Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Mina Shelke

Tragedy


2.3  

Mina Shelke

Tragedy


विधूरांच्या व्यथा

विधूरांच्या व्यथा

4 mins 2.7K 4 mins 2.7K

।। व्यथा विधूरांच्या...।।

मागील लेखात विधवा स्रीच्या बाबतीत समाज , नातेवाईक व कुटुंब काय विचार करते हे मांडले होते .

*#

आता दुसरी बाजू विधुुर...!

जेव्हा एखादा पुरुष साठीच्या दरम्यान विदुर होतो,त्यावेळी त्याची अवस्था बिकट होते.दुसरा जोडीदार मिळणं दुरापास्तच...!जर त्याने तशी भूमिका घेतली तर हास्यास्पद ठरते,

टिंगलटवाळीचा विषय होऊन बसतो.शारीरिक ,मानसिक दृष्टीने दुर्बलता आलेली असते.

पोटची मुलंबाळं बरीच मोठी झालेली असतात. त्यांच्या संसार प्रपंचात ती रममाण होतात..तिसऱ्या पिढीची त्यात भर पडत असते.तेव्हा कुटुंबात अशा व्यक्तीस मग एकटेपण ,नैराश्य येण्याची शक्यता असते.असुरक्षिततेची भावना निर्माण होते. असे का होते ?

आजवर दैनंदिन त्याच्या गरजा पत्नीने कळत नकळत वेळेत पूर्ण केलेल्या असतात. काहींना तर घरातल्या कामांची सवयच नसते..तो अर्धांगिनी चा धर्मचं आहे अशी धारणाच झालेली असते.या भावनेतून हुकूमत गाजवलेली असते.तेव्हा चहाची तलफ भागवावीशी वाटली तरी परावलंबन वाट्यास येते.जेवढे पत्नीला,नवरा प्रत्येक गोष्टीत गृहीत धरतो तेव्हढं आई नतंर कुणालाचं धरत नाही. पुरुषांच्या आयुष्यातील या दोन स्रीया दोन टप्प्यावर मोठ्या आधारस्तंभ बनतात.दुर्दैवाने त्या गेल्यानंतर त्यांचे मोल जाणवते ही शोकांतिका आहे. मुलगी म्हणा अथवा सुनबाई, त्यांच्या वेळेनुसार व सोयीनुसार त्यांच्या पध्दतीने अशा वृद्धाची दखल म्हणा किंवा काळजी म्हणा घेतात .

अशावेळी त्याला पत्नी ची पोकळी जाणवते.तिचं या जगात नसणं असह्य अन वेदनादायी ठरते.आतमधे कुठेतरी एक सल सतत जाचते ,परंतु महिलांप्रमाणे पुरुष सहसा आपले दुःख कुणापुढे मांडत नाही.व्यक्त होत नाहीत,जसे आहे त्यात जीवाला मारुन मटकून उर्वरित आयुष्य कंठत असतात.आयुष्यभर कदर न केलेल्या पत्नी ची किंमत एकाकी पडलेल्या शेवटच्या टप्प्यावर जाणवते. असो...

जीवन परावलंबी झाल्याची भावना मनाला कुरतडते.

थोडक्यात असे की विधवा आणि विदूर यांची समस्या वेगळी असली तरी समस्या ही समस्याच असते. सुनेशी ,म्हणा अथवा नात्यातील किंवा इतर महिलांशी संवाद साधताना मनात पाप नसते,... पण बोलावसं वाटलं तरी ते संशयास्पद वाटते ,इतर मंडळी ही वाळीत टाकलेल्या माणसा सारखी वागणूक देतात. म्हातारा बिथरला , बायको नाही म्हणून बायकांशी लगट करण्याचा प्रयत्न करतोय , या वयात शोभतं का ? असे वागणे एक ना अनेक दूषणे चिटकवून मोकळे होतात. मानसिकता समजून घेण्याचा फारसा कुणी प्रयत्न करत नाही . सहजपणे जगताना उगाच तर्क वितर्क काढल्यानं ,जगणं कठीण होऊन जाते. नातेवाईक व समाज यांचे जेष्ठाप्रती वागणे योग्य आहे का ? ही विचारधारा बदलायला हवी ना मंडळी !

खरं तर तसे त्याच्या मनात काही नसते,पण माणूस जेव्हा एकटा पडतो तेव्हा तो माया शोधत असतो ,तेव्हा त्याची मानसिकता समजून त्याच्याशी आपण व्यवस्थित वर्तणूक केली तर कुठे बिघडते ! का बाजूला वाळीत टाकल्यासारखे वागायचे ? का उगाच नको ते अर्थ काढायचे ? आपल्याच़ माणसाला आपणचं समजून घ्यायला हवे नं !

