STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

मैत्री

मैत्री

2 mins
322

मैत्री या शब्दानेच आपण सगळे सुखावून जातो. मैत्रीचा धागा ज्याच्याशी बांधतो त्याला आपण कधीच विसरू शकत नाही. मैत्री, असे नाते आहे ते फक्त आपणच बनवू शकतो. बाकीचे सर्व नाती आपल्याला आपोआप मिळतात. मैत्री, जिथे आपण आपले विचार स्वतंत्रपणे, हक्काने ज्याच्या जवळ जाऊन व्यक्त करू शकतो. मनातल्या भावना मित्रा जवळ बोलताना कोणताही संकोच वाटत नाही. सहज रित्या आपण आपल्या मित्रा जवळ किंवा मैत्रिणी जवळ मुक्त होऊ शकतो. 


           ज्या मित्र-मैत्रिणींची आपल्याला रोज आठवण येते, आपल्या आनंदात त्यांना सामावून घ्यायचे असते, कोणतीही नवी गोष्ट त्यांच्याबरोबर वाटायची असते, त्यांना कधी भेटू व खूप सार्‍या गप्पा गोष्टी करू असे जेव्हा वाटू लागते, तेव्हा सार्‍या नात्यांमध्ये मैत्रीच्या नात्याला प्राधान्य दिले जाते. तसे पाहिले तर मैत्रीचे खूप सारे उदाहरणे आहेत. मैत्रीसाठी केलेले त्याग, समर्पण भावना, दुःखात दिलेली साथ, आनंदात घालवलेले क्षण, रक्ताचे नाते नसतानाही निभावणारे नाते, फक्त आणि फक्त मैत्रीतच दिसते.


          ज्या वेळी दोन स्वतंत्र विचारसरणीचे लोक मैत्री खातिर एकत्र येतात, तेव्हा शुद्ध विचारांच्या देवाण-घेवाणीने विकासाकडे नवी वाटचाल सुरू होते. दोन संस्कृती एकत्र येऊन मैत्रीचा सन्मान वाढवला जातो. मैत्री फक्त दोन व्यक्तीतच नव्हे, तर दोन संस्कृतीत, दोन देशात शांतता प्रस्थापित करत असते. युवा लोकांच्या मनात मैत्री भावना जपल्यास देशात शांतता निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी मैत्री दिवस ही साजरे केले जातात. भेटवस्तू देणे, मैत्रीचे धागे एकमेकांना बांधणे, मित्राच्या आनंदात सहभाग घेणे, मैत्रीत विश्वास निर्माण करणे, अशा बऱ्याच गोष्टी मैत्री दिनात साजऱ्या केल्या जातात.


           मैत्री वय, लिंग, विचार बघून केली जात नाही. मैत्री स्त्री-पुरुषात ही असू शकते. वयोवृद्ध आणि चिमुरड्यात ही मैत्रीचे नाते असू शकते. आई-मुलगी, बहीण-भाऊ, वडील-मुले कोणामध्येही मैत्रीचे नाते निर्माण होऊ शकते.


          गरजेच्या वेळी उपयोगी पडणारी, मदतीचा हात देणारी, योग्य मार्गदर्शन करणारी, दुःखात ही हसवणारी, न सांगता खूप काही देणारी, विश्वासास पात्र ठरणारी, नात्याला बळकटी देणारी, मनसोक्त आनंद देणारी, संघर्षातही साथ देणारी, एकच गोष्ट ते म्हणजे खरी मैत्री व मैत्रीचे संबंध.


         खरा मित्र किंवा मैत्रीण आपणच ठरवावे. जी अपेक्षा मित्राकडून केली जाते प्रथमत: आपण स्वतः त्याच्या पात्रतेचे असायला पाहिजे. मैत्री सुरुवातीला आपल्याकडून निभावली पाहिजे तेव्हाच मैत्रीचे नाते घट्ट बांधून राहिल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational