जिवलगा
जिवलगा
दरवाजा कुणीतरी ठोठावत होते ... टकटक टकटक आवाजाने ज्योती जागी झाली. , कोण आले असेल आता भर दुपारच ,नुकताच घरातील कामांचा निपटारा करुन जरा डोळा लागलेला , त्यात आता कोण आल असेल !
जरा अनिच्छेनेचं दरवाजा उघडला . डोळ्यांत अर्धवट झोप ,केस विस्कटून इकडूतिकडून लोबंलेले ...तश्याच अवतारात दरवाजा उघडला...
कोण ? ....
ओळखलं नाहीस !....
अग मी ....दिपक
अं होहो ...तु कसा काय इकडे ...अचानक ! तसा तिचा थोडा गोंधळच उडालेला पण घेतले सावरून ...
विसरलीस की काय ...आत तर येऊ दे की दारातचं सर्व प्रश्न विचारणार आहेस ...
त्याला नखशिखांत न्याहळत घाईघाईने बाजूला होत या या
या ना बाजूला होत घरात प्रवेश दिला ...
बसा ...
घाईघाईने केस बांधत अन साडी सावरत स्वयंपाक खोलीत गेली . कोण हा ? आठवले आठवले स्वतः शी स्वगत ...
अरे हा तर बालपणीचा मित्र दिपक कसं ओळखले नाही मी ... हा तर #जीवलगा# माझा ,आजवर ज्याला मी काळजात जपलय तो ओळखू नये मी ...कमालचं हं मी पण....खूप बदल जाणवतो म्हणा , आणि बघून बरीच वर्ष लोटलीयं ना ...जरा जाडा पण झालायं कदाचित त्यामुळेच ....ओळख नाही पटली लगेच... हूमम..
आतुन आनंदाला उधाण आलेलं ,कसबस स्वतः ला सावरत पाणी घेऊन बाहेर आली . वाटत होत गच्च मिठी मारावी अन विचारावं आज आठवण झाली का माझी !
कुठे होतास इतके दिवस ?
..... मनाला काबूत ठेवून फक्त हसली ...चोरट्या नजरेने स्वतः ला समोरच्या आरशात हळूच पाहीलं एकदा ...
घ्या पाणी ...
अग घ्या ,या काय करतेस ज्योती अजूनही ओळखले नाही का तु मला ... अं....
ओळखले तर ...कशी विसरेन मी दिपक तुला ...किती बदललास तु ,किती वर्षांनी समोर पाहते कसे ओळखणार सांग बररं ...बदल पण झालायं बराच ....
म्हणजे ? कोणता बदल ....हाहाहा सुटलोय जरा ...
हूमममम.... खरंये
किती वर्षांनी नाही अठरा वर्षे झाली आपण एकमेकांना पाहिललेे नाही . बरोबर ना ! की चुकतोय हिशोब ...
हो हो खरं आहे ...
काय म्हणतोस , कसा आहेस ...आज अचानक कसं येणं झाले .
काही नाही सहजचं , तुझी आठवण आली . म्हणून आलो भेटायला
खूप दिवसापासून तुला भेटण्याचा विचार करत होतो ...
आँफीशिअल कामासाठी इकडे आलो होतो , तु याच शहरात राहते समजले, पत्ता काढला अन धडक तुझ्या घरी आलो . तुझ्यासमोर हजर ....तिच्या नजरेत नजर घालून तो उत्तरला .
.............
कशी आहेस ! ...
अंअ ठिक मी ठिक तु कसा आहेस ,
मी बरा ...
बरा !....जरा रोखूनचं बोलली .
हसला फक्त अगदी तेव्हा हसायचा तसाच ...
त्याचं हसणं म्हणजे अहाहा , जीव ओवाळून टाकावा असे ते गोड हासू ....खूप आवडायचं
त्या स्मित हसण्यात त्याच्या मनातले भाव थेट तिच्या काळजात उतरायचे ....आजही तीचं स्टाईल ... तोच समंजसपणा . बराच वेळ इकडचं तिकडच्या बोलण्यात गेला ...आतुरता तर दोघांनाही होती सारं काही जाणून घेण्याची पण एक अवघडलेपण आलं होत .
शेवटी तिनेच विषयाला वळन दिले ....
तसा लाजराबुजरा आहे दिपक स्वतः हून नाही सुरुवात करणार , आपण बोलत करायचा हवे ...
हो ते दिसतचं आहे . ...
खर सांगू दिपक मला तु ओळखूच नाही आलास रे ...खूप दिवस झाले रे काहीच खबर नाही तुझी ,कुणाकडे चौकशी करण्याची पण सोय नाही .
माझं लग्न झाले अन दुसऱ्या मुळाला माहेरी आले तर कळलं की तुम्ही गाव सोडून शहरात गेला.
कुठे ,का ? ही प्रश्न मनातचं कोंडलेली राहीली . अगदी आजपर्यंत या क्षणापर्यंत ...
कधी शोधण्याचा प्रयत्न नाही केलास का मग ?
भूतकाळ सरसर डोळ्यापुढे धावू लागला....दोघांच्या ही
आज मिळतील तुला सर्व प्रश्नांची उत्तर ...सांगतो ऐक
तुझं लग्न झाले ज्योती अन मला खूप उदासीनता आली ,कशातच लक्ष लागेना , शून्यात नजर लावून तासनतास एका जागी बसायचो ...माझी ही अवस्था आईने हेरली . अन तिने बदलीचा अर्ज दिला , बदली करून घेतली तातडीने आम्ही नवीन गावातून शहरात गेलो . त्यानंतर पुन्हा त्या गावात आजपर्यंत पाय नाही ठेवला कधी .
तुझं तिथे नसणे खूप वेदणादायी झालं होतं
हो का ...का ?
तु का उदास झाला ते , कशाचे नैराश्य आलेले तुला ? अन नवीन जागेत झाले का मग सर्व आलबेल !
गालातल्या गालात हसत तिने केलेला प्रश्नाने तो सुखावला , नाही ग ...
का ?
तु नव्हती ना तिथे ...
म्हणजे...
............. तुला माझ्याकडूनचं सारे वदवून घ्यायचे तर
काय....? की आजपर्यंत काहीच लक्षात नाही आले , तेव्हाच्या वागण्याबोलण्याचे संदर्भ !
हेच ग ... तुझ्याशिवाय मला......
अरे पण काय तु .... आहे तसाचं आहे अजून अजिबात बदललेला नाही . तोचं लाजाळू स्वभाव , तोचं संकोच , तेचं निरागस भाव , तोचं बुजरेपणा ...बोल की तुझ्याशिवाय काय ते ! ....
थांब हं खिडकीचा पडदा ओढते , डोळ्यावर उन येतयं ना , ओणवे होऊन पडदा सारताना झालेला स्पर्श ....
खिडकीशेजारी बसलेला तो आतून बाहेरून शहारला .
हं बोल आता ...की एवढ्या वर्षानं अन एवढ्या प्रयत्नांनी पत्ता शोधून भेटावयास आला , अव्यक्त भाव मनातले आजही नाही व्यक्त होणार का ? तसाचं पुन्हा माघारी जाणार !
........ तु नाही बोलणार काही ,तुझ्या मनातले ज्योती !
बोल ना काहीतरी तु ही...
आपण काय तु तु मी मी खेळतोय का दिपक ...
या वाक्यावर खूप गोड हसली दोघेही ...खुर्चीवर बसलेली ती त्याच्या जवळ येऊन बसली ...तसा तो हळूच दूर सरकला ...
तु ना खरचं वेडा आहेस हं अगदी ठार वेडा . मी काय तुला खाणार आहे का ? किती घाबरतोस रे ...जरा अंतर कमी केलं रे आपल्यातलं ...बोल आता धीटपणे .लाजाळूच झाडचं नाहीतरी तु ...लहानपणी पण असाच होता . मला वाटलं आता तरी सुधारला असशील ...
ये... काहीतरी हं गप....
काही नाही ग ... कसं सांगू अन कशी ,कुठून सुरुवात करु
तेव्हाचा गोंधळ आजही सुरूच आहे.
सांग रे ...संकोच नको करू बालपणीचे मित्र ना आपण.
वयं जरी वाढली असली तरी ऐकमेकाप्रती तोचं विश्वास तोच शुध्द भाव अजूनही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय त्याच संयमी वागणं तिचं लाघवी बोलणं छान ट्युनिंग दोघांच ...
