Revati Shinde

Inspirational

3  

Revati Shinde

Inspirational

मार्ग

मार्ग

2 mins
297


"मितेश काय झाले,मी काल पासुन पाहतोय तू डिस्टर्ब आहेस एनी प्रोब्लेम.

"बाबा मी जॉब सोडतोय."

" काय" "हो". "अरे पण का" "बाबा तिथे सारे 'करपटेड ' आहेत आणि मलाही ते यात सामिल करता येत पण मला हे मान्य नाही.

"बस एवढेच. "'

"बाबा".

"अरे करपशन कुठे नाही सगळीकडे हेच चाललय. मलाही पुर्वी असेच वाटायचे पण हळू हळू समजले आपण एकटे काहीच करु शकत नाही. अरे तेव्हा मी जॉब सोडला असता तर तुझे आणि आईचे काय झाले असते आणि निमेश तुला काय वाटलं हा जॉब तुला तुझ्या मेरिटवर मिळालाय" "नाही, वर शब्द टाकला पैसे मोजले तेव्हा कुठे काम झाले."

"बाबा, तुम्ही मला आधी हे का नाही नाही सांगितले मी हा जॉब घेतलास नसता. ते काही नाही मी आता रिजाइन करणार."

"मुर्खा सारखं बोलू नकोस. पश्चातापा ची वेळ येइल."

"निलिमा समजाव तुझ्या लाडक्याला."सुशांतराव बेड रूम मधे जात म्हणाले.

"आई मला नाही रहायचे तिथे."

"मितेश अरे जॉब सोडणे हा पर्याय नाही. तू गेलास तर दुसरा कोण तरी येईल आणि या जाळ्यात अडकेल."

"मग मी काय करु ." " हे बघ मितेश तिथे राहूनच तुला लढा द्यायला लागेल. नक्किच मार्ग सापडेल.थोडा वेळ लागेल. मनाच्या विरुद्ग वागावे लागेल.प्रसंगी खोटेही बोलावे लागेल.गनिमी कावा खेळावा लागेल.पण ईलाज नाही.प्रेमात आणि युध्दात सारे माफ असते. "

"माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.हे करत असताना तुझ्या मनात लोभ उत्पन्न होणार नाही ह्याची खात्री आहे. तुझ्या बाबांना परिस्थितीमुळे जे जमले नाही ते तू करून दाखव कारण वर वरून त्यांनी कितीही तुला विरोध केला तरी त्यांना पुढे तुझा अभिमानच वाटेल यात शंकाच नाही. चल मग उद्या नव्या उमेदीने ऑफिसला जा, शस्त्र हाती घे आणि लढायला सज्ज हो. तुझ्यासारख्या तरुणांना हाताशी धर आणि लढाई सुरू कर अखेर विजय सत्याचाच आहे हे ध्यानात ठेव."

"थँक्स आई" "जा बरीच रात्र झालीय निश्चिंत झोप." आई निमेशच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवित म्हणाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational