थोडसं बदलूया
थोडसं बदलूया


आज वटपौर्णिमा त्यानिमित्त विचार थोडेसे बदलूया हा सण पारंपरिक आणी श्रद्धाभाव ठेवून महिला साजरा करतात .एक काल्पनिक संकल्पना या सणामागे आहे , आजच्या दिनी सावित्रीने यमाकडून आपले सौभाग्य परत मिळवले होते या गोष्टीला वड साक्षी होता अशी आख्यायिका आहे . म्हणून आपण वडाची पुजा करून हाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठी पूजा , प्रार्थना करतो . कुठलीही श्रद्धा डोळस असावी . कदाचित त्याकाळी महिलांना एकत्रित सुखदुःखांचे क्षण एकमेकीसोबत वाटता यावे , छान साजशृंगार करून मनातली होसमौस करता यावी आणि निसर्गाच्या सानिध्यात मन मोकळे करून ऊदासी , अंतर्मनाची मरगळ दूर सारून तनमन प्रफुल्लित व्हावे यासाठी ही संकल्पना असू शकते पण कुठल्याही चांगली गोष्ट करताना एकाद्या घटनेचा आधार घेतला तर ती सर्वश्रुत आणी मनावर कायमची ठसते , ... म्हणून अशी कथा तयार झाली असावी . जन्ममरण तसे अनादी काळापासून कुणाच्याही अख्त्यारीतली क्रीया नाही. एक निसर्गनियमीत घटना आहे .
वैवाहिक जिवनात एकमेकासोबत सामंजस्य असेल, आचारविचारांचा धागा ,चारित्र्याचा बांध भरभक्कम असेल तर असल्या व्रताची गरज नाही .
पर्यायाने वादविवाद , टेन्शन्स् याचा प्रश्नच येणार नाही आणि त्यामुळे जेवढे आयुष्य प्रत्येकाच्या} वाट्याला आले ते नक्कीच सुखासमाधानात जाईल .आणि जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा हा समर्पण भाव निर्माण होऊल .तो परमेश्वरचरणी सफल ठरेल . ...., कुठल्या व्रताने माणसाचे आयुष्य अबाधित होऊ शकत नाही कींवा परीपूर्णही नाही ...ते होते आपुल्या चांगल्या कर्माने आणि वर्तणूकीतून ,....असे मला वाटते.
उगाच ओढूनताढून परंपरा आहे म्हणून मी पुजा, उपवास करावा ,....नाही केला तर मला नव-याप्रती प्रेमभाव नाही , काळजी नाही हे सिद्ध होईल काहीतरी अघटित घडेल असा फोल भाव मनी धरु नये. थोडासा विचार करु जे पटते ते अवलंबून
उन्हाळा ऋतूनतंर पावसाळा सुरू होतो मृग नक्षत्री पावसाचे आगमन होते , तप्त निसर्ग सुखावतो... धरती हिरवाईचा साज लेऊन नववधू प्रमाणे सजूनधजून मनामनात आशाआकांक्षा नवनवे स्वप्न पेरीत डौलाने उंबरठ्यावर ऊभी असते . आपण तिचे स्वागत करुया वडाचे झाड असो की कुठलाही वृक्ष आपल्याला भरपूर शुध्द आँक्शिजन देत असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुया त्यांच्या सानिध्यात जाऊ मन प्रफुल्लित करु नव्या आचारविचारांचा जागर करुया निसर्गाची पूजाअर्चा करूया नव्या स्वप्नांचे दिप पाजळून चांगल्या ध्येयाकडे वाटचाल करुया कुणाच्या तरी मनातल्या उजाड माळरानी चैतन्य फुलवूया जोखडबंद विचारांच्या सख्यांना शुद्ध सात्विक विचारांच्या प्रवाहात आणूया हसतमुखाने निसर्गाचे स्वागत करूया . ....
कुणाच्याही भावना दुखवण्याचा अजिबात हेतू नाही ,जे वाटते ते व्यक्त केले इतकेच.