Ujwala Rahane

Inspirational

3  

Ujwala Rahane

Inspirational

मेरी आवाज ही मेरी पहचान है

मेरी आवाज ही मेरी पहचान है

1 min
158


घराघरात भुपाळीचे स्वर दुमदुमत होते कोणी भक्तीगीतात तर कोणी भावगीतात दीदीला ऐकत होते. 


  प्रसन्न सुप्रभाती चहाचा कप आणि वर्तमान पत्रात कित्येक जन रममाण होते. इतक्यात बातमी धडकली लतादीदींना इहलोकच्या प्रवासाला निघाली.सगळे व्यवहार थप्प झाले जनमानसात दु:खाचे सावट पसरले.


 एक भारतरत्न परमेश्वराच्या तिजोरीत मानाने जमा झाले.सगळयांचे अश्रू अनावर झाले. उषा,आशेने मीना व हृदयनाथकडे बघितले.भावाबहिणींच्या मनातले भाव डोळ्यातून आश्रूच्या रूपात बाहेर पडले.


   लतादीदींना इहलोकातील सगळ्यांना दु:ख सागरात लोटून परलोकात गेली. इकडे परलोकात म्हणजेच स्वर्गात मात्र आनंदाचे वातावरण होते.स्वर्गाचे साती दरवाजे उघडले होते.अमृताचे सडे पडले होते. फुलांच्या पायघड्या घातलेल्या ,अप्सरा फुलमाला घेऊन स्वागताला उभ्या राहिलेल्या.गाणसमाज्ञीचे स्वर्गात आगमन झाले.स्वतःहा इंद्रदेवानेच स्वागत केले.इंद्रदरबारी सनईचे स्वर दुमदुमले.


  गाणकोकिळेने सुर तिथेच छेदले. परमेश्वराला शब्दात पकडले,ती बोलली पृथ्वीतलावर जाताना मला बहाल केलेली दैवी देणगी मी स्वतःहाच परत करायला आले.आता तुम्हीच सांगा मी माझ्या जिवनाचे सार्थक ना केले?. दिलेल्या वचनाला मी पण आहे जागले!


   परमेश्वर निशब्द झाला तो हळूच बोलला तुझे पृथ्वीवरील तूझे कार्य संपले म्हणून स्वर्गात तुला बोलावले.

   आता दीदीनेच देवालाच मग वचन मागितले तिच्या चाहत्यांसाठी. दीदीच्या गळ्यातून स्वर बाहेर पडले.


  दुरितांचे तिमीर जावो |विश्व स्वधर्म सूर्य पाहो |जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात|


  देव या आवाजाने मंत्रमुग्ध झाला आणि दीदीला तथास्तू म्हणाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational