STORYMIRROR

Mina Shelke

Others

3.2  

Mina Shelke

Others

तू ----घरीचं असतेस

तू ----घरीचं असतेस

6 mins
696


    दारावरची बेल वाजताचं धावत येऊन दार उघडणारी अन सदैव कुटुंबाच्या सुखासाठी झटणारी , कर्तव्यदक्ष गृहिणी कधी कळली का हो कुणाला !

कधी तिच्या मनाची खोली समजून घेतली काहो आजवर कुणी! बहुतेकांनी नाहीचं ....

सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या झोपण्याच्या वेळेपर्यंत सतत कार्यरत असणारी ही माऊली काय अन किती करते हे आज मी तुम्हाला सांगते ....

सर्वाच्या अगोदर ऊठून दरवाजा उघडणारी अन 

 कुणाला काही हवंय का ;विचारून दाराला कडी अन लाईट बंद करणारी सर्वात शेवटी झोपणारी घरातील तीचं एकमेव व्यक्ती ती असते...

 

    तुमच्या ताटात रोज जे अन्न येते नं ते दिसायला खूप सहज आणि शुल्लक गोष्ट वाटत असली तरी.. तिला त्यासाठी बरीचं पूर्वतयारी करावी लागते , भाजी आणण्यापासून ते ताटात येईपर्यंत अनेक क्रिया त्यावर करणे गरजेचे असते ....ताटातली पोळी भाकरीचंही तसंच ...हे करण्यासाठी बरीच मेहनत तर लागतेचं शिवाय वेळेचं नियोजन ही असते आणि तुमच्या आरोग्याची काळजीही असते . 

कोणतीही गोष्ट तुमच्या हाती पडण्या अगोदर तिच्या हातातून निरखून पारखून देण्याची कामं ती अविरतपणे सजग , भान ठेवून तिला करावे लागते ...पाण्याची टाकी भरण्यापासून ते बाथरूममध्ये साबण , टाँवेल , टूथपेस्ट , टूथब्रश ते अंगावर घालण्यासाठी लागणाऱ्या कपड्यापासून ते मोजे , हातरुमाल पर्यंत सज्ज ठेवावे लागते नियमितपणे हे करणे एवढे सोपे नसते हो ,...त्यामागे तिचे कष्ट , धावपळ आणि सक्षम कर्तव्यदक्षता असते . 

कुटुंबातील कुणाचं आजारपण असो की सण समारंभ जास्तीचा त्रास तीचं झेलत असते . नातीगोती , आल्यागेल्यांचा पाहुचार उत्तम करताना व तुम्ही फक्त आँर्डर सोडता पण ती जबाबदारीने , प्रेमाने सर्व करते कुरकुर न करता . थोडक्यात काय घर ते सपूर्ण कुटुंब अपटूडेट ठेवणारी ती असते .

निरपेक्ष भावनेतून बरंचसं करत राहते. 

अपेक्षा एकचं कुटुंब सदा आनंदी ,समाधानी , निरोगी आरोग्यपूर्ण रहावे घर हसतखेळत ठेवण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी हसतमुखाने सर्वांचे सगळं तिला आनंद मिळतो .

     पण....तुम्ही काय करता तिच्यासाठी !   

   तुम्ही आँफीसमधून आल्यावर पाण्याचा पेला अन चहाचा कप प्रसन्न मनाने हाती देणारी ती तुमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून काळजीने विचारते ...दमलात काहो , खूप काम होतं का आज ...खायला काही देऊ ?

नको काहीच ...अहो डोकं दुखतयं का ...बाम लावून देऊ ?

नको काहीच सांगितले नं ...तरी तुझं चालूच. शातंता म्हणून नाही, घरात आलं की झालं तुझं सुरू ....बाहेर काय कमी टेन्शन्स असतात ! तूला काय कळणार म्हणा ..."तू घरीचं असतेस" मरमर करावी लागते दिवसभर वर बाँसची बोलणी ...सोड तुला सांगून काय उपयोग म्हणा ! जरा शांत राहू दे बाई मला... आराम करू दे ...तुला काय कामं असतात मुलं , मी बाहेर गेलो की निवांत झोपा काढायच्या नाहीतर टिव्ही लावून लोळत पडायचं ....


    अहो ...अहो असं नाही हो काही काळजी वाटली म्हणून विचारते नं ...बरं आराम करा तुम्ही ....मनातलं बोलणं मनातंच दडपून त्याची अस्ताव्यस्त पडलेली आँफिसची बँग जाग्यावर ठेवून कामाला लागते . 

खरं तर ती दिवसभर घरात एकटीच असते हो , नवऱ्याने , मुलांनी तिच्याशी मनमोकळेपणाने बोलावं , तिच्या जवळ बसाव ...काय केलसं मग तू आज दिवसभरात ते मनापासुन विचारावं ...आज डब्यात खूप भाजी छान होती बर का गं ...अरे व्वा आज तू डबे घासले काय अगदी चमचम करताहेत हं ...काय छान ठेवतेस गं तू आपलं घर 

तु जेवलीस ना पण वेळेवर की कामचं काढत राहीली !

तंब्येतीची काळजी घेत जा बाई ...तू आजारी पडलीस.तर अख्खे घर आजारी असल्यागत वाटते . एवढेच पुरेसे आहे हो तिच्यासाठी थकलेल्या शरीराला नवी ऊर्जा देणारे तुमचे शब्द ऐकण्यासाठी अधिर असतात हो तिचे कान आणि मन सुध्दा ...परंतु बऱ्याचशा पुरूषांना हे जमतच नाही , म्हणण्यापेक्षा कळूनही जाणूनबुजून दुर्लक्ष करतात , त्यांचा एक पारंपरिक गैरसमज असतो बायकोचं कौतुक केलं की ती डोक्यावर बसते ...चूक आहे ते....

 बायकोचे कौतुक व्हायलाच हवं कारण ती आहे म्हणून तुम्ही मानाने मिरवता ती आहे म्हणून तुम्ही सुखाने जगता , ती आहे म्हणून घर आहे आणि घर आहे म्हणून तुम्ही घरात सुरक्षित व सुनिश्चित असता हे ध्यानात घ्या .

नवरा बायको

संसार रथाचे दोन चाकं असतात म्हणतात ......खरं आहे हे कारण नवरा कमवून आणतो आणि बायको कुशलतेने आलेल्या कमाईचे व्यवस्थित व नियोजनपूर्वक वापर करते तेव्हा संसार फुलत जातो .

पैसा कमवणं एकवेळ सोपं पण पैसा योग्य रितीने योग्य ठिकाणी वापरणं ,जपणं अवघड ते ती कुशलतेने करते .

रथ समांतर चालण्यासाठी दोन्हीही चाकांची तेवढीचं मेहनत असते. म्हणून रथ व्यवस्थित मार्गक्रमण करतो.


..."ती"आहे #घरात ,म्हणून तुम्ही बाहेर काम करू शकता. "ती" आहे घरात म्हणून तुम्ही सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण राहू शकता , ती आहे घरात म्हणून बाहेरचे व्यवहार सुरळीत चालतात , ती आहे घरात म्हणून कुटुंब आहे . ती आहे घरात म्हणून तुम्ही प्रगती करू शकता , ती आहे म्हणून अर्थकारण आहे.

 ती आहे घरात म्हणून तुम्ही सुखात आहात "ती" थाबली तर कुटुंबचं नाही तर अवघा देश ठप्प होईल , पर्यायाने सारंच अवघड होईल . ती आहे घरात म्हणून घर आहे ,ती घरात आहे म्हणून घराला घरपण आणि तुम्हाला माणूसपण आहे . ती आहे घरात म्हणून बाहेर सारं काही वेळेत होतं आणि चांगल्यातून वाईटातून चांगलं निष्पन्न होतं .तिची क्षमता अन् सहनशीलता अफाट आहे म्हणून तुम्ही सुसाट आहात हे कायम लक्षात असू द्या ."ती आहे घरात म्हणून तुम्ही संपूर्ण आहात हे ध्यानी असू द्या .

#"थोडक्यात काय तर ती आहे घरात म्हणून सारं सार्थ आहे अन्यथा सारेच व्यर्थ आहे".


    आज संपूर्ण देशात कंर्फू लागू आहे काही तासंही नाही उलटले तर तुम्ही पुरुष मंडळी किती बोअर झालात , बरं तुम्हाला घरात काही कामंही नाही ...फक्त दिवसभर मोबाईल घेऊन चँटिंग , जोक्स पोस्ट शेअर करायच्या , मित्रमैत्रिणींना फोन करून उगाच निरर्थक गोष्टींची तासनतास चर्चा करत बसतात ... मधूनमधून कंटाळा आला की टीव्ही नाहीतर हेडफोन लावून गाणी ऐकत बसायची ...शिवाय वरून सगळं खाण पाणी आयते मिळते हातात ....काम तर अजिबात नाही . दिवसभर आँनलाईन दारी नाही तरी घरी बसून व्यवस्था आहेचं की मोबाईल कंपन्यांची तरी सारखा आरडाओरडा चालूच तुमचा !

 तुम्हाला घरात करमेना अगदी जेलमध्ये टाकल्यासारखी अवस्था वाटते तुम्हाला ! 

   सध्याच्या परिस्थितीत तीचं तुमच्या पेक्षा जास्त सजग होऊ सक्षमपणे संकटाचा सामना समंजसपणे आणि निर्धाराने करत आहे .घरातील चीजवस्तू त्या किराणा असो , भाजीपाला असो , पाणी असो की वीज सर्व गोष्टींचा वापर सतर्कता ठेवून काटकसरीने करून तुमच्यापुढे दोन वेळेस वेळेवर जेवणाचे ताट ठेवते आहे . वारंवार पसारा घालून उगाचंच फेऱ्या मारणारे तुम्ही तीची कामं वाढवता आहात मदत तर सोडाचं पण स्वतःच्या चीजवस्तू सुद्धा जाग्यावर ठेवून सहकार्य करत नाही ...तरी तुमच्या जीवाची घालमेल चालूच ...अरे रहा शांत ,निवांत घरातचं ...रमा की तिच्या सानिध्यात बघा तर एकदा एकाग्र होऊन ती किती आणि कशी घराला घरपणं देते ते अनुभवा आणि हो जे आजवर मनातलं बोलायचे राहीले ते मनमोकळेपणाने बोला की ...

कधी नव्हे ती वेळेची उपलब्धता मिळाली तर तो वेळ फक्त तिच्यासाठी देऊन तर बघा ....तिच्या कष्टाचं सार्थक होईल हो तुमच्या सहवासाने मनातून आलेल्या कृतज्ञेच्या बोलण्यातून ....बघा दिवस कसे छान होऊन जातील ,

व्हायरस तर जाणारंच आहे ...पुन्हा आपले व्यवहार सुरळीत होतील ...आणि नवराबायको नात्याची बाँडिंग घट्ट 

असतेच ती अजून कणखर होईल.


      आता तुम्हीचं सांगा... दिवसभर घरी असणाऱ्या गृहिणी कशा राहत असतील दिवसभर ऐकट्यानं घरात , अन काय काय कामं असतात त्यांना जाणून घ्या .....

वेळ मिळालाचं आहे तर तपासून बघा स्वतःला आणि समजून घ्या तिच्या व्यथा अन् विवंचना.....बघा जमतयं का !


"तू घरीचं असतेस" 

बोलणं जितकं सहजसोपं आहे ना ...तितकी सहजसोपी गोष्ट नाही घरी असणं ....निभावणं तर त्याहून कठीण असते मंडळी ....


"ती"तुझी शक्ती आहे

तू तिची भक्ती आहेस

ती तुझा विश्वास आहे ...

तू तिचा श्वास आहेस....


वास्तु दगडा ,मातीची बनते...

त्यात गृहिणी चैतन्य भरते 

म्हणून घराला घरपणं येते

आणि मंदिरात रुपांतर होते ...


(टीप---- लेख नक्की वाचा , खूप मेहनत घेतली हो ...एवढे लिहायला दोन तास लागले ...वरवर वाचू नका लाईक , कमेंट्स नाही केली तरी हरकत नाही ,पण विचार नक्की करा ...)


Rate this content
Log in