Meenakshi Kilawat

Inspirational

5.0  

Meenakshi Kilawat

Inspirational

माय मराठीचा जागर"

माय मराठीचा जागर"

3 mins
1.8K



   "मराठी रसिकांची आवड ओळखून मराठीच्या ह्या जागरात अंतरात्माला भिडेल अशी ज्ञानाची गंगा 'रंग लेखणीने दखल घेतली आहे. ही गोष्ट नक्कीच आनंदायक आहे.

  "गोडी अमृताची माझ्या मराठीत" खरच किती लाघवी मधूर ही मराठी भाषा आपल्या अख्या देशात बोलली जातेय. ही मराठी भाषा अतिशय समृद्ध भाषा आहे. 

अशी अलंकारीत मराठी व्यंजनांची भाषा कशी शोभून दिसते. काना,मात्रा, उकार, वेलांटीने मस्त नटलेली व अनुस्वाराचे कुंकुम लावलेली आहे. उपमा, अनुप्रास, रुपक, यमक या सुंदर सौंदर्य अलंकाराने नटलेली गझल, लावणी, पोवाडे, भारुड,ओव्या, गवळण, अभंग लोकगीते यांची तऱ्हाच निराळी आहे.लिहायला आणि बोलायला रसदार आहे. मराठी भाषा नवरसाचा तुडूंब भरलेला महासागर आहे. इंद्रधनुच्या सप्त रंगात माय मराठी भाषा ओतप्रोत शब्दांने चींब भिजलेली आहे. तिने यशाचा झेंडा संंपुर्ण जगात रोविला आहे. मराठी भाषेचा अभिजात रूतबा सर्वीकडे आहे. 

     मराठी भाषा मवाळ, मायाळू आणि वात्सल्यमई आहे.महाराष्ट्राची आन,बान,शान आहे.आजही लोकांना "शालिवाहन शकेचा" अजूनही विसर पडलेला नाही, ते शके सातवाहन घराणे म्हणजे महाराष्ट्राचे आद्य राजघराणे. आजचे पैठण आणि त्या काळातील प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी होती. सुमारे साडेचारशे वर्षे नर्मदेपासून दक्षिण भारतापर्यंत राज्य करणाऱ्या सातवाहन राजांनी महाराष्ट्राला आपली राजभाषा केली होती. संपूर्ण राज्यकारभार आणि लोकव्यवहार मराठी भाषेत होत असे.असा मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा आहे.सातवाहन घराण्यातील ‘हाल’ या राजाने ‘गाथासत्तसई’ म्हणजेच ‘गाथा सप्तशती’ हा काव्यसंग्रह दोन हजार वर्षापूर्वी लिहिला होता.यावरून सिद्ध होते की ही भाषा त्याच्या काही शतके आधी अस्तित्वात होती.

       चक्रधर स्वामी सोबतच दत्त, नाथ आणि लिंगायत संप्रदायासारख्या पंथांनी मराठीला धर्मव्यवहारात महत्त्वाचे स्थान दिल्याने ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ,समर्थ रामदास आणि तुकाराम महाराज आदी संतांना आपले साहित्य मराठीत निर्माण करणे शक्य झाले होते..स्वातंत्र्यपूर्व काळात लो.टिळक, स्वा.सावरकर, महात्मा फुले,न्या.रानडे,साने गुरूजी,विनोबा भावे,आगरकर आदींच्या साहित्याने मराठी भाषेला अधिक प्रसारक केले होते.

     पैठणच्या एकनाथ महाराजांनी मराठीत लिखाण करू नये, मराठीत धर्मज्ञान सांगू नये यासाठी त्यांच्यावर घरातूनच दबाव होता.परंतु त्याला न जुमानता मराठीचा प्रवाह नदीसारखा वाढत गेला.स्वतंत्रपणे मोक्षाचा मार्ग शोधावा, या हक्कासाठी ज्ञानदेवाने लढा दिला होता. श्रीकृष्णाच्या वचनानुसार स्वातंत्र्य मिळणार होते, त्या स्वर्गाची चाबी ज्ञानेश्वरांने लोकांना स्वत:च्या भाषेतून म्हणजे मराठीतून दिली. त्यासाठी ज्ञानेश्वराचा छळ केला होता.पण ज्ञानेश्वरी हा युगप्रवर्तक ग्रंथ ठरला व मराठीला उत्तम दर्जा प्राप्त झाला. मराठीची प्रतिष्ठा अबाधीत रहावी.हिच माफक अपेक्षा आहे.हा भ्रामक समाज आपल्या भाषेपासून तुटत चालला आहे, जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो आपल्या हाताने भाषेला व आपल्या संस्कृतीला संपवत अाहे. इतकी श्रेष्ठ ज्ञानवर्धण करणारी मराठी भाषा अप्रतिम लावन्याची खाण आहे. ती लुप्त होणार नाही याची काळजी निदान महाराष्ट्राच्या लोकांनी घेतली पाहिजे. सर्व भाषेवर प्रेम करावे परंतू आपल्या मायबोलीची जपणूक जिवापाड करायला हवी आहे.

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी भाषेचे संगोपण केले पाहिजे. 

  "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी" असे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी आपल्या आईचा आणि मातृभूमीचा गौरव करताना म्हटले आहे.त्यात आपल्या मायबोलीची समावेश करायला पाहिजे.मराठी भाषेतील थोर साहित्यिक मंडळी लेखक,कवींनी किती रसाळ मायबोलीची थोरवी गायली आहे. वीरांचे पोवाडे गायले गेले.लावण्या घडविल्या गेल्या.महान नाटककार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभरात साजरा होतो.जगात जिथे कुठे मराठी माणूस असेल तो अभिमानाने हा दिवस साजरा करत असतो. इंग्रजी माणुस असो वा हिंदी बोलणारा असो प्रांसगाने वेळ आल्यावर वेडीवाकडी मराठी बोलण्याचा प्रयास करतांना दिसतात. राजभाषा गोडवा गातांना दिसतात. मग मराठी मानूस का मागे आहे. मायबोलीला ओळखा तिचा अभिमान बाळगावा अशी ती महान आहे. सन्मानाची हक्कदार आहे.मराठी मनापासून आत्मसात करावी. तेंव्हाच मराठीचा खरा गौरव होईल.तेंव्हाच मराठीची जन्म सार्थक होईल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational