शब्दसखी सुनिता

Drama Romance Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Drama Romance Others

मावळतीच्या उंबरठ्यावर

मावळतीच्या उंबरठ्यावर

9 mins
323


    दिवाळीचे दिवस जवळ येत होते,सत्तरी पार केलेले प्रकाशराव आपल्याघराची साफसफाई करावी, या वर्षी घरालारंगकाम करून घेतात. वयोमानाप्रमाणे त्यांना घरच जास्त करण जमत नसे.प्रकाशराव गावात प्रसिध्द होते. त्यांना सगळे मान देत. ते सर्वांशी बोलून चालूनमिळून मिसळून राहायचे. कुणाला अडचणीच्यावेळी मदत करायचे. लोक त्यांना प्रेमाणे' अण्णा ' म्हणत. सगळी तयारी करत होते, त्यांना यावर्षीची दिवाळी खुप आनंदात आपल्या मुलांसोबत साजरी करायची होती. त्यांची पत्नी सुधा वीस वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेली. तेव्हापासुन ते गावी आपली शेतीवाडी सांभाळत होते, त्यांना दोन मुले , एक मुलगा शिकून मोठा इंजीनीअर झाला त्यालाचांगला जाॅब मिळाला. तो पुण्यातच स्थायिक झाला. मुलगीही त्यांची चांगल्या जाॅबला होती. वर्षातुन एकदा ती आपल्या बाबांना भेटायला गावी यायची. ते चार पाच दिवाळीचे ते आपल्या मुला मुलीसोबत, नातवंडांसोबत मजेत, आनंदात घालवायचे. ते चार पाच दिवस पटकन निघून जायचे. मग ते वर्षभर त्या दिवसांच्या आठवणींच्या आधारे जगायचे. सोबत कुणी नसल म्हणूनकाय झाल ? ते पुस्तकांशी मैत्री करत.त्यांना वाचायची फार आवड होती. हा एकटेपणा त्यांना वाटत नसे. आपल्या शेतात जमेल तेवढ काम करायचे.बाकी कामांना माणस लावली होती पण सगळी जबाबदारी आणि देखभाल त्यांना करावी लागे. अजुनपर्यंत ते सगळ काम उत्तम चोखपणे पार पाडायचे.कधी कधी त्यांना एकटेपणा त्यांना खायलाउठायचा. त्यांचा मित्र सदानंद त्यांना तेमनातल सगळ बोलून मोकळ करायचे.      