बोल तर ...मनमोकळेपणाने
एक सल मनातली रोजरोज छळते ग मला...
कोणती ?
हे बघ काही गैरसमज नको हं जे बोलणार आहे ते अगदी सत्य आहे. मनाच्या तळाशी खोलवर रुतून बसलेलं
तिचे एकटक बघण ,
पापणी न लवता नजरेत भरून घेणं ...अस्वस्थ करत होतं
ये अग ऐकतेस ना ... कुठे हरवलीस !
......अं काही नाही काही नाही ...बोल ऐकतेय
तु ना मला अगदी तिसरी चौथीत होती ना तेव्हापासून खूप आवडायचीस .तसे आपल्या वयात फक्त एक वर्षाचा फरक मी पाचवीत तु चौथीत ... तुझं आमच्या घरी येणजाणं असायचं तु आलीस की मी खूप आनंदी व्हायचो . सारखे तुला बघत राहवं , तुझं हसणं , बोलणं , शाळेत खो खो खेळताना नेमका मलाच खो देताना मारलेला धपाटा सारं सारं खूप आवडायचं . तेव्हा नाही समजायचे ग ,...तुझाचं सहवास इतका का हवाहवासा वाटतो . हळूहळू वय वाढतं होत तसातसा मी तुझ्यात अजून अजून गुतंत चाललो होतो . नजर सारखी तुझाचं पाठलाग करायची . दिसली नाहीस की कासावीस व्हायचो . उगाच चकरा मारायचो रस्त्यावर जो तुझ्या घरासमोरून जात होता . चोरून चोरून , लपूनछपून तुला बघायचो . समोर आलीस की टाळायचो पण आतुन सुखावून जायचो ...तुझ्या डोळ्यातले भाव तुझी अन इंतरांची नजर चुकवून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो .मला जे वाटते तेचं तुलाही माझ्याबद्दल वाटते का हे शोधण्याची ती धडपड . पण सांगण्याची , विचारण्याची हिम्मत नाही केली कधी ...का कुणास ठावूक तेव्हा मी व्यक्त नाही होऊ शकलो .
अचानक एक दिवस तु घरी आलीस , तेव्हा मी बारावीत अन तु दहावी होऊन घरीचं होती . आईला म्हणाली मला पाहुणे बघायला आलेले काकू आज ...
हो का ...कुठले ग अन एवढी काय घाई झाली तुझ्या घरच्यांना चांगली हुशार आहेस की शाळेत पुढे शिकावयचे सोडून कशाला संसार गळ्यात बांधताहेत तुझे आईवडील...
या आईच्या प्रश्नावर तु काहीच उत्तर दिले नाहीस . पुन्हा माझ्याकडे बघत म्हणालीसं माझं लग्न होणार आता ...खरं तर काळीज चिरणारे शब्द ऐकून मी पुरता घायाळ झालो होतो . कोवळं प्रेम आपलं बहरण्याआधीचं कोमेजून जाणार होते .याची कल्पना होती ग ...परंतु निशब्द मी
स्मित करून सावरला तो कोसळणारा क्षण ...छान एवढेच बोललो फक्त ...पण तु खूप बेचैन भासलीस माझ्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नसावी बहुतेक तुला ....
काहीच न बोलता निघून गेलीस . त्यानंतर आमच्या घरी तुझ़ येणजाणं कमी होत गेले . थोड्याच दिवसात लग्नही झाले , नवरीच्या वेशात तुला पाहताना आतुन तुटलो खूप मी ...निरोपाच्या क्षणी मला पाहून केविलवाणा निशब्द कटाक्ष तुझा बरंच काही सांगून गेला . नजरेनं नजरेला दिलेली कबुली तोच काय प्रेमाचा अंकुर काळजात कायमचा रुजला , त्याला कधी सुकू दिले नाही . पुढच्या काळात तो एक क्षण मनाला ऊभारी देणारा ठरला .
त्या रात्री खूप रडलो ग मी अगदी हमसून हमसून घरात गप्प गप्प असायचो कशातच लक्ष लागेना सारखा तुझा चेहरा समोर यायचा ...लग्न जमल्यानतंर तु स्वतः हून ब्लँन्क & व्हाइट
पासपोर्ट साईजचा फोटो
दहावीच्या परीक्षेच्या वेळी काढलेला बळजबरीने माझ्या हातात दिला होता तेवढा एकचं फोटो असावा तुझ्याकडे ...
कशाला कशाला ग फोटो ...
अरे असू दे माझी आठवण म्हणून ...
तो फोटो म्हणजे विरक्त आयुष्याला लाभलेला परिस झाला ग ...त्यानंच अनेकदा धीर दिला , खात्री दिली ,विश्वास दिला .
एकमेकांच्या मनातले तेव्हा स्पष्ट जाणवत होतं परंतु शाब्दिक कबुली कधीच नाही देता आली . तुलाही नाही आणि मलाही नाही .
फोटो सतत माझ्या पाँकेटमधे असायचा ,एकांतात फोटोशी खूप बोलायचो , कुठे आहेस ,कशी आहेस माझी आठवण येते का ग तुला की विसरून गेलीस , मला खूप आठवण येते तुझी करमत नाही ग तुझ्याविना मनातले सारं सारं सांगायचो ,बोलायचो . दुवा होता तो आपल्यातला कदाचित त्या फिलिंग तुझ्यापर्यंत पोहचत सुध्दा असतील.
खरं आहे ....
...कागदी प्रतिमा जिवंत वाटायची आपण एकमेकासोबतचं आहोत असे वाटायचे . कधी कधी वाटायचं फाडून फेकून द्यावा हो फोटो ...नाही ग नाही धजावले हात ...तोच एक सहारा होता माझ्या जगण्याचा ...जीवन संपून टाकावे असा अघोरी विचारसुद्धा मनात यायचा , नाही नाही असं होता कामा नये ....तिचे काय होईल मग माझ्याशिवाय ती नाही जगू शकणार ...अनंत प्रश्नाचा सारखा भडीमार चालू असायचा ...कशातचं रस वाटेनासा झाला ।न अभ्यासात लक्ष न दैनंदिन कामात लक्ष ....
आईने माझी घालमेल ओळखली , कदाचित तिला कल्पना आली असावी आपल्या प्रेमाची म्हणून तिने जिथे तुझ्या आठवणी होत्या ते घर , गाव ,जागा सोडण्याचा निर्णय घेतला . इथून गेलो तर हळूहळू हा विसरून जाईल सर्व अशीच धारणा आईची ...
पण नाही ग तुला विसरण्याचा जेवढा प्रयत्न करायचो अजून तेवढाच अधिक ओढीने कासावीस व्हायचो मी ...
शिक्षण पूर्ण केलं , नोकरीही लागली , लग्नही केले मुलंही झालीत ...वरवर जरी सगळं व्यवस्थित वाटत असले तरी ,
हृदयी वसलेले तुझे अस्तित्व मला कधीच मिटवता नाही आले . तिथपर्यंत कुणीच पोहचू शकले नाही .
तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे .
तुझंही माझ्यावर जीवापाड प्रेम आहे .
हे कळूनही तुला कधी सांगता नाही आले . ती बोच मला खूप अस्वस्थ करते . गेले कित्येक वर्षापासून शोधतोय तुला काल तुझा पत्ता मिळाला तत्क्षणी ठरवले आता काहीही होवो प्रेमाची कबुली द्यायचीचं ,तु काय विचार करशील ,काय बोलशील ... चुक की बरोबर , योग्य अयोग्य
अजून बरेच काय काय विचार निष्प्रभ ठरलेत तुझ्या खऱ्या प्रेमापुढे ज्योती ...हो अगदी बरोबर बोलतोयं मी खरं प्रेम असेल तर नियतीसुध्दा मदतचं करते ...मला फक्त मनातील सर्व सत्य तुला सांगायचे होते . खूप तळमळत दिवस काढले ग मी ...खूप खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर हेचं सांगण्यासाठी एवढा आटापिटा करून आलो मी...
मनावरचं ओझं हलके झाले बघ आता....
.................तु काहीच नाही बोलणार का ?
आल्यापासून बघतोयं तु फक्त एकटक माझ्याकडे बघते ते ...काय बोललो ते तरी ऐकत होती की नाही ...ये वेडाबाई कुठे तंद्री लागलीयं....
अंह ...हो हो ऐकतेय ना बोल ना ....
एक तासापासून मीचं बोलतोय ना....तू बोल आता थांबव तो कोंडमारा आतला ...
संभ्रम अवस्था तुझी कळते मला ...तुझी शप्पथ मनात काही वाईट विचार घेऊन नाही आलो ग मी ...एकदा फक्त एकदाच तुला सर्व सांगायचे एवढाच हेतूने माझा प्लीज काही गैरसमज नको हं...
नाही रे गैरसमज काय त्यात ...हेच हेचं ऐकण्यासाठी कधीपासून कान आसुसलेले होते रे सोना ...मला खात्री होती ,तु माझ्यावर खूप जीव टाकतोस , मी ही तुझ्यावर मरते हे जाणून होतास तरी संयमाने वागायचा .
तशी मी थोडी हूडच , तु एक शब्द टाकला असतास तर तुझ्यामागे कुठेही आले असते .
तु मात्र विचारपूर्वक काही गोष्टी टाळत असायचा , दूरगामी परिणाम वाईट होतील ही दूरदृष्टी होती तुझ्याकडे ....
मी मात्र फक्त तु माझा अन मी तुझी ...एवढाचं विचार बसस यापुढे काही नाही.
काही मर्यादा दोन्ही कुटुंबात सर्वच बाबतीत खूप भिन्नता होती .दरी होती , ती ओलांडण्याची आपल्याला हिम्मत नव्हती ....संस्कार संस्कृतीत वाढलेलो आपण भावनेपेक्षा नात्यांचा जास्त विचार केला ...वयाने लहान असलो तरी विचारांची प्रगल्भता होती तेव्हाही आपल्यात ....
पहिलं अन शेवटचं प्रेम तुचं आहेस माझं ...शरीराने जरी दूर असलो तरी मनाने तेव्हाच एक झालेलो ...ते आजही तसेच ,ऊद्याही तसेच शेवटपर्यंत घट्ट राहणार ...तिथे कुणालाचं स्थान नाही . एक सांगू दिपक माझीही अवस्था तुझ्यापेक्षा काही वेगळी नाही रे ...खूप लहान वयात लग्न झाले. संसाराची जबाबदारी खांद्यावर आली . अल्लड खेळकर वयात प्रोढपण लादलं ,निसर्ग नियमाप्रमाणे मुलंबाळं झाली . दिवसेंदिवस त्यात अडकत गेली . रोजच्या या धकाधकीच्या जीवनात तुझी खूप आठवण यायची , दरवेळी कोणत्याही गोष्टीत तु जन्माचा जोडीदार असता तर ...वेगळे जीवन असते ना माझे असा एकही प्रसंग नाही त्यात मी तुला कंपेअर केलं नाही .
नुकतीच सुरवात झालेली कोवळ्या मनावर तुझं सहजीवनाचा साथी म्हणून तुलाचं बघत होती. एक मात्र नेहमी जाणवायचं तुझंही माझ्यावर प्रेम होतं की माझं एकतर्फी चालले होते सर्व ...अजूनही आठवते पाणवठ्यावर गरज नसताना हंडा कमरेवर घेऊन पाणी आणायला जाणं ...सतत दारातून रस्त्यावर डोकावून बघणं , दुकानात जाताना तु कुठे दिसतोय का चोरून बघणं तु समोरून येताना पाहून थबकनं ...
तु मोठा लबाड हं पण ....ताकास तूर लागू द्यायचा नाही ,तासनतास तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलेली मी ...मला न बघताचं झरकन निघून पाठमोरा व्हायचा ...तेव्हा असं वाटायचं ओरडून सांगावं तुला ....अरे मी कशासाठी एवढ्या वेळ तटस्थ ऊभी आहे इथे....
तुझ्या एका कटाक्षासाठी वेडी व्हायची रे मी ...शाळेसमोर पटांगणात संध्याकाळी जेव्हा तु हाँलीबाँल खेळायचा अंधार पडेपर्यंत ...अन मी अंगणात उगाचच रेंगाळत राहायची ...आईचा ओरडा मिळायचा मला ...तिन्ही सांजेला कशाला अंगणात येरझारा घालतेस ग !
बाँल नेट वरून इकडून तिकडे जायचा तसातसा जीव खालीवर व्हायचा असं वाटायचे रात्र होऊच नये .तु नजरेसमोरून दूर जाऊचं नये .अक्षरशः वेडी झाली होती मी तुझ्यासाठी ...तुला त्याचं काहीच सोयरसुतक नव्हत हं तेव्हा ...फुगीर कुठला लयं भाव खायचा हं तु ...
हसतोस काय ...खोटं बोलते का मी
नाही ग राणी खोट नाही त्यावेळच्या भावना अगदी जशाच्या तशा तुझ्या तोंडून ऐकताना स्वतः ला भाग्यवान समजतो ...तुझ्या रुपाचे अनेक दिवाने होते ...कुणाची हिम्मत नाही झाली तुला कधी काही सांगायची ,बोलायची
त्यांच्या गप्पा ऐकताना मी मात्र मनोमन खूश असायचो कुणाला भिक न घालणारी पोरगी माझ्यावर जीव ओवाळून टाकते ...कळत होत ग मला
धाडस नव्हते तेवढे माझ्यात मला विश्वास होता एका शब्दावर माझ्यासाठी काहीही करायला तु तयार झाली असतीस. तु अल्लड ,निरागस राजकुमारी आईवडिलांची खूप लाडकी होती . तो काळही वेगळा होता , प्रेम वगैरे या गोष्टी म्हणजे अपराध ,गुन्हा आहे . घराण्याचं नाव खराब केले म्हणून ही मंडळी जीव घ्यायला ही मागेपुढे पाहत नसायची दोन्ही कुटुंब पूर्ण भिन्न होते ....आपल एकत्र येण्याचे परिणाम भयानक झाले असते ...
खूप विचार करून आणि कसोशीने तुझ्यापासून स्वतःला दूर ठेवत होतो . तसे केले नसते तर कदाचित आपण आयुष्यात पुन्हा कधीच भेटलो नसतो ग ....सांगताना सुध्दा अंगावर काटा आला बघ ....
अग एक विचारलेचं नाही तुला ...
काय....
तुझ्या वैवाहिक आयुष्यात तु सुखात आहे न पण ...
हो हो नजर चुकवत दिलेले उत्तरानं घालमेल झाली त्याची
ही हे खोट सांगतेय एवढ नक्की ...काहीतरी त्रास असणार ...आजचं हा विषय नको स्वतःला बजावत तो उठून ऊभा राहिला ...
चल येतो ग आज परिपूर्ण झालं बघ आयुष्य माझं .
तु भेटलीस मनातले सर्व सांगून काळजावरचा भार हलका झाला ...किती किती हलक वाटत मला म्हणून सांगू ...
निघालास ...थांब ना पाच मि. अजून
नको आता येईल पुन्हा । उशीर झाला खूप ...अन तुझा नवरा येण्याची वेळही झाली ना ...उगाच गैरसमज नको .
येऊ ...येऊ का ...
हूमममम
काय हे असा निरोप देणारेस का मला ? हस बर छान
तिची नजर खिळलेली अजूनही त्याच्यावर...
अग ये वेडाबाई येतो ,...
त्यान हातात हात घेऊन हळूवार थोपटत ...
आय लव्ह यू ज्योती .....
आश्वस्त , शाश्वत स्पर्श तो स्वर शांत , शितल भासला
हृदयातला कालवा स्तब्ध ....
चल बाययय...
बा....ययय
काळ्याकुट्ट ढगांनी वेढलेल्या आकाशी जशी लखकन वीज चमकावी अन सारा आसमंत प्रकाशात न्हाऊन निघावा ...
अगदी तसाचं अंतरातला कोपरा न कोपरा उजळला...
मुक्त झाले भाव ,मुक्त झाली व्यथा , मुक्त झाली मनं ,
मुक्त ....साऱ्या साऱ्या आठवणींचा गाव ...
#जीवलगा@ आय लव्ह टू यू ....💞
...........।।।।
भूतकाळ वर्तमान बनून समोर आला खरा ...
पुढचे ...भविष्य काय !
नवा पेच ......
बावरल्या मनाला सावरत ....
....................
रेडिओ आँन केला ....
गाणं चालू होतं....
आज मै उपरर् ...आसमाँ निचे ...
आज मै आगे ...जमाना है पिछे ....
टेल मी ...ये खुदा अब मै ...क्या करू...
चलू सिधी कि उलटी चलू...