बऱ्याच ठिकाणी अशा जेष्ठांना घरात वावरण्याची सुध्दा मुभा नसते , तसे नजरेतून जाणवून दिले जाते . त्यांची जागा ओसरीत किंवा पडवीत असते . किंवा तोंडावर स्पष्ट पणे सांगितले जाते तुम्ही बसा बाहेर ,काय हवे नको तिथूनच सांगा उगाच घरात लुडबड नको .

मिळून मिसळून वागणारा असेल तर तोंडावर हेटाळणी केली जाते.आपल्याचं माणसाकडून हे घडते ,तेव्हा कोंडमारा होतो , दुःखी होतो. एकलकोंडी होतात असे वृद्ध .

विषण्ण अवस्थेतील जेष्ठ काय चुकतयं नेमकं या विचाराने त्रस्त होऊन जातो.

कधी कुणाच्या घरीदारी गेला तर ,संशयग्रस्त नजरा काहीही अनुमान काढून मोकळे होतात.

तुम्ही म्हणाल अहो काही वृद्ध असतातचं..... चवचाल ,लोचट .... काही गोष्टी ऐकिवात ही असतात,अशा वृद्धकडून बलात्कार होवू शकतात...हो दुर्दैवाने घडतेही काही प्रमाणात. पण का होतात यांच्या हातून असे अक्षम्य अपराध हेही तपासून बघा ...खरे तर एका ठराविक वयानतंर शारीरिक आकर्षण व शारीरिक भूक संपते .

#महिलांच्या विविध समस्यावर लिहिलेले लेख वृत्तपत्रातून वाचकांनी वाचले आणि अनेक फोन खणखणू लागले.त्यातूनच काही परिचित तर काही नवखे जेष्ठ वयोवृद्ध पुरुषांनी, ताई आम्हा विदुरांनाही बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागतेयं. आमच्याही भावना लोकापर्यंत पोहचवा . त्यांच्या विविध व्यथा ऐकल्यावर मन गलबलून आलं. त्यातूनचं एक समस्या ऐकली तेव्हा ऐकून मी हैराण झाले ....मन सुन्न झाले.

#अल्पप्रमाणात काही पुरुषांना वयाच्या शेवटच्या टप्प्यात हार्मोन्स तफावतीमुळे सेक्स बाबत विचित्र भावना,वासना निर्माण होवून वर्तुणुकीत काही जे बदल होतात, त्यामुळे देहबोलीत वेगळेपण जाणवू लागते.त्यांचे पर्यावसान अघटित कृत्य करण्यात होते. कधी कधी ते अतिरेकी होऊन,मिळेल ते सावज त्याच्याकडून वासनेचे शिकार होते.यात मूक प्राणीसुध्दा येतात.काय भले काय बुऱे या विचाराच्या पलीकडे जाऊन केलेला तो बलात्कार ठरतो.

सर्वच जेष्ठांबाबत घडेल असे नाही.क्वचित लोकामध्ये हा दोष निर्माण होतो # अशा वेळी डॉ. चा सल्ला घेऊन हार्मोन्स बँलन्स छोट्या आँपरेशन द्वारे करता येतो व विचित्र भावना विरून जातात. योग्य वेळात योग्य उपचार झाला तर पुढील अनर्थ टळतील.असे त्या अस्मादिकास वाटते.#

अशा घटना घडू नये म्हणून हे घडण्याआधी त्याची मानसिकता कुटुंबातील लोकांनी लक्षात घेऊन वेळीचं जर वैद्यकीय सल्ला घेतला अन योग्य उपचार झाले तर ती समस्या दूर होऊ शकते.पण आपण काय करतो दुखते कुठे आणि सांगतो भलतेच.उपाय शोधण्याऐवजी अपाया वर जास्त लक्ष देतो.त्यामुळे ती व्यक्तीला तिरस्करणीय वागणूक देतो,अव्हेरतो. लक्षणं नीट समजून घेत नाही. पण डोळसपणे बघितले तर काही बदल नक्की घडतील. अशावेळी योग्य ती खबरदारी घेऊन अशा जेष्ठाना सहकार्य करा,मदत करा योग्य समुपदेशक बना.समजून घ्या. अशा एकाकी पडलेल्या वृद्धाची उरलेले आयुष्य सुखी होण्यास मदत होईल..

काही काळाचेचं सोबतींना सांभाळून घ्या , जाणून घ्या ,माणूस म्हणून पहा . मानसिक आधार देऊन व विश्वासात घेऊन मनमोकळेपणाने संवाद करावा ...जेनेकरून त्यांना गिल्ट वाटणार नाही.

टिप--- निरिक्षणाअंती आणि विदुर जेष्ठांना बोलते करून त्यांच्या भावना जाणून समजून घेऊन विदुरांच्या व्यथा शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केला . मानवतावादी दृष्टीकोन ठेवून आपणही यावर नक्की विचार करावा .

सुखापेक्षा दुःखाजवळ

धावते मन माझे...जेव्हा

लेखणीतून जागते...

वास्तवाचे भान तेव्हा ...


Rate this content
Log in

More marathi story from Mina Shelke

Similar marathi story from Tragedy