अण्णांची दिवाळीची सगळी तयारीझालेली होती. ते आपल्या मुलांना काॅलकरावा म्हणून जरा बसले, तेव्हा त्यांचलक्ष फॅमिली फोटो अल्बम कडे गेल..." अरे देवा हे काय , कपाड साफसफाई करून झाल आणि विसरून हा अल्बमइथेच राहीला वाटत... एकदा ते उघडूनबघतात नि सुधाचा फोटो त्यांना दिसतो.ते त्यावरून हात फिरवतात... त्यांच्याडोळ्यांत नकळत पाणी येत."" सुधा, आज तु असायला हवी होती.बघ , तु नेहमी म्हणायची ना... तुम्हीसणासुधीला कधी लवकर आवरत नाहीआणि मलाही मदत करत नाही कधी...सारख आपल काम नि काम करत बसता. "पण आज बघ मि जमेल तेवढी दिवाळीचीतयारी केली नि बाकीची माणसांकडूनकरवून घेतली. आधीच सगळी तयारीझाली माझी पण तु नाही आज ती बघायला.हो आणि मी खुप आनंदी आहे बर... आपली दोन्ही मुल, नातवंड येतील नादिवाळीला घरी म्हणूनच ही तयारी केली...ते जुन्या दिवसांत हरवून गेले होते. तेवढ्यात फोनची रिंग वाजली... ते भानावर आले...आता कुणाचा फोन आहे, ते उठले नि मोबाईल हातात घेतला... त्यांच्या चेहर्‍यावरहसु उमटल. अरे व्वा... खुशीचा फोनआहे. " हा बोल ग खुशी.... ?"" हॅलो, बाबा तुम्ही ठीक आहात... ?तब्येत काय म्हणते ? "अण्णा - " मी ठणठणीत आहे ग , आणितुम्ही दोघे येणार म्हटल्यावर तर मी जास्तहॅपी आहे. "खुशीला आपले बाबा खुप आनंदात आहेत.हे समजत होत. पण पुढच कस बोलू तिला समजत नव्हत. पण तिच्या घरीसगळे तिचे बाहेर असणारे रिलेटीव्ह तिच्याघरी दिवाळीला येणार होते. म्हणून तीयंदा येऊ शकत नव्हती." ओके बाबा, तुम्हांला एक सांगायच होत.मी यावर्षी आपल्या घरी नाही येऊ शकणारओ... ईथे या वर्षी युवराजच्या घरचे सगळेइथे दिवाळी साजरी करणार आहोत आम्ही..."    अण्णांना थोड मनाला वाईट वाटल,पण तिच्या आनंदातच त्यांचा आनंद होता.त्यांनी स्वतःला सावरल नि पुन्हा बोलू लागले." हा... खुशी चालेल काही हरकत नाही.तु वेळ भेटेल तेव्हा ये. काळजी घे आणिमस्त, आनंदात दिवाळी साजरी कर. "अस बोलून त्यांनी फोन ठेवला. मग त्यांनीसंध्याकाळी सुरजला काॅल केला. त्यालागावी यायच विचारल तर तो म्हटला की," मला वेळ नाही आहे, माझ्या नवीनघरी दिवाळी इथेज सेलिब्रेट करायचठरवलय. कारण काव्याचे आईबाबा आणि इतर रिलेटीव्ह व माझे फ्रेन्ड्ससगळे माझ नवीन घर बघायला येणारआहेत. जमल तुम्ही या... अस त्याने अण्णांना सांगितल. तरीही अण्णांनी काहि म्हटल नाही. त्यांनी थोडस पाणीघेतल नि संध्याकाळी ते टिव्ही बघतहोते. तेवढ्यात त्यांचा मित्र सदानंदआला. " काय रे झाली का तुझी तयारी प्रकाश... " " अरे हो, ये ना तुलाच फोन करणार होतो. बर झाल तुच माझ्याकडे आलास."अण्णांनी आपल्या मुलांचे आलेले फोन,झालेल बोलण सगळ सांगितल. सदानंदच्याहे लक्ष्यात आल होत की याला बहुतेकमुलांना भेटायच आहे. मग ते त्यांनासांगतात की तुच आपल्या सुरजच नवीनघर बघायला, दिवाळीसाठी चार पाचदिवस जा... त्यांच मन रमाव , मनालाफ्रेश वाटाव म्हणून त्यांनी अस सांगितल.   


