Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Mina Shelke

Drama Tragedy

0.4  

Mina Shelke

Drama Tragedy

माया आईची

माया आईची

2 mins
11.2K


अनंत जीवघेण्या कळा घेऊनही काही केल्या तिची सुटका होईना.

दोन दिवसापासून अडकलेली अगदी क्षीण क्षीण होत चाललेला श्वास, आतल्या जीवाला सुखरूप बाहेरच्या जगात आणण्यासाठी सोशिकतेचा कळस गाठलेला. शेवटच्या क्षणाला डॉक्टरने ब्लेड मारून अडलेल्या बाळासाठी मार्ग थोडा सैल करून दिला. तसा पटकन जीव बाहेर पडला. पण काही केल्या रक्तस्त्राव थांबेना, प्रयत्न करूनही टाके बसेना. धो धो पूर वाहतो रक्ताचा, ग्लानी आलेली दोन दिवस कळा देऊन गलितगात्र झालेली आई विचारत होती, खोल आवाजात, बाळं कुठयं माझं, दाखवा मला, डोळ्यात प्राण आणून विनवणी करत होती. बाळ त्यात गुंडाळलेला मासाचा गोळा सारखा टाहो फोडून आसमंत दणाणून जावा इतका आंक्रात. कदाचित चाहूल लागली असावी पोरकेपणाची आणि तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, O God shit आणि तोंडाला बांधलेली पट्टी गळ्यात आली

क्षणभर निःशब्द...

डिलिव्हरी रुममधे भयाण शातंता. देवासमान भासणारे डॉक्टर मनातल्या मनात हळहळले शिक्षणात धडे, दुःख पचवण्याची ताकद, प्रचंड संयम आत्मसात, दगडाचा देव वाटावा इतका कठोर. रक्ताच्या थारोळ्यात निपचित झाला देह. एक आर्त हाक डोळ्यातचं विरली. नर्स थिजल्या नजरेने, थरथरत्या हातात नवजात शिशू आईच्या कुशीला क्षणभर

निस्तेज उघड्या डोळ्यात अपूर्ण स्वप्नांचे मनोरे बेचिराख झालेले, काळीज भेदरून टाकणारं वास्तव, निःशब्द, मृत आईचा स्पर्श होताचं इवल्याशा हातानं चेहरा कुरवाळत मायेला शोधणारं मन चिरून टाकणारा आक्रोश.

मायलेकाराची पहिली आणि शेवटची भेट. साक्षीदार गोठलेलं रक्त, हताश डॉक्टर, स्टाफ आणि रुममधले टेबल, कात्री, ब्लेड, कापसाचे रक्तात माखलेले बोळे.

नातेवाईकांचा एकच कल्लोळ, लुकलुकणारे डोळे मायेच्या

स्पर्शासाठी आसुसलेलं, कोरड्या ओठांची चुटचुट, चोखून उपाशीच निजलं, आज्जीचं लक्षात आलं बाळ जिवंत आहे पटकन पोटाशी धरलं. ढसाढसा अश्रूंच्या धारेखाली अभागी जीव चिंबचिंब. नऊ महिन्यांचा मायलेकरांचा कुशीतला सहवास, संवाद स्तब्ध झाला. थांबला कधी न पुन्हा होण्यासाठी.

मयतीची तयारी सुरू झाली. कुणीतरी कुजबजले ओली बाळंतीण, पिशाच्चयोनीतून लेकरासाठी येईल माघारी. कुजबूज वाढत चाललेली.

आत्ताच बंदोबस्त करायला हवा, राळे आणा, खिळे आणा, चांभाराकडून ठोकून घ्या. हातापायात, मस्तकात परतीची वाट खुटूंन टाका. मयतीच्या रस्त्यावर राळे पेरा. वेचता वेचता पहाट होईल अन् माघारी जाईल बाई.

मेली तरी परवड थांबेना. सोपस्कार झाले, चिता पेटली. विटाळलेल्या देहाला जागा नरकात म्हणे. हातापायात, डोक्यात खिळे ठोकलेले

जायबंदी मातृत्व आगीच्या लोळात धुराच्या धुक्यात घिरट्या घालतयं

असा भास.

आईच्या दुधाची भूक आज्जीच्या हाती थरथरणाऱ्या वाटी चमच्याने भागायची खरी. पण रात्री आईच्या उबेला तरसलेला जिवाचा आकांत शिगेला पोहचलेला आणि अचानक कर्रर खिडकीचा आवाज. बाळाची हूममम, चुटचुट आवाज, गाढ झोपलं अगदी तृप्त होऊन. तांबडं फूटेपर्यत अगदी शांत, निवांत. आज्जी समजून चुकली मनातचं बोलली, बयो बरं झालं आलीस. लेकराला छातीला लावला. रोजचं येत जा, नाही अडवणार तुला कुणी. खिळे, राळे सारे फोल. मातृत्वाच्या ओढीपुढं, जसंजसं मुल वाढत होते. पडल्याझडल्यावेळी कुणीतरी सावरत एक अदृश्य सावलीखाली बाळं अगदी निर्धास्त आहे, सुरक्षित आहे. किती दिवस राहील हे छत्र माहिती नाही. कारण भुताचं आयुष्य सांगता येत नाही

आणि ते आईचे असेल तर अमरही असू शकते. देवाचे वरदान मिळालेले.


Rate this content
Log in

More marathi story from Mina Shelke

Similar marathi story from Drama