिणीचे नाते हे तर तुझेच उदाहरण सगळ्या जगाला दिले जाते 


भरजरी ग पितांबर दिला फाडून 

 द्रौपदीची बंधू शोभे नारायण


 किंवा 

चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला प्रसन्न माधव झाला


अशा गीतातून तुझी आज राम वस्तूची केली जाते आणि त्या एका चिंधीची किंमत तू तिला इतकी दिलीस ,इतकी दिलीस ,की जन्मभर कुठल्याही बहिणीने उतराई राहावे 

त्या एका एवढ्याशा चिंधीचे ऋण मानून तू तिला असंख्य वस्त्रे पुरवलीस आणि तुझ्या लाडक्या कृष्णेची अब्रू वाचवलीस.


तुझं आणि राधेचं नातं तर अनाकलनीय कोणाला वाटतं ती तुझी प्रेयसी, कोणाला वाटतं तू तुझी भक्त ,कोणाला वाटतं की तुझी अर्धांगी, काय असेल ते असो पण आजही तुझ्या नावा आधी राधेचं नाव घेतलं जातं म्हणजे उगाचच तू तिला सोडून दिले नाहीस विसरून गेला नाहीस आणि तिच्या संसारातून काढूनही नेलं नाहीस की तिच्या संसारात रमली तू तुझ्या एवढ्या मोठ्या उलाढाली तर मला पण कुठेतरी राधा आणि कृष्ण एकजीव होते जे जगाच्या या मोठ्या घडामोडीत देखील एकमेकाला विसरलेले नव्हते. 


आता राहिला प्रश्न तुझ्या कर्तव्य कठोरतेचा ,जेव्हा महाभारतातल्या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये तू अर्जुनाच सारथ्य स्वीकारलंस, आणि त्याची बाजू घेतलीस. मग साम दाम दंड भेद सगळ्यां नीती वापरून एकदा सत्याची बाजू घेतली की, तिचा विजय करायचाच हे ठाम डोक्यात ठरवून तू केलंस .

अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्या जगाला गीता सांगितली ,आणि त्यात अर्जुनाला सांगितलं की भावनेपेक्षा कर्तव्य कसं श्रेष्ठ आहे आणि कठोर आहे.

 समोर उभे असणारे तुझे गुरु, काका, मामा ,बंधू, कोणीही असले तरी युद्धात ते शत्रूच आहेत अशावेळी आपल्या कर्तव्यापासून पदच्युत व्हायचं नाही. गीतेच तत्त्वज्ञान तर कित्येक भाषात भाषांतरित झाला आहे सगळ्या जगाला ते मान्य आहे. तेव्हा तो मोठा महान तत्व वेता सद्गुरु गुरु अशा रूपात सगळ्या जगाला ज्ञान दिलेस,

कृष्णा तू प्रेमळ सखा बंधू माता गुरु तत्त्ववेत्ता मित्र अशा कितीतरी नात्याने सगळ्या जगाला बांधून ठेवले आहेस.

तुझी किती आणि कोणती रूपे डोळ्यात साठवू मनात आठवू.

शिवाय या सगळ्या नात्यांच्या पलीकडे तू माझाही सखा आहेस. आहेस ना ?

हो मला माहित आहे, गरज पडली की तू नक्कीच येतोस ,उभा राहतोस, एरवी जरी नाही आठवण केलीस तरी संकटात नक्कीच धावतोस


Rate this content
Log in