दुसर्‍या दिवशी सकाळीच अण्णा दिवाळीदोन दिवसांवर आली म्हणून सुरजच्या घरीजातात. तो पुण्याला राहायचा. आजोबांना तुला चेतनला बघायच होत. मुलाला आणिसुनेला भेटायच म्हणून ते पुण्याला निघाले.तिथे पोहचल्यावर स्टँडवर अण्णा उतरले.त्यांनी आपल्या मुलाला काॅल केला त्यांनावाटल असेल घरी तर न्यायला येईल त्याचीगाडी घेऊन, परंतु संध्याकाळी सुरजचीमिटिंग होती. तो येऊ शकतु नाही, फ्री नाही आहे म्हणून त्याने अण्णांना कळवल.संध्याकाळी दमुन आलेले अण्णा एकाॲटोने घरी पोहचले. सुनबाई आणि छोट्या चेतनला बघून त्यांना बर वाटल.तोही आपल्या आजोबांसोबत गप्पा मारूलागला. खेळू लागला. काव्या हे सगळबघत होती. तिने बाबांसाठी चहा केला.नंतर ते आराम करत होते. संध्याकाळीसुरज ऑफीसवरुन आला नि त्यानेचेतन आणि काव्याला तयारी करायलासांगितल व बाहेर जायचय एवढच बोलला.तिने बाबा आल्याच सांगितल पण म्हणावतितका त्याला आनंद झाला नाही. शेवटी बाबांना त्याचा आवाज ऐकू आलाते उठून येऊन सुरजला बोलू लागले.त्याच काम नि तब्येतीविषयी विचारल.काव्याने बाबांसाठी उशीर झाला तरजेवण बनवून ठेवल. ती त्यांनाही सोबतचला म्हणाली पण सुरज काहिच बोललानाही म्हणून अण्णांनी त्यांच्यासोबत जाणेटाळले. त्यांच्या लक्ष्यात आल की सोसायटीच्या तिथे बाग आहे, मंदीर आहे तिथेजाऊन येऊया. म्हणून त्यांनी तयारी केली.ते जायला निघाले. खाली गेल्यावर बगीच्याकडे जाताना एक स्री... त्यांच्या हातातीलपिशवी पडली. ते त्यांनी बघीतल नि त्यांच्यामदतीसाठी गेले. तेव्हा त्या म्हणाल्या." राहू द्या तुम्ही, मी उचलते." त्यांनी त्यांचीअवस्था समजुन घेतली. त्याही साठी पारकेलेल्या दिसत होत्या. दोघांनी पटकन उचलल. त्या अण्णांना " थँक यु " म्हणाल्याअहो, थँक यु काय म्हणत्यात या वयातमदतीची गरज भासतेच. त्यांना कायवाटल ते माहीती नाही त्यांनी लगेच म्हटल." तुम्ही नवीन राहायला आलात का ईथे ?"अण्णा - " नाही मी, मी मुलाकडे आलोयदिवाळीसाठी... मी प्रकाश देशमुख.आणि तुम्ही इथेच राहता का अण्णांनीविचारल्यावर त्या नाही म्हणाल्या..." मी मावस बहिणीकडे आले आहे "मी सुमन पटवर्धन... याच सोसायटीतमाझी बहिण राहते.एवढ बोलून त्या म्हणाल्या कुठे जायचयतुम्हांला... "अण्णा - " देवळात जाचयच " त्याही हसल्यानि मलाही तिथेच जायचय... "" चला तर मग सोबत जाऊया... "  ते दोघेही सोबत देवळात गेले. देवालानमस्कार केला. थोड्या वेळ तिथेच बसले.दोघांची थोडी ओळख झाली होती. थोडावेळ गप्पा मारल्यावर दोघेही आपापल्याघरी गेले. अण्णाही घरी आले. जेवण केलत्यांना खुप बर वाटल की इतक्या वर्षांनीअस कूणीतरी जवळ बसुन त्यांच्याशीछान मनमोकळेपणाने बोललेल. घरचेयेईपर्यंत ते झोपी गेले होते. दुसर्‍या दिवशी अण्णा सकाळीच उठलेअगदी प्रसन्न वाटत होत. सुरज काही नबोलता त्याच काम करत बसला होता.अण्णा मध्ये मध्ये त्याला बोलत होते.इकडच तिकडच असच आपल चालू होत.पण तो नंतर बोलू म्हणाला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. काव्याची आई,तीची बहीण घरी आले होते. त्यांना पाहुनसुरज खुप आनंदीत झाला. हातातील कामटाकून तो त्यांच्याशी गप्पा मारु लागला. अण्णाही बसले होते पण त्यांना त्यांच्यातकाही रस नव्हता. ते खाली जाउन येतोम्हणून तिथे बागेत जाउन बसले...


त्यांनी आजुबाजुला बघितल तर त्यांच लक्ष तिकडेगेले. काल भेटलेल्या सुमन पेपर वाचतबसल्या होत्या. अण्णांना खुप आनंदझाला. तेवढ्यात सुमनेही त्यांच्याकडेबघितल नी त्यांनीच त्यांना बोलवल.दोघेही थोडा वेळ बसले. पेपर वाचलानि त्या जायला निघाल्या. त्या अण्णांनाबाय करून निघाल्या. दोघेही आजही खुप भरभरून बोलत होते. अण्णाही घरी आल्यावर तुम्ही कुठे गेला होताईतका वेळ म्हणून सुरज भडकला. तो खुप रागिष्ठ होता. पण अण्णांनीदेवळात म्हटल्यावर तो गप्प झाला. त्याचदिवशीसंध्याकाळी सुरजने अण्णांना नीट तयार व्हायला लावल.त्याचे मित्र परिवार त्यालाभेटायला आला. सगळे त्याच नवीन घरघेतल म्हणून कौतुक करत होते. त्यांच्यागप्पा सुरू होत्या. अण्णाही तिथेच बसलेहोते. ते त्याच्या मित्रांशी बोलू लागले. त्याचासुरजला राग आला त्यांनी तुम्ही तुमच्याखोलीत जाउन आराम करा सांगितल. पण याच अण्णांना मनाला लागल, त्यानेअस का केल ते त्यांना समजल होत.चहा, नाश्ता झाल्यावर मित्र निघून गेलेत्यानंतर सुरज त्यांना खुप बोलला." तुम्हांला कीती वेळा सांगीतलय बाबा,मध्ये बोलत जाऊ नका म्हणून "अण्णांनी चुक झाली म्हटल आणि ते गप्पराहीले. काव्याही बाबांना का बोलताय म्हणून सुरजला रागवली. तो तिला तुलानाही माहीती हे कसे आहेत एवढ बोलुननिघून गेला. तेव्हा काव्याने बाबांनासाॅरी म्हटल. त्याच त्यांना काही वाटल नाही.अण्णांना दोन चार दिवस रोज सुमनशीते आपल मन मोकळ करायचे. बोलायचेत्यांना छान वाटायच. त्यांच्यात एक निःस्वार्थमैत्रीच नात फुलत होत. सुमनही आजपहिल्यांदा त्यांच्या चेहर्‍यावर तेच होत.मुलगा आणि पती अपघातात गेल्यांनंतरत्यांच्या वाटेला सगळ असुन एकाकीजीवन आल. त्यांना जगूच वाटत नव्हत.त्या या एकटेपणाला दुर करण्यासाठीवृध्दाश्रम मध्ये राहत. तिथे त्यांना छानवाटायच. त्या रमुन गेल्या होत्या. जणु तेचत्यांच्यासाठी आपल घरी होत.दिवाळीच्या संध्याकाळी खाली एक प्रोग्रामहोता. सुमनने छान तयारी केली. त्यांनापहील्यापासून साध राहायला आवडत होत.त्यांनी फराळ घेतला त्यांनी स्वतःच्याहाताने बनवलेला, जरा लवकर निघूयाम्हणून त्या आधीच तिथे आलेल्या होत्या.त्यांची नजर मात्र अण्णांना शोधत होती.तेही बघत होते तिथेच होते. त्यांना अण्णादिसल्यावर त्यांना खुप आनंद झाला.त्यांनीही नवीन ड्रेस घातला होता. दोघांनीएकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.नि सुमनने त्यांना फराळाच दिल व एकहात स्वतःच्या हाताने त्यांना भरवला.कार्यक्रम संपून घरी जायला अण्णांना खुप उशीर झालेला होता पण त्याचाआनंद त्यांनी मनापासुन घेतला.कुणीतरी सुजरच्या कानांवर घातल होत की तुझे वडील एका बाईशी बोलत होतेवगैरे अस तर अण्णा आल्यावर सुरजनेत्यांना खुप बडबड केली. त्याला पाहुण्यांसमोर जास्त बोलता नाही आल.दिवाळीचे चार पाच दिवस अण्णांचे मस्तआनंदात गेले. त्यांना आता गावी जायचमन करत नव्हत. वयोमानाप्रमाणे त्यांनाएकट्याला सगळ घर , शेत सांभाळण जड जात होत. त्यांना स्वयंपाक, त्यांची कपडे धुणे सगळीच काम करावी लागतहोती. पण त्याचा काहिच सुरजलापडला नव्हता. त्याला फक्त त्याची नोकरीआणि पैसा एवढच दिसायच.       


 सुरजने अण्णांना खुप बोलला तेत्यांच्या मनाला खुप लागल. त्यादिवशीसंध्याकाळी सुमन त्यांना भेटल्या. त्या ऊद्यापरत वृध्दाश्रम मध्ये जाणार आहेत. हेसांगितल्यावर त्यांना वाईट वाटल. त्यांनात्यांची सोबत हवीहवीशी वाटत होती.आणि सुमनलाही त्यांच्याशी बोलून छानवाटत होत पुन्हा भेट होणार नाही म्हणूनत्यांचेही डोळे पाणावले. अण्णांनीसुरज काय बोलला ते त्यांच्याजवळ मनहलक केल. सुमनने त्यांना काळजीघ्यायला लावली, छान राहायला सांगितल.पण त्यांना बाप मुलाच्या नात्यात दुरावानको म्हणून त्या अण्णांना दुसर्‍या दिवशीन सांगता निघून जातात. अण्णाही गावी निघून जातात... काही दिवसांनी सुरज आणि काव्याचे खुपभांडण होत. ती घर सोडून माहेरी जाते.त्याचवेळेला सुरजला ऑफीसच्या कामासाठीअमेरीकेला जाव लागल. अण्णांनी आपलामित्र सदानंद याला सुमनविषयी सगळसांगितल. त्यांना ही जाणवत होत कीआज कीतीतरी वर्षांनी ते आनंदी दिसतहोते. त्याचदिवशी त्यांना हार्टॲटॅक येतो.सदानंदने सुरजला काॅल केला. त्यानेखूप महत्वाच काम आहे. तो इंडीयातनाही सगळ सांगितल. तेव्हा सदानंदनेत्यांना त्वरीत हाॅस्पिटलला भरती केल.त्यांच्यावर ट्रीटमेंट सूरू होती. वेळेवरआणल म्हणून ते ठीक होते. त्याच रात्रीत्यांनी सुमनला अणांना अस झाल्याचसांगितल. त्या त्वरित निघाल्या नि तिथेपोहचल्या. तेव्हा अण्णांना सुखरूप बघून त्यांनी देवाचे आभार मानले.त्यांना खुप वाईट वाटल की त्या न सांगतानिघून गेल्या. त्या रडत होत्या. तेव्हात्या विचार करतात. कुणी काही म्हणु देतपण अण्णांना आता माझी गरज आहेतर मी त्यांच्या सोबत राहील. सदानंदअण्णांंचा मित्र आणि सुमन अण्णांचीकाळजी घ्यायचे. सगळ वेळेवर करायचे.ते त्यातुन बरे झाले. तिकडे सुरज टेन्शनमध्ये होता. कारण काव्या त्याला सोडूनमाहेरी राहत होती. तो विनवण्या करतहोता पण ती काहि येत नव्हती. अण्णांचतिला समजल्यावर तिने सुरजलाही अण्णांना भेटायला घेउन गेली. काव्यापरत आलेली बघून सुरजला आनंदझाला. पण ती काहि बोलत नव्हती,तिचा अबोला त्याला सहन होत नव्हता.तेव्हा त्याला कळल की एकट्याच दुःखकाय असत. बाबांची व्यथा त्याला कळतहोती. त्याच्या चुकीची त्याला जाणीवझाली. काव्या आणि सुरज अण्णांनाभेटायला जातात. तेव्हा सुमन तिथुननिघते. तेव्हा सुरज त्यांना थांबावतो.त्याला सगळ कळल होत की यांच नातकिती निःस्वार्थी आहे. अण्णांच्या वेळैलात्यांना गरज होती तेव्हा मी पोहचु शकलोनाही पण या बाईंनी त्यांची काळजीघेतली. तो दोघांची माफी मागतो.तेव्हा सुमन आणि अण्णा त्याला असमाफी मागु नको सांगतात. सुरज बाबांनाम्हणतो, " यापुढे तुम्ही दोघे एकत्र, सोबतराहायच. एकमेकांना साथ द्यायची. उरलेलआयुष्य छान , आनंदात घालवा. अस काव्याही सांगते. सगळ्या समाजालासमजेल अस नात तयार करूया आपण." तुम्ही दोघांनी लग्न करा " अस सुरजनेम्हटल्यावर सुमन आणी अण्णा मात्र काहिच बोलले नाही. तेवढ्यात तिथेअण्णांची मुलगी खुशीही येते. तिने त्यांच सगळ बोलण ऐकलेल असत.ती म्हणते " दादा म्हणतो ते बरोबरचआहे. " मलाही मान्य आहे तुमच हे नातं.तेव्हा सदानंदला खूप आनंद झाला.सदानंदही त्या दोघांना समजावूनसांगतो. अण्णा पुन्हा एकदा सुमनलासगळ विचारतात. त्यांनाही एकट्याने जगणे नको वाटापचे. त्यांना त्याचात्रास व्हायचा. त्यांनीही अण्णांनासोबत राहण्याच, साथ देण्याच ठरवल.   खुशी आपल्या बाबांजवळ जाऊन त्यांनासाॅरी म्हणते, " यापुढे दिवाळी सर्वांनीएकत्र साजरी करायची आणि तेही आपल्याया गावातील घरी आणि मी तुम्हांला नेहमीभेटायला वेळेवर येईल बाबा... "अण्णांनी तिला जवळ घेतल मायेनेतिच्या डोक्यावरून हात फिरवला. मगसुरजने म्हटल असे हे काय ? " आम्ही काय केलय... मग बाबांनी सर्वांनाएकत्र बोलवल... सुमनही त्यांच्याजवळ होती.सदानंदच्या डोळ्यांत आनंदाश्रु आले.तो म्हणाला... हा क्षण आपण कॅमेर्‍यात टिपुया... एकत्र फॅमिलीचा त्यांनी सुंदर फोटो काढला... सगळे म्हणताय म्हणून ते दोघेही तयारझाले. ते दोघे एकत्र राहून एकमेकांची काळजी घेऊ लागले. एकमेकांचा आधार बनले.       


समाजात आपण अस चित्र बघतो कीवयोवृध्द लोकांना मुलबाळ असुन त्यांचासांभाळ करत नाही. अस चित्र बर्‍याचदाआपल्याला आजूबाजूला वगैरे दिसत.म्हातारपण प्रत्येकाला यातुन जाव लागत.एक दिवस आपल्यावरही ती वेळ येणारआहे. मग आपण त्यांना का समजून घेत नाही. सगळेच लोक सारखेच आहेस असअजिबात नाही. तरुण वयात सगळ काही निभावल जात.  आयुष्याच्या शेवटी सगळ काही कमावलेल असत. पैसा, घर, गाडी , संपत्ती सर्व असत पण शरीर मात्र थकलेल असत. जसजसवय वाढत जात, तस माणसाला दुसर्‍या व्यक्तिची गरज, आधार लागतो, कुणाची तरी मदत लागते. मुलबाळ आपल्या संसारात असतात, त्यांना वेळ नसतो.   मग अश्या वेळी वृध्द व्यक्तींना आपल दुःख कीं  मनातल शेअर करायला आपला माणुस लागतो. कुणाची तरी सोबत म्हणण्यापेक्षा आधार असला तर राहीलेल आयुष्य छान व्यतीत करता येत.   


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama