Swati Devale

Inspirational

4.5  

Swati Devale

Inspirational

माया

माया

2 mins
287


केदारचा लसीचा दुसरा डोस घेऊन झाला आणि मी निःश्वास टाकला. आता तो पूर्वीसारखा आमच्याबरोबर राहायला लागला. पियूचा आनंद तर अक्षरशः थुईथुई नाचत होता. 

"बाबुडीऽऽऽऽ मी कित्ती दिवसांनी तुला भेटतेय . इतकं भारी वाटतंय. तुला माहितीये...  असं म्हणत पियू केदारच्या गळ्यात पडली आणि मग गेले सहा आठ महिन्यांची अडवून ठेवलेली तिची बडबड सुरू झाली. खरं तर निम्म्या गोष्टी केदारला माहितच होत्या पण तोही हसत हसत तिला आश्चर्य वाटल्याचं दाखवत होता. मला त्यांच्या गप्पा ऐकून फार मजा वाटत होती. 


"आई, उद्या लवकर उठव हं ! मी आणि बाबा टेकडीवर जाणार आहोत."

"पियू , अगं किती महिन्यांनी बाबा घरी आलाय . त्याला झोपू दे जरा निवांत. दुपारी हॉस्पिटलमध्ये जायचंच आहे."

"अगं तोच म्हणाला जाऊया टेकडीवर म्हणून. आता पावसाळा आलाय नं ! आम्ही बिया पेरणार आहोत."


आता बाबा आणि लेकीने ठरवलं आहे म्हटल्यावर मी पण तयार झाले.  सकाळी सकाळी टेकडीवरची मोकळी हवा, निरभ्र आकाश आणि उगवता सूर्य . व्वा मस्त वाटत होतं. पियूने तयार केलेले सिड बॉल्स छोटे छोटे खड्डे करून त्यात टाकले आणि वरून माती लिंपून टाकली. झाडावर चढून फोटो काढून झाले. निरनिराळ्या पक्षांबरोबर फोटोसेशन झालं.


पियूला आवडणारे सँडविचेस मी घरूनच आणले होते. तिघांनी टेकडीवरच नाष्टा केला. ब-याच महिन्यांनी अशी मस्त सकाळ उगवली होती. घरी आलो तर अंगणात कामाच्या मावशी येऊन थांबलेल्या. त्यांचीही लस घेऊन झाल्यामुळे आजपासून कामावर आलेल्या. सुख सुख म्हणतात ते हेच असावं असं माझ्या मनात आलं. 

"ताई एक सांगू का तुम्हाला ? म्हणजे तुझा विश्वास आहे की नाही माहित नाही पण सांगावंसं वाटतंय." 

"अहो मावशी , सांगा की! पैशाची अडचण आहे का काही?"

"नाही नाही. तसं काही नाही. मी म्हणणार होते डॉक्टरसाहेबांची आणि पियूताईची दृष्ट काढून टाका. तुम्हाला येत नसेल तर मी काढते. रागवू नका. माझी आपली श्रद्धा. आमच्या चाळीतली रोहिणी आहे नं हॉस्पिटलात. ती सांगत होती पियूताईचं कौतुक. नजर लागते हो लेकराला ." 

मनात म्हटलं किती भाबडी माया आहे ही. पियूच्या आजीनेही त्या दिवशी काढलीच होती तिची दृष्ट. मावशींना दृष्ट काढायला सांगितली. केदारने माझ्याकडे अपेक्षेप्रमाणे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं पण मी त्याला नजरेनेच थांबवलं. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational